जे न देखे रवी...

भुंगा

Primary tabs

अजाण भुंगा एका दिवशी
बागेमध्ये भ्रमरत होता
नाजुक सुंदर फुले आगळी
अन थोडिशी कोळी जाळी

अल्लड सावज अवचित आले
भराभरा ते जाळे विणले
कोळी वदला फुला आपला
स्नेह निराळा सख्य निराळे

त्या वेड्याला पाहुन पटकन
फुलानेच एक जाळे विणले
होता कोळी हरकामी तो
भराभरा तो डाव मांडला

उधळुन देता परागसुमने
भुंगा वेडा धावत आला
भुंगा वेडा असाच होता
आप्तांपासुन दुरावलेला

दिसता कोमल फुल आगळे
वेडा भुंगा मोहित झाला
झेप घेउनी मर्म स्थळावर
गुज फुलाचे ऐकत बसला

फुलही वदले शोककथा ते
अनाघ्रात मी सुंदर होते
पण जगाची तर्‍हाच न्यारी
कुस्करले अन गचाळ म्हटले

कोळ्याने मज घात हा केला
सभोवती हे जाळे विणले
तुच आगळा माझ्यासाठी
पटकन उडला सत्वर आला

वेडा भुंगा ऐकत बसला
दु:खी झाला कष्टी झाला
कोळ्याने तो करता इशारा
फुल लागले पंख मिटाया

समजुन कावा भुंगा वेडा
यत्न निसटण्या करु लागला
फुल म्हणाले वेड्या भुंग्या
कावा तुज का नाही उमगला

ये आता ये शोषुन घे मग
मधुरस पाहिजे हवा तेवढा
खजिल भुंगा शेवटचा तो
प्रणय करण्यास अधिर झाला

दुज्या सकाळी रविकिरणांनी
फुलास नाजुक पुन्हा उठवले
निसटुन गेले कलेवर काळे
अनायसे ते जाळ्यात पडले.
.
.

मदनबाण

कविता आणि फोटो दोन्ही सुंदर.....

(मिपा वरील भ्रमर )
मदनबाण.....

इनोबा म्हणे

लेका कविता कधीपासून करायला लागला रे!
कविता आवडली. अजून येउ दे!

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

विजुभाऊ

एक संस्कृत श्लोक......

रात्री: गमिष्यसि भविष्यसि सुप्रभात
भास्वानुदेष्यसि हसिष्यसिपंकजश्री:
इथ्यं विचियन्ती कोषगते द्विरेफे
हा हन्त हन्त नलीनीं गज उच्चहारः
रात्र जाईल सकाळ होईल
सूर्य उगवेल आणि कमळ उमलेल ( मग मी बाहेर पडेन)
असा विचार करत भुंगा (मिटलेल्या)कमळात बसून राहीला
अरेरे..हत्ती नी ते कमळ (मिटलेल्या अवस्थेत) खुडुन टाकले की......

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

शितल

चा॑गली केलीस रे कविता.
अजुन येऊ देत.
बाकी ईनोबाला पडलेला प्रश्न मला ही पडला.

छोटा डॉन

कविता तर चांगलीच भारी लिहली आहेस ...

बाकी, हा नाद कधी लागला ...

स्वगत : आयला मीच एकटा " दगड" राहिलो आहे असं वाटतयं ..

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मला तर आंद्याची कविता वाचून धक्काच बसला. येवढी अप्रतिम कविता केली आहे कसे काय जमते राव लोकाना. ते अविनाशशेठ, पुष्कराज आता हा आंद्या काय भारी भारी कविता करतात राव. मस्तच.
पण चला नुसताच दगड राहीलेला मी एकटाच नाहीये.. :)
(खाणीतला दगड)
पुण्याचे पेशवे

II राजे II (verified= न पडताळणी केलेला)

मस्त जमली आहे कविता.....
आवडली !
**

राज जैन
येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

कुंदन

मस्त लिहिलीय कविता...
अगदी गुणगुणत राहावीशी वाटते..

वरदा

छान आहे कविता आणि चित्र दोन्ही...

धनंजय

"भ्रमरत" मध्ये "भ्रम-रत" आणि "भ्रमत" असे दोन अर्थ निघून श्लेष होतो आहे.

यशोधरा

ह्म्म्म.... वो औरंगाबादको जाऊन आनेके बाद ये कविता बनी हैं ना??? आ रहा हैं मेरे ध्यानमें थोडा थोडा... आते आते रस्तेंमें लिख डाली क्या?? और लिख्खो!
;)

विसोबा खेचर

आयला आंद्या, कविता लै भारी रे!

च्यामारी, तू पण एक कवी आहेस हे माहीतच नव्हतं! :)

तात्या.

चेतन

काय रावं

मस्त कविता करता की. अजुन येउ द्यात

भ्रमर चेतन

ऋचा

मस्त आहे रे कवीता.

इथे सगळेच कवी आहेत.
काही "दगड" आहेत.

(काही दगडातली एक दगडी)
-ऋचा
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

प्रगती

वा! काय सुंदर रचना केली आहे.
वाचता वाचता भुंग्याच्या दु:खात नकळत समरस झाले.
फोटो पण छान आहे.

अरुण मनोहर

पुढील ओळींवर थोडी मेहनत घ्यायला हवी होती. थोडा नादभंग झाला.

त्या वेड्याला पाहुन पटकन
फुलानेच एक जाळे विणले
होता कोळी हरकामी तो
भराभरा तो डाव मांडला

आनंदयात्री

सर्वांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल केलेल्या कौतुकाबद्दल आभारी आहे.
धन्यवाद. :)

अभिज्ञ

कविता बेस झालीय.
छानच.
पुलेशु.

अभिज्ञ.

मनस्वी

आनंदयात्री
छान कविता! रुपक सुंदर वापरले आहेस.

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."