Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"शिवराय"

अ — अनिल तापकीर, Sat, 12/01/2012 - 08:57
त्रासली गांजली जनता, नाही कोणी वाली | तारावा हिंदुधर्म, साकडे देवास घाली | दाही दिशा माजले दैत्य,गिळती महाराष्ट्रासी | झाली मंदिरे जमीनदोस्त,भग्न केले देवांसी | लेकी सुनांच्या अब्रूला,नाही राहिले रक्षण | वतनदारांना तर प्रिय आपलेच वतन | संत महात्म्यांनी केला देवाचा धावा | या धरतीला ताराया अवतार घ्यावा | संतांची गरीब रयतेची, देवास आली दया | म्हणूनच देवांनी पाठविला शिवराया | शिवरायांनी ऐसे अघटीत केले | शून्यातून स्वराज्य उभे राहिले | अफझलचा कोथळा बाहेर काढीला | औरंग्याचा तर माजच जिरवला | आदिलशहा निजामासी जागीच रोखले | इंग्रजांसी मुंबईच्या वखारीतच कोंडले | संतांचे देवालयांचे केले रक्षण | खळ, नि दुर्जांनांचे करुनी निर्दालन | त्रेतायुगी होते जसे रामाचे रामराज्य | कलियुगी आमच्या शिवरायांचे शिवराज्य | जय शिवराय

प्रतिक्रिया द्या
5173 वाचन

💬 प्रतिसाद (18)
न
निश Sat, 12/01/2012 - 11:20 नवीन
अनिल तापकीर साहेब, वा मस्त कविता आहे. छ्त्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 12/01/2012 - 11:46 नवीन
आता एक कविता तानाजी मालुसरेंवरती होऊ द्या मालक.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Fri, 12/21/2012 - 06:18 नवीन
अनुमोदन..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
अ
अनिल तापकीर Sat, 12/01/2012 - 15:00 नवीन
निश्,राजकुमार धन्यवाद राजकुमारजी लवकरच लिहितो
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानराम Mon, 12/03/2012 - 05:03 नवीन
एकदम मस्त , खूप छान .. छत्रपती शिवरायांचा त्रिवार ...जय जयकार..
  • Log in or register to post comments
स
सुकामेवा Mon, 12/03/2012 - 05:28 नवीन
कविता १ नंबर
  • Log in or register to post comments
अ
अनिल तापकीर Mon, 12/03/2012 - 06:35 नवीन
ज्ञानराम,नि पंकज जी धन्यवाद जय शिवराय
  • Log in or register to post comments
श
शिवप्रसाद Sat, 12/15/2012 - 12:13 नवीन
सुंदर रचना
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील Sat, 12/15/2012 - 15:41 नवीन
सिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी राखी हिन्दुवानी, हिन्दुवानको तिलक राख्यो अस्मृती पुराण राखे वेदविधि सुनी मैं राखी रजपुती , रजधानी राखी राजन की धरामे धर्म राख्यो , राख्यो गुन गुनी मैं भूषण सुकवि , जीती हद्द मरह्टट्न की देस देस कीर्ति , बरवानी तव सुनी मैं साही के सपूत , सिवराज समशेर तेरी दिल्ली दल दाबी कै, दिवाल राखी दुनी मैं वेद राखे विदित , पुराण राखे सारयुत रामनाम राख्यो , अति रसना सुघर मैं हिन्दुन की चोटी, रोटी राखी है सिपहीन की कान्दे मैं जनेऊ राखे , माला राखी गर मैं मिडी राखे मुगल , मरोरी राखे पातसाह बैरीपिसी राखे , बरदान राख्यो कर मैं राजन की हद्द राखी , तेगबल सिवराज देव राखे देवल , स्वधर्म राख्यो घर मैं देवल गिराविते , फिराविते निसान अली ऐसे डूबे रावराने , सबी गए लबकी गौर गणपती आप , औरनको देत ताप आपनी ही बार सब , मारी गये दबकी पीरा पैगंबर , दिगंबर दिखाई देत सिद्ध की सिदधाई गई , रही बात रब की कासी की कला जाती, मथुरा मस्जिद होती सिवाजी न होते तो , सुन्नत होती सबकी - कविराज भूषण। याचा अर्थ असा की हे! शहाजींचे वीर पुत्र शिवाजी महाराज! तुम्ही आपल्या तलावारीने हिंदुत्वाचे संरक्षण केले।हिन्दुंचा तिलक राखला आहे. श्रुति, स्मृति व पुराणातील आचारधर्माचे संरक्षण केले. राजपुतांचा क्षात्र धर्म व राजांच्या राजधान्यांना आपनाच स्थैर्य प्राप्त करून दिले आहे. पृथ्वीवर धर्म आपणच राखला आहे. गुणिजनांमधील श्रेष्ठ गुणांचे अस्तित्व आपल्यामुळेच राहिले आहे. आपण महाराष्ट्राची महानता वाढवली आहे व महाराष्ट्राला श्रेष्ठता प्राप्त करून दिली आहे. आपली किर्ती दिगंतात पसरलेली आहे. आपल्या दिव्या तलवारीने दिल्लीपतीच्या सेनेचा पराभव करून, जगात हिंदुंच्या मान मर्यादांचे संरक्षण केले आहे. वेदांचे आणि पुराणांचे सामर्थ्य आपल्यामुळेच टिकून राहिले आहे. आपल्यामुळेच भाविकांच्या जिभेवर रामनाम अस्तित्व शिल्लक आहे. हिंदुंच्या पवित्र शिखेला व सैनिकांच्या भाकरीला आपल्यामुळेच संरक्षण मिळाले आहे. यज्ञोपवितांना व पवित्र जपमाळांना आपण वाचाविले आहे. मोगलांच्या सामंतांचाच नव्हे, तर बादशाहचाही आपण धुव्वा उडविलात. निग्रहानुग्रहाचे सामर्थ्य आपण प्रकट केले आहे. देवळातील देव व घरामधील धर्म केवळ आपल्यामुळेच शिल्लक राहिला आहे. सभोवाताली सर्व यवनांचे कार्य अक्षुण्णपणे चालू असता व यवन सैनिकांनी मंदिरे पाडून त्या जागी अल्लाचा ध्वज फडकविला असता, राजे महाराजे भयग्रस्त व पतित होऊन तोंडदेखील बाहेर काढत नव्हते. थोडेसे पुजविधन चुकले तर भक्तांनाच ताप देणाय्रा देवी, गणपती आदि देवदेवतांना आपल्यावरील या यावनी संकटांचा प्रतिकार करणे अशक्य वाटून ते लपून बसले होते. सिद्धांची सिद्धि समाप्त होवून जिकडे तिकडे पीर, पैगंबर, फकीर, अवलिया यांचेच साम्राज्य पसरलेले होते. अशा स्थितीत जर शिवाजी महाराज झाले नसते, तर काशी कलाहीन झाली असती,मथुरेला मशीद उभा राहीली असती अणि हिन्दुंची सुन्ता झाली असती}
  • Log in or register to post comments
अ
अनिल तापकीर Sat, 12/15/2012 - 17:58 नवीन
शिवप्रसाद्,आनि बाबा पाटील धन्यवाद पाटीलसाहेब खुप छान माहिती दिली आभारी आहे
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sat, 12/15/2012 - 19:46 नवीन
शिवछत्रपतींचा विजय असो!!
  • Log in or register to post comments
अ
अनिल तापकीर Sun, 12/16/2012 - 04:39 नवीन
धन्यवाद्,पाषाण्भेदजी
  • Log in or register to post comments
श
शिवप्रसाद गुरुवार, 12/20/2012 - 09:53 नवीन
कोणितरी जाणकार व्यक्तीने "शिवाजीराजे नसते तर.......... हा धागा टाकावा
  • Log in or register to post comments
अ
अनिल तापकीर गुरुवार, 12/20/2012 - 10:05 नवीन
धन्यवाद शिवप्रसाद मला कितपत जमेल हे नाही सांगता येत पण दुसरे कोणी लिहला तर मनापासुन स्वागत
  • Log in or register to post comments
च
चिर्कुट गुरुवार, 12/20/2012 - 11:48 नवीन
मस्त आहे काव्य..
  • Log in or register to post comments
अ
अनिल तापकीर Sat, 12/22/2012 - 08:16 नवीन
चिर्कूट आनि शैलेंद्र धन्यवाद, शैलेंद्रजी आपल्या सुचनेचे स्वागत काम चालु आहे. म्हणजे कालच सिंहगडावर जाऊन आलो आहे.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Mon, 12/24/2012 - 11:27 नवीन
जब्बर्दस्त.. शक्यतो घोरपडीवाला व्हर्जन टाळा, कारण त्याला ऐतीहासीक आधार नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल तापकीर
अ
अनिल तापकीर Wed, 12/26/2012 - 08:09 नवीन
बरे झाले तुमचा प्रतिसाद पाहिला कारन तानाजींची वीर गाथा आताच टाकणार होतो. बदल करुनच आता टाकतो. धन्यवाद
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा