मेडोविना (Medovina) ग्लु वाईन
Primary tabs
मेडोविना म्हणजे मधाची वाईन. चेक रिपब्लीक व स्लोवाकिया येथे हि वाईन ख्रिसमस मार्केट मधे खुप प्रसिद्ध आहे. हि वाईन मधापासुन बनवलेली असते. त्यात फळांचा जुस, फळे, मसाले व साखर टाकुन हि वाईन गरम केली जाते. ख्रिसमस मार्केटमधे मस्त थंडी (साधारण पणे -10 ते -15 degree celcius) असताना हि मेडोविना प्यायला खुप छान वाटते. हि प्यायल्या नंतर थंडी पुर्ण पणे गायब होते ;)
मिपाकरांना आवडेल अशी आशा आहे. ;)
साहित्यः
मेडोविना - २ कप (मेडोविना नसल्यास कुठ्लीही स्वीट रेड किंवा व्हाईट वाईन)
संत्री - २
सफरचंद - १
Lemon zest - १ छोटा चमचा
दालचिनी - १ इंचाचा तुकडा
चक्रीफुल - २
लवंगा - २
साखर - २ चमचे
मिक्स्ड ड्राय फ्रुट्स - २ चमचे
कॄती :
१. दोन्ही संत्री कापुन घ्यावीत. त्यातील एका संत्र्याचा ज्युस काढावा व दुसर्या संत्र्याचे तुकडे करावेत.
२. सफरचंदाचे तुकडे करुन घ्यावेत.
३. एका पातेल्यात वाईन घ्यावी. त्यात संत्र्याचा ज्युस, संत्री, सफरचंद व lemon zest टाकुन मिक्स करावे.
४. त्यात दालचिनी, चक्रीफुल, लवंगा, मिक्स्ड ड्राय फ्रुट्स व साखर टाकावे.
५. हे मिश्रण गॅसवर ५-१० मिनिटे अगदी मंद आचेवर गरम करावे.
६. ह्यास उकळी आणु नये. त्याच उकळी आल्यास त्यातील आल्कोहोल evaporate होइल.
७. ५-१० मिनिटांनी मेडोविना ग्लासात ओतुन, गरम वाईनचा मस्त थंडीत आस्वाद घ्यावा.



अग्ग्ग्ग्गग! भारी, अगदी सोनेरी दिसतीये. सोत्रींची आठवण आली.
सुरेख फोटू.
आईशप्पथ कसला भारी फोटु आहे .......
फोटु पाहुनच टांगा पलटी घोडे पसार :)
टांगा पलटी घोडे पसार
अगदी अगदी!! फारच छान फोटो आहेत.
मेडोविना. चला आता ही शोधणे आल.
लिंबू, दालचिनी, चक्रीफुल, लवंगा इतकं सर्व घालून ही मसालेदार भारतीयत्व धारण करणारी कलाकृती तुम्ही निर्माण केली असेल तर कल्पनाशक्तीची दाद दिलीच पाहिजे, नुसते घटकपदार्थ वाचूनच थंडी पळेल :-)
बाकी बहुधा mead-wine/ meodu-wine अशी व्युत्पत्ती असलेली ही medovina; यातला meodu हा olde English मूळ शब्द आणि आपल्याकडचा 'मधु' यातलं साम्य जाणवलं. (आणि अर्थातच हरिवंशराय बच्चन यांची 'मधुशाला'ही आठवली!)
नाव वाचून एकदम 'मोनालिसा' आठवली.
भन्नाट लागत असणार यात शेंकाच नाय. :)
मध्यंतरी या मेडोविनाबद्दलच मिपावर वाचल्याचं आठवतय.
काय दिसतंय, काय दिसतंय! फोटो एक नंबर आहेत.
गेल्या शनिवारीच ख्रिसमस मार्केटमधे गरम वारूणीचा लुफ्त घेतला. पण इकडे अशी साग्रसंगीत नाही मिळत. लाल वारूणीत मसाले (ती पण फक्त दालचिनी असावी) आणि साखर घालून देतात.
आम्हा दोघांना ही मल्ड वाईन आवडते पण मेडोविना (मध असलेली) वाईन कधी प्यायलो नाही
फोटो बघूनच गट्ट्म करावीशी वाटत आहे खासकरून ह्या थंडीत :)
;) मला पण रेड वाईन पेक्षा मधाची वाईनच जास्त आवडते. मस्त लागते एकदम. इथे असच एक फ्रुट पुंच (पंच) पण मिळते. पण त्यात व्हिस्की, रम, फ्रुट ज्युस आणि हे मसाले असते. मी फक्त वाईन पिते, त्यामुळे ह्याची पाकृ नाही टाकली ;)
नुसती पाहुनच नशा आली...भन्नाट लागत असणार ह्यात शंकाच नाही...इथे राजाच्या देशात बाकि सगळं काही आहे फक्त ह्याचं सुख नाही (अती दुखी: स्मायली)