पाककृती

मासे ३८) भाकस

Primary tabs

भाकस मासा एका बाजुने चपटा असतो. चपटी बाजू पांढरी असते तर वरची बाजू फुगीर व खवलांनी भरलेली काळी असते. साधारण हलव्यासारखी. ह्याची खवले काढावीत व तुकड्या करून घ्याव्यात. जर रस्सा आणि तळायचेही असतील तर मधल्या चांगल्या तुकड्या तळण्यासाठी घ्यावात व डोके आणि शेपटाकडील तुकड्या रश्यासाठी वापराव्यात. रस्सा इतर रश्यांसारखाच ओल्या खोबर्‍याच्या वाटणाने करतात.

तळलेला भाकस

साहित्य :
भाकस माश्याच्या तुकड्या
मिठ
आले,लसूण, मिरची, कोथींबीर वाटण (ऑप्शनल)
मसाला
हळद
तेल

पाककृती :
तळण्यासाठी तुकड्यांना मिठ, मसाला, हळद हवे असल्यास वाटण लावावे. जर धिर किंवा वेळ असेल तर थोडा वेळ मुरवावे. नाही मुरवले तरी हरकत नाही.

मग तवा चांगला गरम करावा व गॅस मध्यम ठेवून तेल सोडून तुकड्या शॅलोफ्राय करायला ठेवाव्यात. एक बाजू ४- ते ५ मिनिटे शिजवून झाली की परववावी व दुसरी बाजूही तितकीच शिजवावी. पलटल्यावर पुन्हा थोडे तेल कडेने सोडावे. जर तुकड्या जाड्या असतील तर पुन्हा अलटी पलटी कराव्यात २-३ मिनीटे व नंतर गॅस बंद करावा.

ह्या आहेत तयार तुकड्या. फिज मध्ये मासे असल्याने कापताना त्यांना व्यवस्थित शेप नाही आला.

रेवती

एका माशाला दोन रंग असणे व दोन्हीबाजूचा आकारही निराळा असणे हे वेगळे प्रकरण आहे. छान. तुझ्यामुळे आम्हाला नवीन गोष्टी बघायला मिळत असतात.

धनंजय

शिवाय दोन्ही डोळे एकाच बाजूला (करड्या बाजूला) आहेत. Sole, flounder हे साधारण याच आकारमानाचे, भाकसाचे चुलभावंड-मासे पाश्चिमात्य देशांत मिळतात. (या कुटुंबाततला halibut मात्र भला मोठा असतो.)
यांच्या पांढर्‍या मांसाचा स्वाद फिका असतो. त्यामुळे पाश्चिमात्यांत या माशास अगदी सौम्य रसात शिजवतात.
हा मसालेदार तळलेला मासा छानच दिसतो आहे.

५० फक्त

उत्सुकतेनं हेल्बटचे काही फोटो पाहिले, अगदीच भला मोठा आहे, एवढे मोठे मासे भारतात मिळतात का आणि असतील तर ते सुद्धा बकरीच्या मटणासारखे वाटे करुन विकले जातात किंवा कसे ?

Mrunalini

वाव.... सही.... तोंपासु :)

स्पंदना

कधी ऐकला सुद्धा नाही हा मासा. केव्हढा वेगळा दिसतोय ना? अन धनंजयनी म्हण्टल म्हणुन डोळे एका बाजुला असलेले समजल.

धन्यवाद जागु. धन्यवाद धनंजय.

गवि

हा मासा मला वाटतं समुद्रतळाशी वाळूत (स्वसंरक्षणासाठी आणि भक्ष्य मिळवण्यासाठी) वाळूच्या रंगाशी एकरुप होऊन पडून राहतो. त्यामुळे त्याची वरच्या बाजूला असलेली बाजू काळपट असते. त्याचे रंग जिवंतपणी बदलतातसुद्धा. आणि याच कारणाने दुसरा डोळाही नाकाची लाईन क्रॉस करुन वरच्या बाजूला आलेला असतो. हे सर्व लहानपणी एका समुद्रविषयक माहिती देणार्‍या पुस्तकात वाचल्यासारखं वाटतंय.

याचा खाण्यासाठी विचार त्यावेळी मनातही आला नव्हता. पुस्तकं किंवा मत्स्यालयं आपल्याला असे विचित्र जीव फक्त डोळ्यांनी दाखवतात पण जागुताई तर त्यासोबत जिभेनेही ओळख करुन घ्यायला शिकवते.. :)

जागु

धन्यवाद सगळ्यांचे. इथे शेअर केल्याने तुमच्या सगळ्यांच्या निरिक्षणातुन मलाही अजुन शिकायला मिळते.

गणपा

सकाळी सकाळी कुठे भूक चाळवायला धागा उघडला असे झाले.

मासे या या प्रकारात त्याची ही अडतिसवी पाककृती आहे.
अधिक माहितीसाठी त्यांचे सर्व लेखन चाळावे.

जागु, गंपा, ही मंडळी चटपटीत तोंडाला पाणी सुटणा-या पाककृती टाकून संयमाची परिक्षा घेत आहेत. पण, मी मागे वळून बघणार नाही.

-दिलीप बिरुटे
[शेपू,मेथी,कोबू,बटाटे,वांग्यांवर भर असलेला] :)

इरसाल

[शेपू,मेथी,कोबू,बटाटे,वांग्यांवर भर असलेला]

प्रॉडॉ हे काय बर नव्हं !!!!

मदनबाण

आयला ! हा तर वेगळाच मासा पाहिला मी !

जागु

डॉ. हाहाहा... ह्यापुढे सुक्या मच्छीचा मारा चालू करणार आहे मी.

गणपा

आह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह