Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

असतेस घरी तू जेव्हा.....

म — माम्लेदारचा पन्खा, Sat, 11/03/2012 - 09:07
(संदीप सलील यांची माफी मागून सगळ्या हतबल पुरुषांसाठी नवीन स्त्रीसूक्त) असतेस घरी तू जेव्हा... जीव उंदराएवढा होतो..... कुत्रं लागल्यागत मागे... मी इकडे तिकडे पळतो.... भूत पाहून बोबडी वळावी बर्फाळ तसा मी होतो... तुझी नजरच खलास करते.. अन देहच आडवा होतो........ येतात शेजारी दारापाशी.... उत्साहाने उजळती तोंडे........ कुणी हळूच डोकावले घरी.... तर त्यालाही प्रसाद मिळतो.... तव भीतीत थरथरणार्या... मज स्मरती हजार वेळा........ मार खाऊनच बाहेर पडावे... हा असाच शेवट होतो..... तू संग सखे मज काय मम गुन्हाच नक्की कसला? आयुष्याचा हा एक त्रास न कळेना कधी हा संपतो?? जरी झालो तुझाच नवरा ना शूर मी अजुनी झालो....... दर वेळी जाणवत राहते.... मी कायमचा अडकलो.....!!

प्रतिक्रिया द्या
2818 वाचन

💬 प्रतिसाद (11)
व
वडापाव Sat, 11/03/2012 - 09:19 नवीन
बायको भलतीच गरम डोक्याची दिसते. तुमच्याकडचा

पंखा

चालू करा, डोकं थंड होईल.
  • Log in or register to post comments
न
निश Sat, 11/03/2012 - 10:44 नवीन
माम्लेदारचा पन्खा साहेब, कविता मस्त झाली आहे. काही दिवसानी बहुतेक पती मुक्ती सेना काढतील त्रासलेले काही पती लोक. असो विडंबन मस्त जमल आहे.
  • Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख Sat, 11/03/2012 - 10:53 नवीन
काही दिवसानी बहुतेक पती मुक्ती सेना काढतील त्रासलेले काही पती लोक. सगळ्याच बायका तशा नसाव्यातImage removed.
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Sat, 11/03/2012 - 11:29 नवीन
काय पण :-/ बायकांची अ‍ॅलर्जिये का ओ ?? विडंबन म्हणुन चालवुन घेतोय आम्ही ... लेकीन याद रखना . आगेकू बाई के बारे मे लिख्तेवक्त सावधानी बरतो :-/ ;)
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Mon, 11/05/2012 - 10:57 नवीन
अगं पूजा, 'अदखलपात्र' गुन्ह्यांची कशाला इतकी फिकिर करतेस ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...
म
माम्लेदारचा पन्खा Sat, 11/03/2012 - 11:40 नवीन
कवितेतला पुरुष इतका अगतिकपणे विनवतोय हा समस्त स्त्रीजातीचा विजयच नव्हे काय ? मनातले विचार मांडायला कायद्याने सुद्धा परवानगी दिलेली आहे.... मला वाटलेच होते की काही शक्ती ह्यावर प्रतिसाद देतील म्हणून नजर रक्षा कवच विकत घेतलं आणि मगच विडंबन प्रकाशित केलं !
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 11/05/2012 - 11:22 नवीन
कवितेतला पुरुष इतका अगतिकपणे विनवतोय हा समस्त स्त्रीजातीचा विजयच नव्हे काय ?
हॅ हॅ... एवढं एक्स्प्लेनेशन देताय.. घाबरलात की काय? घाबरायचं नाही. आपण शांतताप्रिय आहोत ना? मग शांततामय मार्गाने निर्भीडपणे आणि ठामपणे आपलं मत मांडायचं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
व
विश्वेश Mon, 11/05/2012 - 10:35 नवीन
तव भीतीत थरथरणार्या... मज स्मरती हजार वेळा........ मार खाऊनच बाहेर पडावे... हा असाच शेवट होतो..... वा क्या बात ... (X 3)
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Mon, 11/05/2012 - 11:38 नवीन
गवि,तुमचं म्हणणं रास्त आहे पण तरीही असं करावं लागतं.... गांधींनी सुद्धा सत्याग्रह केला पण त्यानाही ब्रिटिशांच्या लाठ्या चुकल्या नाहीत ! आपण शाकाहारी असलो तर वाघ आपल्याला खायचं सोडेल का?
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 11/05/2012 - 11:59 नवीन
गांधींनी सुद्धा सत्याग्रह केला पण त्यानाही ब्रिटिशांच्या लाठ्या चुकल्या नाहीत !
म्हणून त्यांनी लाठीच्या भीतीने "पहा आम्ही सर्वजण तुमच्यावर शस्त्र न उगारता मैदानात शांतपणे उपोषणाला बसलो आहोत म्हणजे हा तुमचा विजयच झाला" असं ब्रिटिशांना म्हटलं नाही.. लाठ्या पडल्या तरी बेहत्तर.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
म
माम्लेदारचा पन्खा Mon, 11/05/2012 - 12:00 नवीन
आज जिहाद करायच्या उद्देशानेच आलेले दिसताय !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा