जुना पुराणा पिंपळ ...
जुना पुराणा पिंपळ
उभा नदीच्या तीरी ।
आल्या-गेल्या वाटसरूला
देई मायेची सावली ॥
जुना पुराणा पिंपळ
आटवांचा त्याला पार ।
पक्षांची मिरवी घरटी
अन् किडामुंगीचा वावर ॥
जुना पुराणा पिंपळ
त्याची हिरवी-पिवळी पाने ।
नव्या ऋतुंची पालवी
अन् जुन्या ऋतुंचे जाणे ॥
जुना पुराणा पिंपळ
त्याच्या किती कहाण्या ।
छायेत नाचती सजती
आठवणींच्या भिंगोर्या ॥
जुना पुराणा पिंपळ
विस्तारी चहू दिशांना ।
झेपावे उंच आभाळी
रूजवी मातीत मुळांना ॥
जुना पुराणा पिंपळ
सळसळतो पानोपानी
सरत्या किती क्षणांचा
तोच साक्षी मनोमनी ॥
जुना पुराणा पिंपळ
शोधी आसमंती काही ।
ढळता हिरण्यगर्भ तेथे
अन् शुष्क पर्णांच्या राशी॥
जुना पुराणा पिंपळ
खंतावे आज अंतरी ।
पायवाटही दिसेना
चाहूल नाही दूरवरी ॥
💬 प्रतिसाद
(14)
ज
ज्ञानराम
Wed, 10/03/2012 - 06:39
नवीन
खूपच आवडली... कविता.
छान
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
Wed, 10/03/2012 - 07:42
नवीन
सोपी रचना करता करता एकदम हिरण्यगर्भ असा शब्द वापरावासा का वाटावा बॉ?
- Log in or register to post comments
म
मनीषा
गुरुवार, 10/04/2012 - 05:11
नवीन
"सोपी रचना करता करता एकदम हिरण्यगर्भ असा शब्द वापरावासा का वाटावा बॉ?"
तसं काही विशेष कारण नाही. सूर्याची अनेक नावे आहेत त्यातील "हिरण्यगर्भ" या ओळीत 'फिट बसेल' असे वाटले म्हणून ..
- Log in or register to post comments
स
सुधीर
Wed, 10/03/2012 - 08:55
नवीन
शेवटाच्या कडव्यावरून रॉबर्ट मनीच्या पिंपळाची आठवण झाली.
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Wed, 10/03/2012 - 09:43
नवीन
अंगावर काटा आणणारे विदारक वृत्त. सव्वाशे वर्षांचा ज्येष्ठ वृक्ष. मुंबईत वृद्धांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहेच. ह्या वृद्ध वृक्षांकडेही आपुलकीने पाहावे.
काही ठिकाणी अडसर ठरणार्या वृक्षांच्या मुळांशी मीठाचे पाणी घालूनही त्यांना 'मारण्यात' येतं. नंतर म्युनिसिपालटीच्या परवानगीने असे वठलेले वृक्ष तोडण्यात येतात.
- Log in or register to post comments
म
मनीषा
गुरुवार, 10/04/2012 - 05:16
नवीन
धन्यवाद! लेख वाचला ..
आपल्या स्वार्थामधे अडसर ठरणारे काहीही मग तो जुना वृक्ष असो अथवा एखादी व्यक्ती, बाजूला सारण्यासाठी लोकं कुठल्या थराला जातील काही सांगता येत नाही.
- Log in or register to post comments
ज
जाई.
Wed, 10/03/2012 - 18:01
नवीन
कविता आवडली
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
गुरुवार, 10/04/2012 - 05:29
नवीन
कवितेचा आशय आवडला....
पण कविता रचनेत (यमकात) गंडली आहे, विशेषतः पहिल्या, चौथ्या आणि सातव्या कडव्यात!
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
- Log in or register to post comments
म
मनीषा
गुरुवार, 10/04/2012 - 05:52
नवीन
आभार !
बघते काही सुधारणा करता येते का ते ?
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
गुरुवार, 10/04/2012 - 15:39
नवीन
सुंदर आशय.. रचना जरा ठाक्ठीक करता येइलही पण तेवढ्या मेहनतीत, कल्पनाविस्तार करुन कदाचीत अजुन एक कविता रचता येइल. :)
- Log in or register to post comments
र
राघव
गुरुवार, 10/04/2012 - 22:04
नवीन
चांगले आहे. :)
राघव
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Fri, 10/05/2012 - 09:20
नवीन
कवितेचा आशय अतिशय आवडला.
- Log in or register to post comments
म
मनीषा
Sat, 10/06/2012 - 05:16
नवीन
सर्वांचे मनःपूर्वक आभार !
- Log in or register to post comments
ख
खुशि
Sat, 10/06/2012 - 12:27
नवीन
जुना पुराणापिम्पळ.कविता खुप आवडली. माहेरचा पिम्पळपार आठवला.
- Log in or register to post comments