जे न देखे रवी...
तुझी याद..
Primary tabs
तुझी याद आली पहाटे पहाटे
जणु चांदण्याला खुली रात भेटे
तुझा स्पर्श होता तनु मोहरावी
मिठीने तुझ्या रातराणी फुलावी
तुझ्या सोबती रात्र व्हावी सुगंधी
फुलांनी ही हेवा करावा मनी
तुझे हट्ट सारे तुझ्या मागण्या या
तुला सावरीता मी हरवुन जावे
तुझे स्वप्न डोळ्यात जागेपणी ही
मला जाणवे की तुझे स्वप्न मी
दुरावा जरी हा तरी ओढ वाटे-
तुझी याद आली पहाटे पहाटे
छान, कविता अशीच प्रवाही हवी.
तुमच मूळ नाव कळ्ल तर बर होइल
मस्त कविता केली आहे.
तुझा स्पर्श होता तनु मोहरावी
मिठीने तुझ्या रातराणी फुलावी
तुझ्या सोबती रात्र व्हावी सुगंधी
फुलांनी ही हेवा करावा मनी
हे तर सहीच.
तुझा स्पर्श होता तनु मोहरावी
मिठीने तुझ्या रातराणी फुलावी
तुझ्या सोबती रात्र व्हावी सुगंधी
फुलांनी ही हेवा करावा मनी
हे लय भारी.....
(रातराणीच्या सुंगधाचा प्रेमी)
मदनबाण.....
छान नादमय कविता, आवडली!
तुझी याद आली पहाटे पहाटे
जणु चांदण्याला खुली रात भेटे
-फटू
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
तुझे स्वप्न डोळ्यात जागेपणी ही
मला जाणवे की तुझे स्वप्न मी
दुरावा जरी हा तरी ओढ वाटे-
तुझी याद आली पहाटे पहाटे
क्या बात है फुलवा ... अजुन एक नितांतसुंदर कविता .. धन्यवाद !
धन्यवाद -शीतल्,पुश्कराज,फटू,मदन्बाण्,कौस्तुभ..
मनापासुन धन्यवाद