Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्वार्थ..

र — राघव, गुरुवार, 11/08/2012 - 06:51
स्वार्थामधेच सारा आनंद मानतो मी! निस्वार्थ म्हणविणारा नसत्या भ्रमात आहे! ऐसे अनेक आले.. आले तसेच गेले.. माझी इथेच सत्ता तरीही भरात आहे.. संतांस काय जाते नीती जपा म्हणाया.. नाही सुखास म्हणणे अवसानघात आहे धर्म-अधर्म सारे कोळून प्यायलो मी.. आता मिजास माझी.. तुमची वरात आहे.. -- चघळून रक्त अपुले, कुत्रा सुखावतो ना? आमीष हाडकाचे.. अन्‌ मी सुखात आहे! राघव

प्रतिक्रिया द्या
1718 वाचन

💬 प्रतिसाद (8)
क
कवितानागेश गुरुवार, 11/08/2012 - 12:07 नवीन
:)
  • Log in or register to post comments
न
निश गुरुवार, 11/08/2012 - 13:30 नवीन
राघव साहेब, कविता लय भारि आहे.
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे गुरुवार, 11/08/2012 - 13:52 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश
ज
जेनी... गुरुवार, 11/08/2012 - 17:24 नवीन
:)
  • Log in or register to post comments
स
स्पंदना गुरुवार, 11/08/2012 - 23:55 नवीन
पहिल कडव थोड वेगळ होत का पहा, कारण नंतरची गझल नकळत सुरात जाते, पण पहिल्या दोन ओळी मुक्त कवितेचा भास आणताहेत. टु बी ट्रु, पहिल कडव सोडुन बाकिची कविता अत्त्युत्तम. सुरेख! सुंदर!!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 11/09/2012 - 01:11 नवीन
ह्हे ह्हे ह्हे.... :-)
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Fri, 11/09/2012 - 04:25 नवीन
धर्म-अधर्म सारे कोळून प्यायलो मी.. आता मिजास माझी.. तुमची वरात आहे.. हे मस्तच!
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 11/09/2012 - 04:40 नवीन
कविता कविता आहे समजुन तेवढ्यापूरती समजुन घ्यायची की काथ्याकूट करायचा हा एक फार सनातन प्रश्न आहे...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा