ड्रॅगनच्या देशात ०२ - बायजींग : तियानआनमेन आणि निषिद्ध शहर (Forbidden City)
Primary tabs
===================================================================
ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...
===================================================================
बायजींगचा पहिला दिवस
बायजींगमधल्या भटकंतीचा पहिला थांबा तियानआनमेन हॉटेलपासून पायी ५ मिनिटावरच होता. टूर मॅनेजरने सर्व टूरभर हॉटेल्स अशीच मोक्याच्या ठिकाणची निवडली होती.) तियानआनमेन म्हणजे स्वर्गीय शांततेचे द्वार (Gate of Heavenly Peace). हा सम्राटाच्या राजमहालाचा म्हणजेच Forbidden City चा मुख्य दरवाजा. Forbidden City म्हणजे चीनच्या सम्राटाचा राजवाडा, यांत एका ठराविक इमारतीनंतर मोठ्या सरदारांनाही प्रवेश निषिद्ध होता. सामान्य जनतेलातर त्याच्या मुख्य दरवाजाच्या आत येण्यासही मनाई होती. त्यामुळेच या राजवाड्याला Forbidden City असे ओळखले जाते. हा राजप्रासाद इतका मोठा आहे की त्यात एकावेळी ९,९९९ लोक राहत असत. कारण ९,९९९ कारण हा आकडा त्या काळी शुभ आणि सत्तेचे प्रतीक समजला जात असे . चीनमध्ये या राजवाड्यात राहणाऱ्यात केवळ सम्राटच फक्त पुरुष असे, शिवाय एक सम्राज्ञी आणि इतर सर्व नपुंसक (Eunuch) असत. नपुंसक परंपरा हा चीनच्या क्रूर सम्राट संस्कृतीचा अविभाज्य भाग होता. या प्रथेची सुरुवात पराजित सैन्यातील सैनिकांना शिक्षा म्हणून झाली. काही वेळेस अत्याचारी लोकांनाही ही शिक्षा होई.परतू सम्राटाच्या सेवेत असणारे केवळ Forbidden City मध्ये कामगार किंवा गुलाम म्हणून काम करण्यासाठी त्यांच्या मर्जीविरुद्ध व जबरदस्तीने eunuch बनवले जात. बायजींगच्या मिग राजघराण्याच्या पदरी ७०,००० नपुंसक होते. काही नपुंसक राजदरबारी उच्चपदस्थही होते. एकजण तर जनरलच्या पदापर्यंतही पोचला होता. अधिक माहिती आंतरजालावर आहे(http://en.wikipedia.org/wiki/Eunuch#China).
Forbidden City मध्ये शिरण्याआधी कुप्रसिद्ध तियानआनमेन चौक दिसतो (हाच चौक जेथे ४ जून १९८९ ला लोकशाही हक्कांकरता निदर्शन करणाऱ्या लोकांना गोळ्या घालून मारण्यात आले होते). तियानआनमेन व तियानआनमेन चौक हे चीनमधील सर्वात महत्त्वाच्या स्थळांपैकी आहेत. चीनच्या राष्ट्रीय दिनाचे संचलन येथेच होते.तियानआनमेन चौकाची अधिक माहिती येथे मिळेल: http://en.wikipedia.org/wiki/Tiananmen_Square_protests_of_1989). तियानआनमेन चौकाच्या तीन बाजूंस महत्त्वाच्या सरकारी इमारती आहेत व एका बाजूस तियानआनमेन म्हणजेच Forbidden City चे प्रवेशद्वार आहे.
तियानआनमेन चौक
तियानआनमेन (Gate of Heavenly Peace / Main Gate of the Forbidden City)
तियानआनमेनमधून Forbidden City मध्ये प्रवेश केला की समजते की या राजवाड्यास city का म्हणतात ते. अगदी शहर नाही तरी एकाद्या उपनगराएवढा याचा विस्तार आहे. चीनसारख्या अगडबंब साम्राज्याचा गाडा चालवण्यास आवश्यक त्या सर्व इमारती या एकाच जागी आहेत. एक खास इमारत सम्राटाच्या रोजनिशीसाठी राखून ठेवलेली होती. रोजचा अहवाल लिहून संध्याकाळी तो सीलबंद करून येथे ठेवला जात असे. या प्रथेमुळे हजारो वर्षांचा चीनचा इतिहास आजही उपलब्ध आहे. Forbidden City च्या चारी बाजूंनी ५ ते ६ मीटर उंच भिंत आहे. मात्र पाणी असलेला खंदक फक्त मागच्या बाजूसच आहे (का ते गाइडला माहीत नव्हते).
असो, असे म्हणतात की एक चित्र १,००० शब्दांपेक्षा जास्त परिणामकारक असते...
Forbidden City ०१
.
Forbidden City ०२
.
Forbidden City ०३
.
Forbidden City ०४
.
Forbidden City ०५
.
Forbidden City ०६
.
Forbidden City ०७
.
Forbidden City ०८: या इमारतीत सम्राटांच्या रोजनिश्या जपून ठेवलेल्या होत्या.
.
Forbidden City ०९: ड्रॅगनचा रस्ता, फक्त सम्राटासाठीच राखीव रस्ता.
चीनमध्ये ड्रॅगन हे सम्राटाचे चिन्ह समजले जात होते. इतर कोणासही ते चिन्ह वापरण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे कम्युनिस्ट सत्ता सुरू झाल्यावर त्यांनी ड्रॅगनला काही काळ वाळीत टाकले होते. पण आता ते एक मनोरंजनाचे साधन झाले आहे. बरेच सर्वसामान्य चिनी अजूनही ड्रॅगनला शुभ मानतात. घरामध्ये मोक्याच्या जागी आणि विशेषतः घरावर त्याचे स्थान असते.
Forbidden City १०: राजदरबार आणि सिंहासन
.
Forbidden City ११: सम्राटाचे शयनगृह
(क्रमशः)
===================================================================
ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...
===================================================================
लिखते राहो!
फोटो दिसले नाहीत ,परत निवांत पणे उघडून बघीन,विकीच्या लिंक ठीकाय पण तुम्हीच इतका छान लिहू शकताय तर तुमच्या शब्दात वाचायला जास्त आवडेल बघा,
मराठीतून टंकण्याचा सराव नाही त्यामूळे जरा अडचण आहे. शिवाय वेळही बराच लागतो. पण सरावाने पुढच्या भागांत ही त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल.
पहील्या भागांतले फोटो आता तुम्ही बघू शकाल. या भागांतलेही फोटो लवकरच दिसू लागतील.
सगळे फोटो आवडले. प्रशस्त आवार, भव्यता लक्षवेधक आहे.
आवडलं. वेगळं अन जुनं.
एक बारीक शंका : "त्या" रस्त्यावरुन सम्राट चालत जायचा का कसा?
अहो जरा सांभाळून ! बापरे !! चक्क सम्राटाला चालायला सांगता !? ..... (:O.
ड्रॅगनमार्गावरून सम्राटाची पालखी तरंगत जायची... नंपुसक गुलामांच्या खांद्यावरून. ड्रॅगनमार्गाच्या दोन्हीबाजूंनी पाहिर्या आहेत त्या गुलामांना चालण्यासाठी. ड्रॅगनमार्गावर जर कोण्या सर्वसामान्य माणसाचा पाय पडणे म्हणजे शिच्छेदाला आमंत्रण !
अप्रतिम प्रवासवर्णन आणि छायाचित्रे. लेखात छायाचित्रे समाविष्ट करण्यासाठी मदत http://www.misalpav.com/node/13573 इथे आहे.
पैसाताई, अनेकानेक धन्यवाद !
पैसाताई, अनेकानेक धन्यवाद ! पहिल्या भागातील चित्रे चिकटवली आहेत. या भागातलीही लवकरच दिसू लागतील. हे केवळ तुम्ही माझा प्रश्न सोडवल्यानेच जमले.
गणपांचे अनेक आभार... इतक्या आवश्यक माहितीचा धागा काढल्याबद्दल.
सर्व प्रतिसाद देण्यारर्यांचेही मनापसून धन्यवाद !
प्रवासवर्णन हा प्रकार स्थळाच्या वैयक्तिक अनुभवानेच खुलून दिसतो. छायाचित्रे आणि माहिती तशीही गुगलून मिळतेच. चीनमधले तुमचे अनुभव वाचायला आवडतील. पु. प्र .शु
बर झाले.....त्त्याने नाहि बघितले तुम्हाला फोतो कधताना हा........हा....
जरा जपुन करा हो अशि कामे.
पुन्हा एकदा धन्यवाद, तुमच्या शब्दातली माहिति आवडली.
वर्णनशैली आवडली, फटूंबद्दल बहुत काये लिहिणे :) और आंदो लौकरात लौक्कर!!
मस्त सफर घडवलीत...एक पिक्चर पाहिलेला 'कर्स ऑफ गोल्डन फ्लॉवर' का काय तो, त्यामधला शुटींग या चौकातच झालय का आणि त्याच सम्राटाविषयी
तो पिक्चर आहे का ?
काही कल्पना नाही.
विशेष माहीतगार मंडळींच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.
फारच सुंदर सचित्र लेख झाला आहे मित्रा
चीन त्यांच्या पोलादी भिंतीमागे बरेच काही दडवून आहे , व त्याची आदरयुक्त भीती सार्या जगाला आहे, पण त्यांनी पर्यटनात सुद्धा घेतलेली आघाडी भारताच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. भारताने जगात मनात आणले तर पर्यटनात नंबर १ होऊ शकतो.
आमच्याकडे अनेक चीनी पर्यटक येतात. युरोपियन भव्यता पाहतांना दडपून न जाता उलटपक्षी आपल्या देशात येण्याचे आमंत्रण देतात.
आज त्यांच्या आमंत्रणामागील इंगित कळाले.
एवढ्या विशाल ,अर्वाचीन देशासंबंधी अशीच माहिती देत राहा.
आधीचा भाग आणि हा भाग दोन्ही आवडले. :) फोटो जरासे आकाराने लहान टाकले तर अजुन छान वाटेल...
बाकी तुम्ही इस्पीकचा एक्का ते चौकटचा राजा ही नावांची शॄंखला अजुन देखील पुढे आहे काय ? ;)
(बदामचा राजा) ;)
सर्वांचे प्रतिसादांबद्दल धन्यवाद !