Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

टेंन्शन...

अ — अत्रुप्त आत्मा, Mon, 10/22/2012 - 16:45
वेळेवर झोपलं तरी,नीट झोप लागत नाय...! देवाधिदेवा यालाच , टेंन्शन म्हणावं काय??? ॥धृ॥ दिवसभराच्या थकव्यात, असं वाटत असतं... की कधी येकदा रातच्याला,आपलं घर दिसतं... पोटभर जेवून,एकदाचे पसरावे पाय...॥१॥ देवाधिदेवा यालाच , टेंन्शन म्हणावं काय??? ॥धृ॥ पोटासाठी कामाची वाट,तशिही चुकत नाही... समजा...आयतं मिळालं,तर मग सुखाची काय ग्वाही? सालं...असल्याच विचारानी टेंन्शनला,वेगवेगळे फुटतात पाय...॥२॥ देवाधिदेवा यालाच , टेंन्शन म्हणावं काय??? ॥धृ॥ ''हे'' म्हणे येणारच...,असं समजुन जगायचं असतं... नाहि आलं,तर..''अरे व्वा...!'',असंही म्हणुन बघायचं असतं... नक्की ''हे'' कसं आहे,काही अंदाजच लागत नाय...॥३॥ देवाधिदेवा यालाच , टेंन्शन म्हणावं काय??? ॥धृ॥ हल्ली टेंन्शन रिलिज करायला,वेगवेगळ्या गोळ्या मिळतात... संध्याकाळी सातला नाहि का???,जश्या काहि ठिकाणी पोळ्या मिळतात... त्या घेऊन याचा उतारा,मनासारखा मिळतो काय???...॥४॥ देवाधिदेवा यालाच , टेंन्शन म्हणावं काय??? ॥धृ॥ काहिवेळा टेंन्शन उतरायला,कविता आमची कामी येते... आमच्या अवजड मनाला,टेकण्यासाठी खांदा देते... मग शब्दांवाटे जातो आळस,जरा मोकळे होतात हात/पाय...॥५॥ देवाधिदेवा यालाच , टेंन्शन म्हणावं काय??? ॥धृ॥ चला...आता मन शांत झालं,कारण खरं उत्तर बाहेर आलं... मनही आमचं असच हाय,काढू तेवढी निघतात सालं... पुन्हा ''या'' टेंन्शनमधे, कविता येण्याची गॅरेंटी काय???...॥६॥ देवाधिदेवा यालाच , टेंन्शन म्हणावं काय??? ॥धृ॥

प्रतिक्रिया द्या
9320 वाचन

💬 प्रतिसाद (41)
त
तर्री Mon, 10/22/2012 - 16:59 नवीन
संध्याकाळी सातला नाहि का???,जश्या काहि ठिकाणी पोळ्या मिळतात... ( कहर ) आवडेश !
  • Log in or register to post comments
ल
लीलाधर Mon, 10/22/2012 - 17:00 नवीन
घेता टेन्शन कशाला असता अत्रुप्त कविता ऊशाला :-P
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Mon, 10/22/2012 - 21:50 नवीन
कविता आवडली असे कसे म्हणू कारण अ. आ. टेन्शनमध्ये आहेत हे वाचून बरे नाही वाटले.
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Mon, 10/22/2012 - 22:47 नवीन
आत्मा देवाचा धावा करतय .. =)) गुर्जि लय टेन्शन आलय बग्गा :-/
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 10/23/2012 - 04:51 नवीन
अत्रुप्तीच्या हिंदोळ्यावर झोके आलात घेऊन शाजीच्या अड्ड्यावर आलात पराठे खाऊन पोट लागले डचमळू रात्रीची झोप येईना काय देवाधिदेवा यालाच, टेंन्शन म्हणावं काय???
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 10/23/2012 - 05:12 नवीन
अत्ता बिझी आहे. त्यामुळे अगोबांस, रात्री जोरात उत्तर देण्यात येईल. :-b
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
पक पक पक Tue, 10/23/2012 - 16:14 नवीन
नाही तिथे चिमटा घेउन खोड त्यांनी काढ्ली, डचमळ्लेल्या पोटात आता बरीच खळ्बळ वाढली, काय उत्तर द्यावे ते सुचत नाही काय..? देवाधी देवा यालाच टेंन्शन म्हणावे काय..? :bigsmile:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ज
जेनी... Tue, 10/23/2012 - 06:12 नवीन
" ही " घेऊन बघा " हिनं " जातं असं म्हणतात , नाहि आलं तरि " थोडी मज्जा !" असहि घेणारे म्हणतात , नक्की "हिचा " उपयोग काय ,आपल्या डॉस्क्यात शिरत नाय देवाधिदेवा यालाच , टेंशन म्हणावं काय? :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
पक पक पक Tue, 10/23/2012 - 18:27 नवीन
नक्की "हिचा " उपयोग काय ,आपल्या डॉस्क्यात शिरत नाय देवाधिदेवा यालाच , टेंशन म्हणावं काय? एकदा घेउन बघाच आत्त्याबाई... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...
ज
जेनी... Tue, 10/23/2012 - 23:04 नवीन
वीकेंड टू वीकेंड'च' आम्ही " हिचा " उपयोग करतो ,;) आम्हाला आलेलं " हे " " हिच्या " माथी मारतो , :P खरं सांगायला ,आमच्या सोडुन आमी कुणाच्या बापाला भित नाय :) देवाधिदेवा 'ह्या'लाच टेंशन म्हणावं काय ||दु.|| :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 10/23/2012 - 18:16 नवीन
अगोबाचा बोरू चवताळल्यावरच तासतो मग शब्दांना मिळेल,तसे तो रंग फासतो. निष्कारण माझ्या खोड्या काढून,पळून जातो लाऊन पाय... देवाधिदेवा या अगोबाला... संपादक म्हणावे काय??? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
श
श्रीरंग_जोशी Tue, 10/23/2012 - 18:18 नवीन
इतका वेळ वाट पाहिल्याचे सार्थक झाले :-).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
पक पक पक Tue, 10/23/2012 - 18:22 नवीन
चालु द्या... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
न
नाखु Tue, 10/23/2012 - 05:43 नवीन
दोस्ताचा सल्ला "लई टेंन्शन घेतलं कि पेन्शन घ्यायला तुम्ही राहात नाही" सबब नो टेन्शन फक्त कधी मधी "अटेन्शन"
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 10/23/2012 - 06:02 नवीन
गुरुजींनाही टेंसन? गुरुजी टेन्शन येणारच संध्याकाळी ७ वाजता कोणी पोळ्या घेते का? प्रत्येक कामाची एक वेळ ठरली असते. संध्याकाळी ७ ला ठेंसन कमी करण्याचे औषध घ्या. मग बघा कसे टकाटक वाटते. या गुरुजीला संध्याकाळी एकदा भेटलेच पाहीजे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ल
लीलाधर Tue, 10/23/2012 - 06:14 नवीन
हे ठेंसन भलतचं दिसतीया पीरमात पडले की काय ब्वॉ ;) त्याशिवाय ठेंसनमध्ये पडनार न्हैत :-P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 10/23/2012 - 07:27 नवीन
http://ww.smashits.com/tyagi/kisi-ko-daulat-ki-tension/song-78688.html TENSION जाउदे उगाच आपण कशाला ठेंषण घ्या हे गाणं ऐका आणि ठेंषण फ्री व्हा. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लीलाधर
स
स्पा Tue, 10/23/2012 - 06:25 नवीन
अतिशय भावूक, करून जाणारी हळवी कविता.. <गवि मोड ऑन> आवंढा दाटून आलाय.. डोळे पाण्याने भरल्याने पुढच धूसर झालंय <गवि मोड ऑफ >
  • Log in or register to post comments
स
स्पा Tue, 10/23/2012 - 06:41 नवीन
प्रतिसाद का संपादित केला ब्वा.. कारण काही समजले नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
५
५० फक्त Tue, 10/23/2012 - 06:50 नवीन
' मन्या फेणे' आयडीवरुन दिला असता तर संपादित झाला नसता, संपादकांशी जास्त दुश्मनी ठेवु नये ना ठेवावी जास्त मैत्री संपादक आहेतच लई खत्री नेहमी सांगतात आमचे सोत्री.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
ग
गवि Tue, 10/23/2012 - 07:51 नवीन
मेल्या, संपादित कोण कशाला करेल उगाच..? जेव्हा एचटीएमएल सारखे " < " असे कंस टाकायचे असतील तेव्हा टेक्स्ट फॉर्मॅट फुल एचटीएमएल ठेवून कसे चालेल? मग ते कंस टॅगसारखे मानून गुप्तच नाही का होणार? "प्लेन टेक्स्ट" असा टाईप सिलेक्ट करत जा अशा वेळी.. आता वर प्लेन टेक्स्ट फॉर्मॅट करुन ठेवला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
स्पा Tue, 10/23/2012 - 08:23 नवीन
एक डाव माफी द्या गविजी :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
व
विश्वनाथ मेहेंदळे Tue, 10/23/2012 - 09:32 नवीन
तुला काय वाटले, तुझ्या प्रतिसादांचे रिअल टाईम स्क्रीनिंग चालू आहे? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
क
कवितानागेश Tue, 10/23/2012 - 08:14 नवीन
अतिशय भावूक, करून जाणारी हळवी प्रतिक्रिया.. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
सूड Tue, 10/23/2012 - 14:53 नवीन
आवंढा दाटून आलाय.. डोळे पाण्याने भरल्याने पुढचं धूसर झालंय काळजी घे हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
स्पा Tue, 10/23/2012 - 06:50 नवीन
असो
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 10/23/2012 - 06:58 नवीन
साला एक टेंशन आदमी को कविता करनेकु मजबुर करता हयं ! ;)
  • Log in or register to post comments
त
तलाठी Tue, 10/23/2012 - 07:40 नवीन
कविते मुळे आजचा दिवस टेन्शन लेस....
  • Log in or register to post comments
म
मितभाषी Sat, 10/27/2012 - 07:13 नवीन
कविते मुळे आजचा दिवस टेन्शन लेस....
हाहाहा हे लै भारी बरका आप्पा, एका पिशवीत आख्खं गाव कोंबून, सगळ्या गावाला टेंशन देणार्‍यालाही टेंशन असते ही नविन माहीती मिळाली. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तलाठी
स
सूड Tue, 10/23/2012 - 14:55 नवीन
कविता शष्प काही कळली नाय हो गुर्जी!! किती क्लिष्ट लिहिता, समजेल असं तरी लिहा.
  • Log in or register to post comments
म
मोदक Tue, 10/23/2012 - 22:49 नवीन
मोठ्या भावाने छोट्या भावाच्या हातावर हात मारला आहे इतके मला समजले... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 10/27/2012 - 05:42 नवीन
काहिंन्ना आलं,काहिंन्नी दिलं,काहिंन्नी घेतलं... असो येकंदरित टेंन्शनचा सगळ्यांनाच फायदा झाला म्हणायचा ;-)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 10/27/2012 - 05:51 नवीन
पण तुमच्या टेन्शनचे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
म
मितभाषी Sat, 10/27/2012 - 06:30 नवीन
बुवा फार टेंशन घेवू नका. यंदा बार उअडवून द्या. ;)
  • Log in or register to post comments
स
सूड Sat, 10/27/2012 - 07:09 नवीन
त्यांच्या धौतीयोगचूर्णजनित कविता कमीयेत का ? बार उडवायची अजाबात गरज नाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 10/27/2012 - 11:21 नवीन
@वल्ली - Sat, 27/10/2012 - 09:51 पण तुमच्या टेन्शनचे काय?>>>>>>>> ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लू :-p @धौतीयोगचूर्णजनित कविता कमीयेत का ?>>> Image removed. या सुडक्याला गाडा रे कुणितरी ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 10/27/2012 - 11:17 नवीन
@यंदा बार उअडवून द्या. >>> Image removed. हू आर यू :-p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी
म
मितभाषी Sun, 10/28/2012 - 06:41 नवीन
हू आर यू
तुला सासरकडून धनलाभ होईल अशी भविष्यवाणी वर्तवणारा ज्योतीषी..... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 10/28/2012 - 11:47 नवीन
@अशी भविष्यवाणी वर्तवणारा ज्योतीषी.....>>> ख्याक.....! मांज सासर खैलिकडं असेल??? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी
च
चौकटराजा Sat, 10/27/2012 - 14:25 नवीन
सगळं रीतसर झालं गुर्जी, बोले तो यजमान फक्त केळे खिचडी ठेवून करतो तो सन्मान दक्षिणेचं नाव मात्र जाम काढत नाय अत्रुप्त गुर्जी जे येतं त्याला टेन्शन म्हणायचा काय .... ?
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Sat, 10/27/2012 - 15:50 नवीन
अबब... केवढी मोठी ही कविता! सगळे मिपाकर सांघिक कविता तयार करतायत. प्रत्येक प्रतिसादागणिक एक एक कडवे वाढ्ते आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा