Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आणि अचानक त्या वेळी..

ह — ह भ प, Fri, 11/09/2012 - 08:53
त्या दिवशी अचानक तुझी पुन्हा भेट झाली, तुला पाहताच माझ्या मनी जुन्या आठवणींची कालवाकालव झाली.. आठवले ते मोरपंखी दिवस तुझ्या सहवासात घालवलेले, आठवले ते सोनेरी क्षण तुझ्या परीसस्पर्शाने बहरलेले.. आठवले ते तासन-तास तुझ्याच प्रतिक्षेत घालवलेले, आठवली ती प्रेमपत्रे तुझ्या मैत्रिणींद्वारे तुला धाडलेली.. प्रेमाचा शिडकावा करुन तु नकळत मला सोडुन गेलीस, आणि आज इतक्या महिन्यांनी पुन्हा माझ्या सामोरी आलीस.. आज तुला असं समोर पाहुन काय बोलावं तेच कळत नाही, तुझी खुशाली विचारायला साधा शब्दसुद्धा सुचत नाही.. वाटलं माझ्या मनाला विचारावं तुला 'सोडन का गेलीस मला?' आणि अचानक त्या वेळी तुच म्हणालीस मला, खुप विसरायचा प्रयत्न केला.. पण विसरु शकले नाही मी तुला.. (ही कविता १ जून २००५ साली लोकसत्ताच्या चतुरा मासिकात प्रसिद्ध झालेली आहे. विशेष म्हणजे "आणि अचानक त्या वेळी" ही ओळ कवितेत असणं अपरिहार्य होतं. म्हणजे या एका ओळी वरुन स्फुरलेली ही कविता आहे. माझे परम मित्र श्री. अजय धोंडीबा शेरे, पुणे यांनी कवितेचा केलेला हा पहिला वहिला प्रयत्न होता, आणि तिच कविता छापुन देखिल आली.)

प्रतिक्रिया द्या
1183 वाचन

💬 प्रतिसाद (1)
र
रसायन Tue, 11/20/2012 - 09:27 नवीन
प्रयत्न चांगला आहे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा