Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पराभव...

च — चन्द्रशेखर गोखले, Fri, 11/02/2012 - 22:03
मी जेव्हा उभा रहातो स्वतः विरुद्ध लढायला.. तेव्हा लक्षावधी विचारांच्या झुंडीच्या झुंडी घेरतात मला निमिषार्धात.. मी एकटा केविलवाणा दुर्बल.. सुळावर चढवलं जातय मला... विचारांचा एक एक बोचरा खीळा ठोकला जातोय माझ्या मेंदुत हृदयात, शरीराच्या प्रत्येक संवेदनशील भागावर प्रचंड अत्याचार...!! सुटण्याची असहाय्य धडपड..!!! त्यागर्दीत लुप्त झालाय माझा आवाज माझा मलाच ऐकु येत नाही माझा आक्रोष.. मी घाबरलेला भेदरलेला अखेर शरण जातो विचारांच्या मुर्दाड झुंडी पुढे नको नको हा सूळ ,उतरवा मला खाली माझा अगतीक विलाप.. पुन्हा विद्रोह न करण्याच्या अटीवर अखेर उतरवलं जातं मला सूळावरुन... रडतोय मी ढसढसा... पराभावाचे शूळ अजून अजून सलताहे मला नाही नाही जमलं मला ख्रिस्त होणं.. आपुले मरण असहाय्य डोळा विद्रोहाचा खीळा नको मज..... :(

प्रतिक्रिया द्या
1705 वाचन

💬 प्रतिसाद (8)
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 11/03/2012 - 02:48 नवीन
ब्वार...ब्वार... ठिक आहे. ;-)
  • Log in or register to post comments
न
निश Sat, 11/03/2012 - 07:11 नवीन
चन्द्रशेखर गोखले साहेब, अप्रतिम कविता. आशय फार सुंदर आहे तितकाच मन सुन्न करणारा आहे. एक सुरेख कविता.
  • Log in or register to post comments
न
निरन्जन वहालेकर Sat, 11/03/2012 - 17:02 नवीन
पराभावाचे शूळ अजून अजून सलताहे मला नाही नाही जमलं मला ख्रिस्त होणं.. आपुले मरण असहाय्य डोळा विद्रोहाचा खीळा नको मज..... सुन्दर ! आवडली कविता ! !
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 11/03/2012 - 17:08 नवीन
आवडली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सावकार स्वप्निल Mon, 11/05/2012 - 13:45 नवीन
सुंदर आवडली बुवा आपल्याला!
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Mon, 11/05/2012 - 13:59 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Mon, 11/05/2012 - 15:44 नवीन
वाचताना अंगावर काटा आला. सुंदर कविता.
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 11/08/2012 - 07:00 नवीन
बोचलं. राघव
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा