परधीन
चौकोनी मावेल कसे
मज सांग पिंजले असे पिसे
अवशेष विखुरल्या लाटांचे
वाटे झेलावे अलगदसे
भंगल्या तनूचे अणुरेणू
शोधिती हरवले जसे हसे
पंखात नितळ दंव सोनेरी
स्पर्शात भाव अस्पर्श असे
मोट बांधली मेघाची
पण पराधीन घरचे वासे
अंदाज न सुटल्या धाग्यांचे
क्षण जवळ न येती जराहिसे
.....................अज्ञात
💬 प्रतिसाद
(3)
ख
खटासि खट
Fri, 11/23/2012 - 08:32
नवीन
अनेक शब्दांची बांधलेली मोट विखुरली असं काही म्हणायचं आहे का /
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Mon, 12/03/2012 - 16:34
नवीन
मोट बांधली मेघाची
पण पराधीन घरचे वासे
अंदाज न सुटल्या धाग्यांचे
क्षण जवळ न येती जरासे
अप्रतिम ओळी खुप खुप आवडल्या...
पुन्हा पुन्हा वाचाव्यात अश्या
----------
- Log in or register to post comments
ह
हारुन शेख
Mon, 12/03/2012 - 16:44
नवीन
पंखात नितळ दंव सोनेरी
स्पर्शात भाव अस्पर्श असे
या ओळी खासच आहेत.
- Log in or register to post comments