जे न देखे रवी...

रासलीला

Primary tabs

लाख चांदण्या लखलख करीती
आणि तारका दळे उतरती
आज पोर्णिमा उतरुन आलि
कालिंदीच्या तटी
खेळतो रास सखा श्रीहरी

भरल्या मेघा परि सावळा
मोरमुकुट शिरी मदनची दुसरा
श्रृंगाराला स्वरात भिजवी
अधरी धरुनी बासरी
खेळतो रास सखा श्रीहरी

गोप गोपिका जमले सारे
टिपरी वरती टिपरी गाजे
त्या नादाला भूलूनी आले
शिवही यमुनातिरी
खेळतो रास सखा श्रीहरी

वाळ्वंटी त्या यमुनाकाठी
रास रंगता हरी संगती
तनमन अवघे विसरुन जावे
प्रेम भरूनिया उरी
खेळतो रास सखा श्रीहरी

विषय नव्हे हा ही तर भक्ती
विसरूनी रमणे देहासक्ती
देवांनाही वेड लावते
अशी रासमाधुरी
खेळतो रास सखा श्रीहरी

पुष्कराज

पेशवे,
हो ही कविता नविन आहे, तु आमेरीकेला गेल्यावर्ची
पुष्कराज

पक्या

भरल्या मेघा परि सावळा
मोरमुकुट शिरी मदनची दुसरा
श्रृंगाराला स्वरात भिजवी
अधरी धरुनी बासरी
खेळतो रास सखा श्रीहरी

वा क्या बात है. मस्त जमलीये कविता. आवडली.

शितल

विषय नव्हे हा ही तर भक्ती
विसरूनी रमणे देहासक्ती
देवांनाही वेड लावते
अशी रासमाधुरी
खेळतो रास सखा श्रीहरी


हे तर मस्तच रचले आहे.

मिसळपाव

पुष्कराज,छान जमली आहे हि पण.
...विषय नव्हे हा ही तर भक्ती
विसरूनी रमणे देहासक्ती ...
अगदि यथार्थ ओळी आहेत या.

बरेच वेळा तथाकथित कविता वाचल्यावर, एक परिच्छेद लिहुन, तो ओळी नी कडव्यांच्या रुपात 'कविता' म्हणून सादर केला जातो की काय असं वाटतं! त्या पार्श्वभूमीवर अशी मात्रा/यमक संभाळून एखादा सुंदर भाव नेटकेपणाने मांडणारी कविता विशेष आनंद देउन जाते. धन्यवाद पुष्कराज.

पुष्कराज

तुमचा प्रतिसाद वाचून नेहमीच मला आनंद होतो ,मनातून जमलेल्या कवितेला तुम्ही मनापासून दाद देता,
धन्यवाद म्हणत नाही, तेवढ्याने काहीच होणार नाही
पुष्कराज