पाककृती

राम लड्डू (दिल्ली चाट)

Primary tabs

.

राम लड्डू साहित्यः

५-६ तास भिजवलेली १ वाटी पिवळी मुगाची डाळ
५-६ तास भिजवलेली १/२ वाटी चणा डाळ
१ बारीक चिरलेली हिरवी मिरची
बारीक चिरलेली कोथींबीर
चवीनुसार मीठ

.

पुदीना चटणी साहित्यः

मुठभर कोथींबीर
मुठभर पुदीना
१ बारीक चिरलेली हिरवी मिरची (आवडी प्रमाणे कमी-जास्त)
१/२ टीस्पून जीरे
१ टीस्पून लिंबाचा रस
चवीनुसार मीठ
१/२ टीस्पून साखर

.

वरील सर्व साहित्य एकत्र करुन मिक्सरवर चटणी तयार करून घ्यावी.

पाकृ राम लड्डू:

भिजवलेल्या डाळींतून सर्व पाणी काढून, निथळून घ्यावे.
दोन्ही डाळ एकत्र करून,मिक्सरवर पाणी अजिबात न घालता बारीक वाटून घ्यावे.
वाटलेले डाळींचे मिश्रण एका भांड्यात काढून ते हलके व पांढरे होईपर्यंत फेटावे. (साधारण ५-७ मिनिटे लागतात)
आता फेटलेल्या डाळींच्या मिश्रणात चवीनुसार मीठ,चिरलेली हिरवी मिरची व चिरलेली कोथींबीर घालून एकत्र करावे.
कढईत तेल मंद आचेवर तापत ठेवावे.
तापलेल्या तेलात हाताने मिश्रण घेऊन गोलाकार भजी सोडावी.(मिश्रण हलके झाल्यामुळे तेलात सोडताच भजी वर तरंगू लागेल)
मंद आचेवर सर्व राम लड्डू सोनेरी रंगावर तळून घावे.

.

सर्व्हींगः

एका ताटात किंवा द्रोणात तयार राम लड्डू रचून ठेवावे.
त्यावर पुदीन्याची चटणी घालावी.
त्यावर किसलेला कच्चा मुळा व थोडी कोथींबीर घालावी. (मी येथे लाल मुळा वापरला आहे)

.

गरमा-गरम राम लड्डू चाट सर्व्ह करावे.

.

स्मिता.

मूगाच्या आणि बेसनाच्या भज्यांची चव एकसाथ! नावसुद्धा भारी आहे, राम लड्डू :)

किसन शिंदे

मस्त पाककृती!

संध्याकाळी प्रयत्न करुन पाहण्यात येईल.

सर्वसाक्षी

अरे वा. एकुण खमंग प्रकार दिसतो आहे. एकदा केलाच पाहिजे. या लड्डु वर दही सुद्ध मस्त लागेल.

निश

ज्याम भारी सही पाककृती आहे.

सस्नेह

आमच्या कोल्हापुरात याला मूगवडे म्हणतात. मस्त लागतात.

स्पंदना

मुळ्यामुळे जरा वेगळी चव नाही का लागायची? पण तरीही तुमच्या हातोटीवर विश्वास ठेउन करुन पहाण्यात येइल.

अनन्न्या

मी या मिश्रणात आलं-लसूण पेस्ट आणि बारीक चिरुन कांदा घालते. बाकी तुमचे सादरीकरण मात्र अप्रतिम!! ते आम्हा नवोदितांना शिकण्यासारखे आहे.

मुगाची भजी बनवताना मी त्यात आलं-लसूण+ मिरची पेस्ट घालते व काळीमिरी ठेचून घालते.
हे वडे उर्फ लड्डू जुन्या दिल्लीत हिरवी चटणी व कच्च्या मुळ्याच्या कीसासोबत खायला देतात.
वेगळे कॉंबिनेशन आहे पण छान लागतं.

धन्यवाद अनन्न्या :)

रेवती

अगदी वेगळी पाकृ. असा प्रकार असतो हे माहित नव्हतं. छानच!

चित्रगुप्त

दिल्लीत पस्तीस वर्षे राहूनही रस्त्यात उघड्यावरचे खाणे नको, म्हणून हे लाडू कधी खाउन बघितले नव्हते. अलिकडे एकदा खाल्ल्यावर आवडले होते. आता घरीच करता येतील हे छान. धन्यवाद.

ऋषिकेश

नवे कॉम्बिनेशन.. करून बघण्यात येईल :)

सविता००१

सानिका, बेक्कार वाईट आहेस तू. सारखी कामाला लावत असतेस.
आता करायलाच पाहिजे ही डीश. ती पण लग्गेच.
पण नेहमीप्रमणे झक्कासच हे वे.सां.न.ल.:)

गणपा

रुचकर तसेच पौष्टिक आणि फटु बद्दल तर शब्द नाहीत.

सुहास झेले

ह्येच बोलतो..... शब्दच सापडत नाहीत अश्या खमंग आणि रुचकर धाग्यांवर प्रतिक्रिया द्यायला :) :)

मस्तच ग.. आणि पाकृचे नाव पण आवडले,
अमिरी खमणसाठी मूग आणि चणाडाळ भिजत घातली होती, आता ते न करता रामलड्डुच करुन पाहते,:)
स्वाती

मदनबाण

अहाहा... अख्खा "द्रोण" उचलुन घ्यावा म्हणतो ! ;)

पैसा

भज्यांना लाडू म्हटले तर लाडूंना काय म्हणावे?
पण चालेल. नावाने काय फरक पडतोय? फोटो आणि कृती फस्कलास!

सानिका ताई मुळ्या एवजी दुसर काय घेता येईल ???मुळ्याला उग्र वास असतो तो नकोय