पाककृती
मूग पोहा कटलेट
Primary tabs
साहित्यः भिजवलेले जाड पोहे १ वाटी,उकडलेले मूग अर्धी वाटी ( थोडेसे उकड्वावे जास्त मऊ नको), १ कांदा बारीक चिरलेला, साखर पाव चमचा, मीठ चवीप्रमाणे, १ चमचा लिंबाचा रस, १ चमचा आल हिरवी मिरची पेस्ट. १ उकडवलेला बटाटा.पाव वाटी रवा.
क्रूती : प्रथम भिजवलेल्या पोह्यामध्ये उकडलेले मूग्,उकडलेला बटाटा, कांदा व बाकी साहित्य घालावे.मिश्रण हलक्या हाताने मळून त्याचे आपल्याला हव्या त्या शेप मध्ये कटलेट बनवावे, रव्यामध्ये घोळवून तळावेत अथवा तव्यावर तेल घालून भाजावेत. कोथींबीर , हिरवी मिरची व पुदीन्याच्या चटणी बरोबर खायला द्यावेत. शक्यती गरमच खावेत.
फटूशिवाय प्रतिसाद मिळत नाहीत हो.
फटूशिवाय प्रतिसाद मिळत नाहीत.
-दिलीप बिरुटे
(पाककृतींचे केवळ फटु पाहणारा)
आणी परतिसादाशिवाय मान्यता(दत्त नव्हे)
मस्त आहे.छान लागेल.
काय छान लागेल ?
काय मस्त आहे?
कुणी सांगाल का मला ? :(
फोटू कुठे?
पाकॄ चांगली आहे... करुन बघायला पाहिजे..
फोटो पाहिजे होता ;)
पोहे आणि मुगाचे कटलेट ,छान कल्पना आहे !
http://mejwani.in/
फोटो ?