खबरदारी -
तुला असे मुळूमुळू रडतांना पाहून,
मी थोडातरी विरघळेन,
असे वाटले असेल तुला -
माझ्या य:कश्चित जिवासाठी
तू तुझे हे अनमोल अश्रू ढाळतेस...
माझ्या रुक्ष चेहऱ्यावर जाऊ नकोस
माझ्या कठोर काळजातही
ते अश्रू जपून साठवताना -
माझी किती तारांबळ होत आहे
हे तुला न दिसण्याची मी
खबरदारी घेत आहे !
.
💬 प्रतिसाद
(10)
ज
ज्ञानराम
Wed, 10/10/2012 - 06:38
नवीन
खूपच छान . आवडले..
- Log in or register to post comments
अ
अमोल केळकर
Wed, 10/10/2012 - 07:22
नवीन
मस्त ...
अमोल केळकर
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Wed, 10/10/2012 - 08:02
नवीन
सुंदर....
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Wed, 10/10/2012 - 09:31
नवीन
याला कविता का म्हणायचे कळले नाही.. पहा.
तुला असे मुळूमुळू रडतांना पाहून मी थोडातरी विरघळेन असे वाटले असेल तुला -
माझ्या य:कश्चित जिवासाठी तू तुझे हे अनमोल अश्रू ढाळतेस. माझ्या रुक्ष चेहऱ्यावर जाऊ नकोस. माझ्या कठोर काळजातही ते अश्रू जपून साठवताना माझी किती तारांबळ होत आहे हे तुला न दिसण्याची मी खबरदारी घेत आहे !
- Log in or register to post comments
ग
गवि
Wed, 10/10/2012 - 09:51
नवीन
हे राम...!
- Log in or register to post comments
ग
गोमटेश पाटिल
Wed, 10/10/2012 - 09:55
नवीन
aata ramaala kashaalaa madhe odhatay???
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Wed, 10/10/2012 - 15:09
नवीन
आता संपादकांनीच 'राम' म्हटल्यावर आम्ही कुणाच्या तोंडाकडे पहावे सल्ल्यासाठी?
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Wed, 10/10/2012 - 13:58
नवीन
ह्याला काव्यात्मक विचार शृंखला किंवा मग एका चांगल्या कवितेचे 'रॉ मटेरियल' म्हणता येईल.
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
गुरुवार, 10/11/2012 - 04:08
नवीन
असल्या काव्यप्रकाराबद्दल रमेश तेंडूलकरांनी (तेच ते, सचिन तेंडूलकराचे वडील) यांनी चांगले विवेचन केले आहे. मला नक्की आठवत नाही. पण मी नंतर आठवून सांगण्याचा प्रयत्न करेन.
- Log in or register to post comments
ग
गोमटेश पाटिल
Wed, 10/10/2012 - 09:54
नवीन
snehankita kontihi kavita ashi panktit na lihita vakyat lihali tar ti kavita nahich vatayachi..... have tar dusari yekhadi prayatna karun baghaa....
- Log in or register to post comments