Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तडकलेली स्वप्न काच

क — कल्पी जोशी, गुरुवार, 11/08/2012 - 18:22
तडकलेली स्वप्न काच पायात् रुतलेली अन पाऊल पुढं टाकता टाकता माझी मी खचलेली एक फ़र्लांगभर दूर एका मंदिरातला घंटानाद ऐकुन ,पुन्हा माजघरात रडत बसते फ़ुटेस्तोवर ऊर मापं ओलांडल्याच्या पाऊलखुणा अजुनही घाबरवतात थोडी जरा मागे फ़िर बजाऊन किंकाळतात चौकटितल्या आत एक देवघर देवघरातली ज्योत पाठीवर हात फ़िरवताना सांगत असते.....बाईचं जिणं असच असतं मापाच कलंडण... पैजणाच्या सुरात शेवटपर्यत रुणझुणत असतच श्वासातली काही नावं अस्पष्टच हुंकारतात ऐकुन न ऐकल्यासारखी कानात धुसफ़ुसतात कल्पी जोशी

प्रतिक्रिया द्या
2174 वाचन

💬 प्रतिसाद (13)
स
स्पंदना गुरुवार, 11/08/2012 - 23:58 नवीन
छान आहे कविता. मला आवडली.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Fri, 11/09/2012 - 04:56 नवीन
तस्सा कवितेचा औरंगजेब आहे पण ही कविता छान वाटली आणी आवडली.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानराम Fri, 11/09/2012 - 05:27 नवीन
खूपच छान... डोळे भरून आले :(
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 11/09/2012 - 05:59 नवीन
कविता सुरेख आहे. खूप आवडली.
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 11/09/2012 - 06:16 नवीन
चांगली झाली आहे कविता. एकदम जमून आली आहे.
  • Log in or register to post comments
य
यन्ग्या डाकु Fri, 11/09/2012 - 06:18 नवीन
आवडेश.............. :)
  • Log in or register to post comments
अ
अमृत Fri, 11/09/2012 - 07:17 नवीन
अमृत
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Fri, 11/09/2012 - 08:00 नवीन
खुप छान जमलीय कविता.
  • Log in or register to post comments
न
निश Fri, 11/09/2012 - 08:15 नवीन
कल्पी जोशी जी, कविता उत्तम झाली आहे.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 11/09/2012 - 08:19 नवीन
वाहव्वा.....! :-)
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Fri, 11/09/2012 - 08:24 नवीन
"श्वासातली काही नावं अस्पष्टच हुंकारतात ऐकुन न ऐकल्यासारखी कानात धुसफ़ुसतात" मस्त.. आवडली कविता..
  • Log in or register to post comments
ग
गुमनाम Fri, 11/09/2012 - 11:49 नवीन
सुरेख कविता!!!
  • Log in or register to post comments
क
कल्पी जोशी Fri, 11/09/2012 - 13:42 नवीन
मनापासून धन्यवाद ,कालच प्रवेश घेतला आणि भरघोस प्रतिसाद मिळालेले बघुन आनंद झालाय्,पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा