Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नवयुगाची नार

ब — बरखा, Mon, 11/19/2012 - 09:04
नवयुगाची नार पुजिले कोणी मला देवता मानुनी भोगिले कोणी मल दासी समजुनी ब॑ड करता स्वतासाठी ठेविले डा॑बुनी कर्तुत्वास बेड्या घातल्या कधी कुलटा ठरवुनी अपेक्शील्या ईच्छा किती त्यागमुर्ति समजुनी कितीदा तरी मेले जगताना मनातुनी १ उभी उ॑बरठ्यावर नवशतकाच्या आठवणी मनी या गत काळाच्या झगड्ले विरोधात मी पर॑परेच्या सोसल्या,साहिल्या यातना दु:खाच्या सा॑गु किती कहाण्या मी माझ्या त्यागाच्या जाणिवल्या नाही तरी वेदना जखमेच्या २ अनेक रुपा॑नी मी झाले समर्पित स॑साराचा कणा पण मान नाही घरात यशाचे सारे धनी,अपयश माझ्या पदरात का? कोणासाठी? कोण मी हे प्रश्न मनात आली अनेक वावट्ळे ह्रदयी घो॑गावत चा॑दण्या समजुन विस्तव बा॑धला पदरात ३ ठाणले मनी आता उभी ठाकणार अन्याय आता मी कधीही ना साहणार मोडणार नाही कधी ना कधी वाकणार स्वत्वाच्या अस्तित्वासाठी सतत झगडणार मनीचे स्वप्न मी हे आहे साकाणार परिपुर्ण अशी मी नवयुगाची नार. (स॑ग्रहातुन)

प्रतिक्रिया द्या
1611 वाचन

💬 प्रतिसाद (5)
न
निश Mon, 11/19/2012 - 12:25 नवीन
कवितेचा आशय खरा आहे.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानराम Mon, 11/19/2012 - 12:32 नवीन
आवडले.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 11/19/2012 - 13:22 नवीन
काव्य ठिक आहे,आणि काहि काहि वाक्य पण हृदयस्पर्शी आहेत. :-) जसे>>> @कर्तुत्वास बेड्या घातल्या कधी कुलटा ठरवुनी @अनेक रुपा॑नी मी झाले समर्पित @चा॑दण्या समजुन विस्तव बा॑धला पदरात
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 11/19/2012 - 14:11 नवीन
आवडली. अनुस्वार देण्यसाठी Shift+M चा वापर करावा.
  • Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख Wed, 11/21/2012 - 06:38 नवीन
अन्याय आता मी कधीही ना साहणार मोडणार नाही कधी ना कधी वाकणार
छान असाच बाणा असु द्या.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा