Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रख्स-ए-बिस्मिल (DANCE OF A WOUNDED)

ह — हरवलेल्या जहाजाचा कप्तान, Wed, 10/31/2012 - 03:14
या शहरात, इंद्रियांची भूमिका विस्तारते क्षणोक्षणी. देह शिणत नाही. पण, जीव शिणतो नेमाने. इथेही आहेत वारुळांचे चक्रव्युह, सनातन वेदनांचे अमानुष पर्याय, गिधाडं-प्रेतांच्या बेगुमान वस्त्या, सावलीला दिवस आणि करुणेला रात्र. इथे काळोखाच्या ओठांतून, बर्फाळ प्रार्थनाही वाहत जातात, अवरोधाच्या उगमाकडे. भळाभळा अस्तित्व सांडत गर्दी जगत रहाते, होकार नकारांमध्ये अडकलेल्या ऐतिहासिक आवृत्त्या... इथल्या किंकाळीतच, नग्न आत्म्याचा देह वस्रांसकट जन्म घेतो. भयमग्न आवेगात देह नग्न होतो. आत्मा वस्र घेतो... या गर्दीतच माझाही चेहरा असतो हुबेहूब. सुरा घेतलेले तरुण आणि फुलं माळलेल्या बायकांमध्ये. आणि मी असतो, काळोख जगणारया शरीरात, भूकेच्या टोलांवर, जीवाला झोके देत. सर्वांसह, स्वतःच्या खुनाचे निर्विकार कट रचत. मनातल्या मनात मात्र, पलिकडचे डोळे खुणावून सांगतात, 'हे संदर्भ मिटले जावेत. ही नियती पुसली जावी. मौनाची रौद्र गाज रक्तातून कानी यावी. पैलु पाडलेल्या मुठींना शुळांचे कोंभ फुटावे. बंद देहाच्या अवयवांनी दार मोकळे करावे. माझाही व्हावा सर्वनाश माझ्याशिवाय.' तेव्हा शुभ्र शांततेच्या एकांतात खुंट तोडुन, बेहोष वेदनेत मी सुगंध नाचवत नेईन, क्षितिजाच्या पारावर जिवंत होईल, रख्स-ए-बिस्मिल! a (पूर्वप्रकाशित: नवाक्षर दर्शन, जुलै २०१२)

प्रतिक्रिया द्या
2393 वाचन

💬 प्रतिसाद (8)
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 10/31/2012 - 06:33 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 10/31/2012 - 07:24 नवीन
तुफान आहे.... हि रचना अनुवाद आहे? कि आपणचं लिहीली आहे?
  • Log in or register to post comments
ह
हरवलेल्या जहाज… Wed, 10/31/2012 - 08:01 नवीन
हा अनुवाद नाही. ही माझीच कविता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
क
कवितानागेश Wed, 10/31/2012 - 10:22 नवीन
मला शेवटचे कडवे कळले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
त
तर्री Wed, 10/31/2012 - 08:06 नवीन
काही चमकदार शब्द रचना आहेत पण तरीही कविता काहीशी शब्द बंबाळ वाटली. नाही आवडली असे मात्र नाही.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Wed, 10/31/2012 - 08:57 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
न
निरन्जन वहालेकर Sat, 11/03/2012 - 16:31 नवीन
काहीच समजले नाही बुवा.क्षमस्व.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 11/03/2012 - 17:45 नवीन
मस्तमौला जगताना आपण हस्तिदंती मनोर्‍यात राहून चालत नाही. कदाचित जगणंच मुश्कील होऊन जातं. चित्रं कवितेसाठी चपखल वाटलं; ते ही आवडलं.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा