पंख
मि पसरून पंख माझे , देईन सखे उबारा..
हा पावसाचा इशारा..अन धुंद जरी वारा..
तु असताच सोबत , नाही तमा ग कसली..
बेभान बरसूदे ह्याला , तुझ भिती कसली ग असली..
क्षण क्षण होऊदे चिंब , अन गात्रात मुरुदे थेंब.
भिजल्या पंखात माझ्या , जरा मिटवून घे ते अंग..
थांबेल हा वेडा , तू धिर जरासा घे ग.
सर ओसरेल आता , चोचीत थेंब घे ग.
ना येइल कधी हा क्षण , परतून पुन्हा आयुष्यात,
बघ थांबेल पाऊस आता , मग परतूया घरट्यात..
💬 प्रतिसाद
(15)
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/29/2012 - 13:44
नवीन
ठीक आहे.
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
गुरुवार, 11/29/2012 - 13:52
नवीन
काव्य बरे आहे पण...
मि , तु , तुझ, भिती, धिर आ रा रा ह्ये शुद्धलेखन हाय का राव ? कुटं शिकला ?
- Log in or register to post comments
अ
अनिल तापकीर
गुरुवार, 11/29/2012 - 17:30
नवीन
खुप सुंदर
- Log in or register to post comments
अ
अमितसांगली
गुरुवार, 11/29/2012 - 17:35
नवीन
-१
- Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख
Sat, 12/01/2012 - 07:26
नवीन
अगदी बरोबर
- Log in or register to post comments
ज
ज्ञानराम
Fri, 11/30/2012 - 05:04
नवीन
प्रतिसादा बद्दल तुम्हा सर्वांचे आभार , माझ शुदधलेखन खूप कच्च आहे, पुढल्या वेळी शुदधलेखनाच्या चूकांवर लक्ष नक्की देईन.
- Log in or register to post comments
ख
खेडूत
Sat, 12/01/2012 - 19:25
नवीन
http://www.google.com/transliterate/indic/Marathi
हा दुवा वापरून सराव करा. दोन-चार दिवसांत सवय होते..
शिवाय कच्चं,गं,कुठलं हे व या प्रकारचे शब्द पण बरोबर येतात.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Wed, 12/05/2012 - 05:38
नवीन
असु दे की.
शब्दातील भाव आणि शब्दांचे अर्थ महत्वाचे बघा. बाकी शुद्धलेखन वैग्रेला मारा फाट्यावर आणि मनमुराद लिहा.
शुलेखन होईल हळुहळू बरे.
- Log in or register to post comments
प
पियुशा
Fri, 11/30/2012 - 12:16
नवीन
फोटु एकदम बेस्ट
- Log in or register to post comments
ज
ज्ञानराम
Sat, 12/01/2012 - 08:12
नवीन
धन्यवाद पिऊ
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Mon, 12/03/2012 - 16:25
नवीन
चित्र आधी पाहिले आणि नंतर कविता.
दोन्ही ही मस्तच एकदम.
अतिशय सुंदर सुरुवात.
मस्त ओळी.
------------
आपल्या जोडीदाराप्रति असलेली प्रेमाची उब आणि घरट्याचे अस्तित्वात आलेले स्वप्न संभाळण्याची अनामिक हुरहुर शब्दातुन खुप छान व्यक्त झालेली आहे..
---------------
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Mon, 12/03/2012 - 16:28
नवीन
अरेच्या ! फोटो मी आधी पाहिलाच नव्हता.
मस्त आहे. अन कवितापण. तेवढं शुद्धलेखन एक सोडलं तर...
- Log in or register to post comments
ज
जेनी...
Mon, 12/03/2012 - 16:55
नवीन
मला ़कविता मनापासुन आवडली .
अर्थ खुप सुंदर वाटला .
- Log in or register to post comments
ज
ज्ञानराम
Wed, 12/05/2012 - 05:30
नवीन
प्रतिसादा बद्दल ..धन्यवाद पूजा , स्नेहांकिता , गणेशा ... :)
- Log in or register to post comments
ज
ज्ञानराम
गुरुवार, 12/06/2012 - 12:03
नवीन
धन्यवाद परा..:)
- Log in or register to post comments