Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

देवाला रिटायर करण शक्य नाही

र — राजघराणं, गुरुवार, 11/15/2012 - 15:25
कोणी तरी म्हटलं देवाला आता रिटायर करा मी म्हणालो नस्त्या भानगडी कशाला ? रिटायर करायला आधी त्याला कामावर कोण ठेविल ? अन्स्किल्ड लेबर ला अजकाल जॉब नाय भेटत भाउ. साधे भुकंप आणी वादळ ज्याला थांबवता येत नाहीत. आपत्ती देवाच्या कोपाने होते हे भाव थोपवता येत नाहीत त्याच्याविरुद्ध कोणी वागला तर ज्याच्या भावना काबूत रहात नाहीत असल्या मत्सरी देवाला आपण नाय कामावर ठेवणार माणुसकीच ग्रॅज्युएशन नापास झालेल्याला कोण दील काम ? त्यात पास व्हायला आधी तर्काची शाळा पास व्हावी लागते भौ दोन जमातींचे देव वेगळे असू शकत नाहीत एव्हढही त्याला कळत नाही काफिर आणी दलितांना जन्म देणारा तो महामूर्ख स्वतःच्याच हाताने हीन दीन पेगन बनवणारा तर्कदुष्ट शहाणपणाची बाराखडी येत नसेल तर; शाळेत कोण घील ? स्वतःच निर्मिलेल्या कफिरांविरुद्ध जिहाद, हीदनांविरुद्ध क्रुसेड आणी अवर्णांशी धर्मयुद्ध करण चुकीच आहे हे साध बालवाडी ज्ञान मिळवायला विश्वाच्या अंतिम दिनापर्यंत थांबाव लागत त्याला असल्या मतिमंदाला बाराखडी तरी कशी यील. बाराखडी येण्यासाठी आधी जन्म घ्यावा लागतो भौ बोला - ज्याचा जन्मच झालेला नाही - त्याला रिटायर कसं करायच ?

प्रतिक्रिया द्या
2997 वाचन

💬 प्रतिसाद (18)
श
शैलेन्द्र गुरुवार, 11/15/2012 - 17:22 नवीन
विचार सुंदर आहेत, पण मांडनी राजघराण या नावाच्या हिशोबाने जर्रा कमी पडली :)
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव गुरुवार, 11/15/2012 - 18:11 नवीन
मनुष्य नावाच्या प्राण्याचे गोंधळलेले मनोगत चांगले मांडलेत. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 11/15/2012 - 18:26 नवीन
डॉक्टर्स स्पेशल ;-) सुपर शॉट 99 पीने के बाद ही पता चलेगा के तुम पीये हो! ;-)
  • Log in or register to post comments
ज
जेनी... गुरुवार, 11/15/2012 - 18:33 नवीन
नय बाबुमोशायर नय .... पिने के बाद तो पि हूई हय ये पता चलने को शुद्धी मे आणा मंगताना :D ( अवांतर : रेवा आज्जीच्या विमानातल्या मैत्रिणीची जाम आठवण आली लिहिताना =)) ) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ड
डावखुरा गुरुवार, 11/15/2012 - 19:03 नवीन
काय मांडायचंय नक्की?
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 11/15/2012 - 19:14 नवीन
...प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत.
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ गुरुवार, 11/15/2012 - 19:23 नवीन
बरंय.
  • Log in or register to post comments
न
निश Fri, 11/16/2012 - 08:35 नवीन
राजघराण साहेब, कविता अत्युत्तम पण.... देवावर सगळ्या गोष्टिची जबाबदारी टाकुन अजुन आपण प्रत्येक जण किती काळ आपल्या जबाबदारीतुन पळण्याचा प्रयत्न करणार?
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Fri, 11/16/2012 - 14:08 नवीन
प्रत्येकाचा देव वेगळा कस काय रिटायर करणार?
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 11/16/2012 - 15:48 नवीन
हा हा . ज्याची त्याची विचारशक्ती. :)
  • Log in or register to post comments
त
तिमा Fri, 11/16/2012 - 15:49 नवीन
देवाला 'रिटायर' करता येणार नाही कारण तो 'थ्री टायर' आहे. ईश्वर्,अल्ला आणि येशु. वरचे दोन बंद केले तरी एक उरतोच! तिसरा पण बंद करता आला असता तर आपण सगळे एका लेव्हलला आलो असतो आणि मग त्याची जरुरच पडली नसती कोणाला!
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Fri, 11/16/2012 - 17:46 नवीन
देवाला रिटायर करा म्हणणारे अल्ला आणि येशु च्या बाबतीत मुग गिळुन गप्प बासतात
  • Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख Sat, 11/17/2012 - 05:45 नवीन
+१००००००० टक्के सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
प
पैसा Fri, 11/16/2012 - 18:37 नवीन
विशेषतः
ज्याचा जन्मच झालेला नाही - त्याला रिटायर कसं करायच ?
हे फारच!
  • Log in or register to post comments
क
केदारविदिवेकर Sat, 11/17/2012 - 07:37 नवीन
ज्याचा जन्मच झालेला नाही - त्याला रिटायर कसं करायच ? अनादि, अनन्त तो ऋषीच कुळ अन मूळ शोधू नये म्हणतात...
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 11/17/2012 - 07:50 नवीन
अनेकांना मतित अर्थापर्यंतहि पोहोचता येत नाहीये,याचा खेद वाटतो. अता या काव्याचे रसंग्रहण मांडायलाच हवे. ;-)
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Sat, 11/17/2012 - 10:53 नवीन
+११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 11/17/2012 - 08:05 नवीन
अहो डाक्टर साहेब, देवाच्या खुर्चीला एकविसाव्या शतकातला प्रतिसाद पाहता अजून हजार पाचशे वर्ष काही धोका नाही असे वाटते.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा