Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नेहेमीच असं होतं, असं नाहि !

ज — जेनी..., Wed, 11/28/2012 - 19:26
नेहेमीच असं होतं ,असं नाहि.. पण जेव्हा होतं ,तेव्हा सगळ बेचैन होतं कुठल्याशा एका अनामिक भितीनं , सगळच जग हळुहळु व्यापून जातं ... अश्यावेळी मायेच्या एकाच शब्दाची फुंकरहि बास होते पण ती भोवताली घुटमळणार्‍या कुठल्याच मुखातुन येत नाहि. असं का?.. अगदी कासाविस ..! बराच वेळ जातो ,सुचत मात्र काहिच नाहि , आजुबाजुला खळखळुन हसणारं कुणीतरी हवय असं वाटु लागतं ..पण ..पण आत्ता कुणीच नाहि ! कुठेतरी शुन्यात नजर लागते,फार उशिर झालाय ह्याचीहि तेव्हा काळजी नसते.. कुठे जायचय ? काय करायचय? काहि काहि माहित नाहि .... कदाचित सुचतच नाहि ... भावनेच्या भरात घेतलेले निर्णय चुकलेत , दुरुस्त होणारच नाहित का ??..काहिशी तगमग! मग सारं आठवु लागतं ,सारं सारं... पावसाच्या सरी झेलताना झालेली आठवण उगाच फिरताना " काय चालु असेल आता? " उगाच आणि नेमके असेच आलेले विचार . कधितरि "तुटलच आता!" असं वाटायला लावणं तर कधी " फोरेव्हर !" म्हणायला लावणं .. नेमक्या कुठल्या चक्रव्युहात अडकलोय आपण? शक्य असेल तितकं आता लांब जायचय.. पण हे,जमेल का आपल्याला ? ....एक..प्रयत्न! शेवटी जीव लागलाय आपला ,ही जाणीव सगळ्यात बेक्कार म्हटलं तर चांगलं ...म्हटलं तर त्रासाचा वाढता आकार .. शेवट कुणाला चुकत नाहि , पण शेवट सहज मिळत नाहि .. मिळवायचच असेल तर मग 'प्रेम 'मिळव ..असं ऐकायला लागतं जगवायचिच असेल तर 'माणुसकि ' जगव...असहि म्हणणारे म्हणतात शेवटी काय? हे असलं डोक्यात लवकर घुसत नाहि जिव्हाळ्याचा शोध काहि केल्या संपत नाहि मग मात्र कमतरता जाणवु लागते .. "आयुष्य एकट्यानेच जगायचं?" अशीच ,अगदी हिच भिती वाटु लागते क्षणभर मागे पाहिलं तरी ," एकटेच आपण ?" ह्या जाणिवेनं जीव जड होतो ..उरते .....फक्त गरज ! भावना ,मन याच्या तोडीला माया ,जवळीक बर्‍याच शब्दांचं नुसतच बंबाळ ! मग त्यात ओघाने दरवळ ,मुग्ध ,श्वास ह्या नाजुक शब्दांची ही तुडुंब गर्दी! काय असतं हे सगळं नेमकं कळत नाहि "मन तर माझं असं मोकाट पळत नाहि ?" असेल सुद्धा .माणुस म्हणुन जगताना मनाला फार जपावं लागतं.. आपल्या मनाला जपणारं कुणी भेटेल ह्या आशेवर जगावं लागतं... सतत गोड शब्दांचा मारा बसतो ,तरी हवाहवासा वाटतो सततच्या मारामारीनच मग एकदिवस प्रेमाचा झरा आटतो .. वाट बघायची सवय लागते ,पापण्या ओल्याच रहायला लागतात झोपेतुन दचकुन जागं झाल्यावरहि गोड शब्द आठवायला लागतात .. भेटलं तर बोलुच आपण याचीही शास्वती नाहि तरीहि " भेटायचय! "..ओढहि संपत नाहि सारखीच ....एकसारखी हुरहुर!

प्रतिक्रिया द्या
4621 वाचन

💬 प्रतिसाद (27)
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 11/28/2012 - 19:30 नवीन
बालिकेचं मुक्तक बालिकेसारखच!
  • Log in or register to post comments
अ
अनिल तापकीर गुरुवार, 11/29/2012 - 03:32 नवीन
छान आहे
  • Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख गुरुवार, 11/29/2012 - 04:38 नवीन
छान
सुचतय हो तुम्हाला
  • Log in or register to post comments
ल
लीलाधर गुरुवार, 11/29/2012 - 04:45 नवीन
:)
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानराम गुरुवार, 11/29/2012 - 05:24 नवीन
छान
  • Log in or register to post comments
स
सस्नेह गुरुवार, 11/29/2012 - 06:42 नवीन
पूजा, आता लवकर परत ये भारतात...!
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 11/29/2012 - 07:28 नवीन
स्नेहातैचं तरी ऐक ये लवकर ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 11/29/2012 - 06:43 नवीन
आवडेश.
  • Log in or register to post comments
स
सुहास.. गुरुवार, 11/29/2012 - 07:03 नवीन
जमायला लागलय :)
  • Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख गुरुवार, 11/29/2012 - 07:32 नवीन
आम्हाला बी शिकवा की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
ब
बॅटमॅन गुरुवार, 11/29/2012 - 07:34 नवीन
ओ नादान परिंदे घर आजा ;)
  • Log in or register to post comments
च
चेतन माने गुरुवार, 11/29/2012 - 08:37 नवीन
सुंदर खूपच छान !!! :)
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई गुरुवार, 11/29/2012 - 08:51 नवीन
छान छान
  • Log in or register to post comments
स
सोत्रि गुरुवार, 11/29/2012 - 10:54 नवीन
छानच! -(मुक्तक आवडलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 11/29/2012 - 12:48 नवीन
वाचली नाही. पण सगळे म्हणत आहेत म्हणजे भारी असणार. वाचून झाल्यावर परत प्रतिसाद देईनच.
  • Log in or register to post comments
न
निश गुरुवार, 11/29/2012 - 14:18 नवीन
पुजा पवारजी, अतिशय मस्त आहे कविता. कविता वाचतानाच त्यातला आशय अतिशय सहजपणे तुम्ही वाचकांपुढे आणता. मस्त कविता तितकाच कवितेचा आशय सुंदर.
  • Log in or register to post comments
ज
जयवी गुरुवार, 11/29/2012 - 15:16 नवीन
ह्म्म्म......:)
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 11/29/2012 - 15:49 नवीन
छान! आवडलं.
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे गुरुवार, 11/29/2012 - 18:38 नवीन
क्लासच! आवडेश! वाचन खूण साठवली आहे.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी गुरुवार, 11/29/2012 - 18:40 नवीन
सुंदर .. छान
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी गुरुवार, 11/29/2012 - 18:40 नवीन
सुंदर .. छान
  • Log in or register to post comments
ज
जेनी... गुरुवार, 11/29/2012 - 20:56 नवीन
सर्व वाचकांना धन्यवाद ! :)
  • Log in or register to post comments
म
मालोजीराव Fri, 11/30/2012 - 10:17 नवीन
छानच !
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 11/30/2012 - 12:21 नवीन
चांगलं लिहिलंय! पु. ले. शु. :) राघव
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Fri, 11/30/2012 - 13:38 नवीन
अप्रतिम!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sun, 12/02/2012 - 09:27 नवीन
पुजाबाई, तुमची घुसमट / रुखरुख समजण्या सारखी आहे. तुम्हाला ती शब्दात बांधता आली. मोठ्या भाग्यवान आहात तुम्ही. वाचकाला खिळवुन ठेवायचे कसब आहे तुमच्या कडे. बाकी स्वतःची काळजी घ्या, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Sun, 12/02/2012 - 20:02 नवीन
नक्की पैबु काका . तुम्ही सगळे आहात :) मग छान वाटतं ... इथे येण्याचं 'कारण 'असता तुम्ही सगळे माझ्यासाठी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा