Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

केव्हा तरी पहाटे...

ए — एस, Fri, 11/09/2012 - 20:53
आकाश तारकांचा उतरून साज गेले अर्धोन्मिलीत नयनी एक स्वप्न साजलेले हा मंदगंध वारा विसरून तोच गेला निष्पर्ण सावलीचे एक पर्ण तरंगलेले बेधुंदल्या कळ्यांचे निःश्वास दाटलेले उन्मीलनाचे स्वप्न स्वप्नात पाहिलेले हलक्याच पावलांची ती वाट धुकटलेली स्मृतिगंधल्या मनांचे हृदय स्पंदलेले पौगंडल्या उषेचा प्रियकर नभी तो आला थरारले अधरही, आरक्त गाल झाले निस्तब्ध शांतताही विस्कटून सारी गेली पंखांतली कुजबूज, आसमंत व्यापलेले चेहर्‍यावरी बटांचे रेंगाळणे उगाच निःश्वासही उगाच, उगाच कूस बदलणे शराबल्या नजरेनं मनपक्षी कैद केला पुन्हा त्याच मिठीत हरवून सारे गेले...

प्रतिक्रिया द्या
1930 वाचन

💬 प्रतिसाद (2)
स
सस्नेह Sat, 11/10/2012 - 10:27 नवीन
मला कवितेतलं फारसं समजत नाही खरं. पण 'आकाश तारकांचा उतरून साज गेले' ही प्रतिमा खूप आवडली.
  • Log in or register to post comments
ए
एस Sun, 11/11/2012 - 20:05 नवीन
माझ्या फार थोड्या मराठी कवितांपैकी ही एक. माझी आवडती. :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा