कलादालन

पीत वसन, कमल नयन

Primary tabs

गणपतीचा उत्सव सुरु आहे.. घरी नसला तरी काकाकडे गणपती होता..
आपल्या हातून गणरायाची काहीतरी सेवा व्हावी असा उद्देश होता..
आज योग आला, घरी तसा लवकरच आल्याने एक गणपतीचं भजन म्हटलं
गणपती तसा कलेचा भोक्ता ,त्यामुळे माझे जे काही वेडे वाकडे स्वर असतील ते नक्की त्याने मनापासून ऐकले असतील..
मनापासून गायलं कि तो मनापासून ऐकणारच.. शेवटी भाव महत्वाचा :)
गणेश लेखमाला सुरु आहे मिपावर , हा लेख नाहीये.. कुठे टाकायचं प्रश्नच होता, कला दालनात टाकून बघतोय :)

मूळ रचना , संगीत , गायक : श्री मनोज लुले
राग : चंद्रकंस

पेटी साथ : मीच :)
तबला साथ : ताल माला मशीन

प्रभो

मागे ऐकू येणार्‍या हॉर्न ची साथ कुणी केली रे?? ;)

भारी......

दीपा माने

स्पा तुम्ही मधुन मधुन तुमची गायनीकळा मिपाकरांना ऐकवत जावी अशी विनंती करते. तुमचे लिखाणही नेहेमीच वाचत असते. अनेक शुभेच्छा.

पुष्करिणी

अरे वा स्पा, छान म्हटलयस की. पेटी चांगली वाजवलीये...
आणि हो, हॅप्पी बड्डे स्पा :)

चौकटराजा

सकाळ सकाळी मिपावर संवयीप्रमाणे आलो. पहिले वाटले स्पा ने फोटोशॉप मधे काहीतरी कला केलेली असावी. म्हून शान धागा उघडला आणि ऐकताना गुंग झालो. गाण्याच्या परिक्षा देऊनही अनेकांचे गायन पुरेसे रंजक होत नाही असा अनुभव आहे. पण 'स्पा' चे गायन काही औरच ! मी स्पा ह्या आयडीचा पंखा झालो. च्यायला काय रेंज आहे या पोराची ! डेबिट क्रेडीट, लेअर्स पॅटन्स , ब्रशेस. गिझमोज, एकताल रुपक शुध निषाद कोमल निषाद, भय उत्कंठा, डेप्थ ऑफ फिल्ड, फोकस, मॅपिंग, वाय झेड काय काय नाही याच्या पोतडीत ? एक आठवले काही वर्षापूर्वी मी' सूनी रैना है सूना सूना है दिल मेरा' अशी एक रचना स्वता: रचून चंद्रकौसात् चाल तयार केली. गाऊन पाहिले . वा! आपण गीतकार संगीतकार झालो. याचा आनंद वाटला. काही वेळाने कळले की अशी चाल ऐकलेली आहे ती अशी होती गीत सन सन सनन जा रे ओ पवन गीतकार भरत व्यास संगीत वसंत देसाई फिल्म संपूर्ण रामायण. आपली ही चाल ऐकून " दत्तराज पाहुनी आज तोषलो मनी " या जुन्या गीताची आठवण झाली. आजची सकाळ श्रवणसुखाने " प्रसन्न" झाली ! आदाब !

५० फक्त

लई भारी रे, आता पुढच्या कट्ट्याला तुझ्या गाण्याचा कार्यक्र्म ठेवु या.

प्रचेतस

येकदम झकास.

बाकी तुला खर्‍याखुर्‍या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

सुंदर, सुरेल गायन. आवडलं.

काल वाढदिवस झाला का? वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

अन्या दातार

गाण्याचा कारेक्रम व्हायलाच पायजेल म्होरल्या कट्ट्याला.

अन्या दातार यांचा प्रस्तावास आमचे अनुमोदन
च्यायला हा स्पा एवढा गुणी असेल असे वाटले नव्हते

@गाण्याचा कारेक्रम व्हायलाच पायजेल म्होरल्या कट्ट्याला.

चालेल,,,मी गीटार वाजविन... ;-) रॉक ऑन... :D

अवांतर--- वाढदिवसाच्या धाग्याला.... :D आपलं..ते...हे...,वाढदिवसाच्या शुभेच्छा....! ;)

गवि

एवढी कला दिलीय देवाने..

आणि कधीचा म्हणालो होतो की सर्व गायन इथे कलादालनात सर्वांसोबत सोबत शेअर कर म्हणून तर उगाच भीड धरुन बसला होतास ना?..

असो.. देर आये दुरुस्त आये.

धन्यवाद..... स्पावड्या.. मस्त रे.. अजून ऐकायला उत्सुक आहे.. ते मागे ऐकवलेलंस तेही दे इथे..

मेघवेडा

वा रे स्पा! प्रसन्न वाटलं एकदम! प्रसन्नच आहे! :)

वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. :)

च्यायला हे बेण अजुन काय काय धक्के देणार आहे देव जाणे.
नाचतापण येत कारे बाबा तुला? तेही सांगुन टाक एकदाच.
पण म्हटलय बाकी मस्तच. एकदम मुडच बदलला माझा. किप इट अप बच्चा.
माझे आशिर्वाद नेहमीच तुझ्या पाठीशी आहे,
पैजारबुवा,

सहज

मला वाटते हा २८ सप्टें चा महिमा आहे!

गानकोकिळ - स्पा

लै भारी!!

सूड

माझ्याकडे गाण्याची लिंक दिसतच नाहीये, त्यामुळे पास. ऐकलं की मतप्रदर्शन करणेत येईल.
वाढदिवसाच्या शुभेच्छा !!

सुहास..

छान आहे गळा !

बाथरूम शिंगर

पैसा

आपटे साहेबांचे गायन पूर्वीही युट्युबवर ऐकले असल्याने धक्का वगैरे अजाबात बसला नाही. मस्त गायला आहेस! खर्‍या वाढदिवसाच्या खर्‍या शुभेच्छा!

Pearl

मस्त .
गाण्यातलं काही कळतं नाही मला. पण छान वाटलं गाणं ऐकायला.

छोटा डॉन

मस्त रे स्पावड्या.
गाणे आवडले, आम्हाला गाण्यातले तसे गम्य वगैरे काही नाही, पण ऐकावेसे वाटले एवढेच सांगतो.
एकदम प्रसन्न गाणे म्हटलेस.

- (औरंगजेब)छोटा डॉन

मस्त. ६:०८ ते ६:२० मधे घेतलेल्या जागा विशेष आवडल्या. ही कलाही तुझ्या गळ्यात आणि बोटांत आहे हे माहीत नव्हतं.

मन१

आत्ता पुन्हा ऐकलं. पुन्हा आवडलं.

स्पंदना

स्पाउ?

किती सुरेल अन घनगंभीर आवाज आहे!
आता वर ज्ञानराम म्हंट्ल्याप्रमाणे आणखी काय काय येत सांग आताच.

स्पाकडून अजून एक उत्तम पर्फॉर्मन्स! नेक्स्ट टाइम लाइव्ह ऐकव रे! याधीची सगळी गाणी आवडली आहेत!

जेनी...

आवडले ओ ..पण पीत वसन म्हणजे काय ? :(

अर्थ पण सांगाकिओ म्हणते मी :(

पीत वसन म्हणजे पिवळी चड्डी.
किंवा काव्यात्मक दॄष्टीने बघायच तर पीत बसलेल्या दोन दोस्तांचे हे गाणे आहे.
पीत बसुन, चखणा खाउन, जाउया घरा हे मुळ गाणे आहे.
चंद्राला बघत नाचताना पीसे झडलेल्या बगळ्याला पाहुन कवीला हे गाणे सुचले असावे असे वाटते.

वरील गाणे अंडे घालुनपण म्हणता येते.
अंड्याच्या आकारावर सुरवातीच्या आलापाची तीव्रता ठरते.
अंडे जेवढे मोठे साSSSS तितका मोठा

चिगो

अयाया..काय हे पैजारबुवा ? उतरवलीय पार..

जेनी...

कमाल आहे ,खरच अर्थ माहित नव्हता ,म्हणुन दोन वेळा विचारला .शेवटी हे इतकं खालच्या दर्जाचं उत्तर पैजार बोवा ह्या व्यक्तोकडुन मिळालं .

शेवटी पेठकर काकानी खरडवहित उत्तर दिल ,कि पित वसन म्ह्णजे पिवळे पितांबर .
एखाद्याच्या अज्ञानावर हसण्यापेक्षा त्याला नीट समजवुन दिलत तर ते जास्त योग्य होइल .

असो .तुम्हि अति ज्ञानी मंडळी .चालुद्या .

जेनी...

कमाल आहे ,खरच अर्थ माहित नव्हता ,म्हणुन दोन वेळा विचारला .शेवटी हे इतकं खालच्या दर्जाचं उत्तर पैजार बुवा ह्या व्यक्तीकडुन मिळालं .

शेवटी पेठकर काकानी खरडवहित उत्तर दिलं ,कि पित वसन म्ह्णजे पिवळे पितांबर .
एखाद्याच्या अज्ञानावर हसण्यापेक्षा त्याला नीट समजवुन दिलत तर ते जास्त योग्य होइल .

असो .तुम्हि अति ज्ञानी मंडळी .चालुद्या .

चौकटराजा

आता आमास्नी कळणा क्यी पीत वसन म्हंजी पिवळ्या रंगाच्या वस्त्राला म्य्हनत्यात की लाल रंगाच्या वस्त्राला बी पीतांबर म्हनत्यात .. .आं..... ?

जेनी...

अय्या खरच?:-o :(

पीत वसन ह्या शब्दामागे एवढे अलंकारिक अर्थ दडलेत?;)

ज्ञानोबा तुमचे आभारं आम्हिं कसे माणु ,तेचं कळतं नायि कि ओ आम्हाला :P

जेनी...

सोकाजी तुम्ही मग हिमेश च्या मूवीत ट्राय का नाय केला राव ..! :)

हिमेश रेशमियाला बाथरूम मध्यी गाऊन गाऊन सर्दी होते सारखी :(..
मग त्याचं नाक बिज्जी बिज्जी र्हातं ,आणि मग गाणं चक्क नाकातन्ण वाहात रहातं :P

बहुगुणी

स्पा: तुमच्या गाण्यांचे आणखी रेकॉर्डिंग्ज असले तर जरूर टाका, ऐकायला आवडतील.

मितभाषी

हेच बोल्तो.
स्पावड्या लै भारी...

चिगो

दोस्ता, आणखी किती कला आणि कळा दडल्याहेत रे बाबा तुझ्या अंगी ? लै भारी..