Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मनातलं सांगताच येईना ...

ज — जेनी..., Fri, 11/09/2012 - 15:50
शब्दाशब्दांवर तुझा हक्क मला नाकारता येईना अक्षरांची जुळवणी अर्थाचा अनर्थ करतेय ... वेदनेची बारीक कळही मला दाखवता येईना भरत आलेल्या जखमांचीच परत खपली निघतेय ... नातं होतंच कुठे? पण जे होतं ते मला आता निभवता येईना श्रावणातल्या सरींनी भिजूनही कोरडेच थेंब पुसतेय ... आठवणींची पानं पलटली तरी अजिबातच आवाज होईना कधीतरी तुला आठवण येईल आसवांची समजुत घालतेय ...

प्रतिक्रिया द्या
4682 वाचन

💬 प्रतिसाद (26)
र
रेवती Fri, 11/09/2012 - 15:52 नवीन
कविता आवडली. पहिल्या कडव्यात आणि शेवटच्या खूप अंतर आहे असं वाटतय.
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Fri, 11/09/2012 - 15:54 नवीन
म्हणजे गं ?? थोडं अर्थ लावुन सांगना .मला कळेना .:(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Fri, 11/09/2012 - 16:30 नवीन
भावनांमध्ये वेगळेपणा वाट्टोय. जसं की पहिल्यांदा बुवा आणि बाई एकत्र आहेत नंतर मात्र लांब राहतायत किंवा म्हातारी एकटी उरलीये टाईप. वाईट किंवा चांगलं असं काही नाही. कविता वाचल्यावर एकदम काहीतरी मिसींग असल्यासारखं. (मला कवितांमधलं फारसं ज्ञान नाही हेही आहेच.;))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...
स
सस्नेह Fri, 11/09/2012 - 16:43 नवीन
कवितांमधलं फारसं ज्ञान मलाही नाही, पण सदर कविता वाचल्यावर काहीतरी 'टच' करून जातं , एवढं मात्र खरं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
ज
जेनी... Fri, 11/09/2012 - 16:49 नवीन
रेवा आज्जी . ओह्ह ... ! थँक्स रेवा आज्जी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
ल
लीलाधर Fri, 11/09/2012 - 16:02 नवीन
येता तूझ्या मनी :) फारच छान ;)
  • Log in or register to post comments
द
दादा कोंडके Fri, 11/09/2012 - 16:04 नवीन
पण,
वेदनेची बारीक कळही मला दाखवता येईना भरत आलेल्या जखमांचीच परत खपली निघतेय ...
जम्या नाही. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
त
तर्री Fri, 11/09/2012 - 16:15 नवीन
चौथ्या ओळीत यमक आहे आणि भावना आहेत. मुक्त ही नाही आणि मीटर मध्ये ही नाही.
  • Log in or register to post comments
इ
इनिगोय Fri, 11/09/2012 - 16:47 नवीन
आठवणींची पानं पलटली तरी अजिबातच आवाज होईना कधीतरी तुला आठवण येईल आसवांची समजुत घालतेय ...
अशा वेड्या समजुतीच कधी कधी उद्यावर विश्वास ठेवायला लावतात. कधी ना कधी ही वेदना जिथून आली तिथे पोचती होईल, याची वाट पाहायला लावतात.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 11/09/2012 - 17:23 नवीन
छान लिहिलंय.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 11/09/2012 - 17:34 नवीन
मस्त मस्त गो बालिके,मस्त...! :-)
  • Log in or register to post comments
म
मुकुन्द पेद्नेकर Fri, 11/09/2012 - 17:40 नवीन
आसवान्चि समजुत घालतेय --हि भावना आवदली
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 11/09/2012 - 18:26 नवीन
ठाकून ठोकून कविता केली आहे असं वाटलं. म्हणजे मुद्दाम वेगळं काही करायच्या प्रयत्नात लय पण आली नाही आणि रेवतीने म्हटल्यासारखं एकसंध परिणाम वाटला नाही. चमत्कृतीपूर्ण शब्दरचना करण्याच्या नादात अर्थाकडे दुर्लक्ष करून उपयोग नाही. पूजा आज्जे, एवढं कडक लिहिल्याबद्दल "सॉरी" म्हणते. पण खरोखरच बात कुछ जमी नहीं. तू याहून खूप चांगली कविता लिहू शकतेस हे माहिती असल्यामुळेच जे वाटलं ते सपष्ट लिहिलं आहे.
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Fri, 11/09/2012 - 18:34 नवीन
=)) =)) पै बै टेन्शन नै लेनेका ;) बिनदास कमेंटनेकाा :D :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
श
श्रीरंग_जोशी Fri, 11/09/2012 - 19:21 नवीन
प्रयत्न चांगलाच आहे पण आजच्या युवा पिढीने असे देवदासछाप काही लिहिले की मला तरी बरे वाटत नाही. पण कलेचा एक प्रकार म्हणून ठिक आहे. पूजा एखादे रोखठोक, सकारात्मक, प्रेरणादायी काव्य येऊदे...
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Sat, 11/10/2012 - 14:03 नवीन
आजच्या युवा पिढीने??????? तुमचे वय कितीये हो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्री गावसेना प्रमुख Sat, 11/10/2012 - 14:17 नवीन
Image removed.वय वर्ष १२५
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अभ्या.. Fri, 11/09/2012 - 21:42 नवीन
शीर्षक एकदम परफेक्ट. नाय आलं तुला सांगता. :( काय होतं, काय आहे हे कळत नाहीये बिल्कुल :( कुठलीतरी वेदना आहे पण ती सुध्दा कशाची आहे कळले नाही.
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Fri, 11/09/2012 - 22:28 नवीन
एक्झॅटली .अब्या .. म्हणुनच हे नाव दीलं कवितेला . नेमकं जे वाटतय ते मांडताच आलं नाहि ... च्यामारी ..मनातलं सांगताच येईना :-/ असो ,कविला\कवयित्रिला परिक्षकांच्या योग्य परिक्षणाची खरच गरज असते , त्याशिवाय त्याला\तिला कविता फुलवायला इंटरेस्ट येत नाहि . आपणच लिहुन आपणच वाचुन चांगलं वाईट म्हणन्यात अज्जिब्बात मज्जा नसते . त्यातल्या चुका ,चांगलं ,वाईट ,पोचलेल्या भावनांची पोचपावती ह्या सगळ्याच गोष्टी वाचकांकडुन ऐकन्यात मजा .. सगळ्यांना धन्यवाद ......! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
श
श्री गावसेना प्रमुख Sat, 11/10/2012 - 13:53 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...
स
संजय क्षीरसागर Sat, 11/10/2012 - 08:07 नवीन
कविता एकदम शुद्ध आणि प्रतिसाद पूजा स्टाईलमधे...
चांगलं वाईट म्हणन्यात, वाचकांकडुन ऐकन्यात मजा
अर्थात, या ओळी मस्त जमल्या आहेत :
अक्षरांची जुळवणी अर्थाचा अनर्थ करतेय ...
नातं होतंच कुठे? पण जे होतं ते मला आता निभवता येईना
आठवणींची पानं पलटली तरी अजिबातच आवाज होईना
आणि या ओळी एकदम खल्लास!
कधीतरी तुला आठवण येईल आसवांची समजुत घालतेय ...
कवितेचं मीटर आणि फ्लो बरोबर आहे
  • Log in or register to post comments
ख
खटासि खट Sat, 11/10/2012 - 08:11 नवीन
पॉ पॉ पॉ पॉ पॉ
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Sat, 11/10/2012 - 13:33 नवीन
नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
ज
जेनी... Sat, 11/10/2012 - 14:28 नवीन
अरे त्यांनापण माझ्यासारखच ' मनातलं सांगताच येईना ' बहुतेक :-/ :P :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
म
मृगनयनी Sat, 11/10/2012 - 16:04 नवीन
पू ssssssssssss.... सुन्दर टची कविता!!...
आठवणींची पानं पलटली तरी अजिबातच आवाज होईना कधीतरी तुला आठवण येईल आसवांची समजुत घालतेय ...
अ प्र ति म ! ! ! :) आवडली कविता!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...
न
निश Mon, 11/12/2012 - 10:24 नवीन
पूजा पवार जी , कविता आवडली
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा