मनातलं सांगताच येईना.....................
वाडग्या-वाडग्यांनी तुझा आग्रह
मला नाकारता येईना
म्हावरांचं कालवण
पोटात मंथन करतंय ...
वेदनेची बारीक कळही
मला थांबवता येईना
भरत आलेली बादलीच
परत परत रिकामी होतेय ...
खाल्लं होतंच कुठे? पण जे होतं ते
मला आता पचवता येईना
आमटीत बुडवलेली बोटं
कोरडी होईतो पुसतोय ...
इनोचा ग्लास घशात उलटला तरी
अजिबातच आवाज थांबेना
कधीतरी चांगला ढेकर येईल
आपलीच समजुत घालतोय ...
आमटीत बुडवलेली बोटं कोरडी होईतो पुसतोय ...आमटीत बुडवलेली बोटं कोरडी होईतो चाटतोय ... हे आणि भारी वाटलं असतं.