Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तू म्हणजे,,

म — मुरलीधर परुळेकर, Tue, 11/27/2012 - 02:28
तू म्हणजे अशी नशा ग्लास इतका फ़ुल्ल भरलेला, की ग्लास सुद्धा होई शराब !!! तू म्हणजे अशी हट्टी की ; आधीच घाट रस्ता आणि त्यात पुन्हा गाडी खराब !!! तू म्हणजे वैशाख वणव्यात वळवाचा पाऊस !! तू म्हणजे कुडकुडत्या थंडीत आईस्क्रीम खायची हौस !!! तू म्हणजे काळे ढग आणि नाचणारा मोर तू म्हणजे हळूच चिमटा काढणारं खोडकर पोर तू म्हणजे अस्सं प्रेम आईचं तान्ह्यावरती तू म्हणजे असा राग बापाचा पोरावरती तू म्हणजे वाफ़ाळलेली कॉफ़ी आणि हवासुध्दा अशी धुंद तू म्हणजे पावसची पहिली सर, आणि सुटलेला मातीचा गंध…. तू म्हणजे कागदी नाव, आणि इवलासा पाण्याचा ओहोळ, तू म्हणजे माझ्या डॊळ्यातलं पाणी आणि असंख्य आठवणींचा मोहोळ !! कधी कधी तू इतकी शांत इतकी गप्प… जसा माझ्या मनानं माझ्याशीच पुकारलेला बंद आणि आपले सगळेच वाद / संवाद ठप्प !! कधी तू अशी कि जशी शांत, निवांत वेळ आणि माझा माझ्याच सावल्यांशी चाललेला खेळ !!!!!!!

प्रतिक्रिया द्या
1518 वाचन

💬 प्रतिसाद (5)
ह
ह भ प Tue, 11/27/2012 - 09:09 नवीन
मस्तंच.. 'तू तेव्हा तशी' आठवलं..
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानराम Wed, 11/28/2012 - 12:28 नवीन
छान. फुल्लटू ...आहे.
  • Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख Wed, 11/28/2012 - 12:35 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अनिल तापकीर गुरुवार, 11/29/2012 - 03:36 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार गुरुवार, 11/29/2012 - 05:02 नवीन
मुरली परुळेकरांनी एकेकाळी बह्या वाचायला देण्याचे वादे केले होते ते आठवले!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा