गाज अर्र हल उवा अल अमिरी..(गाजर हलवा)
Primary tabs
साहित्य :
१. लाल बुंद गाजरे १ किलो
a. स्वच्छ धुवून व कोरडी ठक्क पुसून वरचे वर किसून..(मधला पिवळट पांढरा भाग घेवू नये)
२. १ लिटर ताजे निरसे दूध
३. साखर : २- ३ मोठ्या वाट्या...
४. केशर : २-३ चिमट्या
५. बदाम : १०० -१५० ग्राम्स मामरा बदाम ज्यास्त चांगले
६. पिस्ते : १०० ग्राम्स (अफगाणी पिस्ते जे विशेष करून प्रशांत कोर्नेर ठाणे येथे मिळतात)
७. बेदाणे : १०० ग्राम्स (अफगाणी ...वरच्या पिस्त्यान प्रमाणेच)
८. काजू : १०० ग्राम्स/ १५० ग्राम्स मोठे
९. तूप : ५०० ग्राम्स घरी कढवलेले : साजूक (चितळ्यांच्या लोण्याचे असेल तर फारच उत्तम)
१०. मोठे जाड बुडाचे पातेले २
११. तुमची इंग्लिश डिक्शनरी
कृती :
एका पातेल्यात दूध मंदाग्नीवर तापायला ठेवावे...कोमट झाल्यावर साखर घालून हलकेच ढवळावे..
बदाम पिस्ते काजू जाड जाड क्रश करून घ्यावे त्याच्यातले १/३ ३ च्माचे तुपात १ मिनट परतून घ्यावे व बाहेर काढावे...
दुसऱ्या पातेल्यात सुमारे ३०० ग्राम्स तूप माध्यम आचेवर पातळ करून हळू हळू मुठी मुठीने किस्लाले गाजर घालुन परतत राहावे..गाजराच्या प्रत्येक कणाला तूप लागले पाहिजे .. थोडी आंच वाढवा ...गाजराच्या मध्ये खड्डा करा व बाजूने हलकेच दाबत राहा म्हणजे गजराच्या किसातील पाणी मध्ये येईल..ढवळा - खड्डा -ढवळा...बर्यापैकि पाणी निघेउन गेल्यावर २ /३ चमचे तूप टाकून पुन्हा ढवळा...
इकडे दुधाला माफक उकळि आली असावी...आता त्या दुधात केशर तळहातावर चुरून टाका..बेदाणे सोडून बाकीचे ड्राय फ्रुट्स (साधे व तळलेले )घाला व थोडी आंच वाढवा...दुधाला फर्मास उकळी आली पाहिजे...
एकीकडे गाजरे व दुसरीकडे दूध चालू देत ढवळणे...कंटाळा आला कि मधून मधून १-२ चमचे तूप टाकत राहा गाजरावर..
दुधाला थोडे आटले कि त्याला झकास केशरी रंग येईल..पिस्ते उत्साहाने वर तरंगू लागतील..
आता थोडी काळजी पूर्वक कृती....
उकळते दूध शिजनार्या गजरांवर ओतायचे आहे...वाफ हातावर येऊ देऊ नका...दुधाच्या पातेल्यातील तळाला व बाजूला चिकटलेला मसाला नीटकाढून गाजारावर टाका...
ह्या मिश्रणावर उरलेल्या तुपातले ४ चमचे काढून घेउन बाकीचे तूप टाका..व ते जे काही समोर दिसते आहे ते हलक्या हाताने एक जीव करत राहा ...आंच माध्यम ... ५-७ मिनिटांनी बेदाणे घाला व आंच थोडी वाढवा...हे मिश्रण आटून येईपर्यंत धीर धरा (१० -१५ मिनटे)...खाली लागू देवू नका.
आंच बंद करून झाकण ठेवा.. आणि हो ते उरलेले ४ चमचे तूप द्या सोडून कडेने...
आता इंग्लिश डिक्शनरी उघडा...calories diet weight हे शब्द नाहीसे झालेत ह्याची खात्री करून ते झाकण उघडा आणि तुटून पडा..
वरील कृती साधारण १ माणसाला एका वेळी पुरी पडावी....:-)))))
काल गाजर आणले आणि आज ही पा.कृ...!!!
धन्यवाद..!!
डिक्शनरी कशाला ते वाचून ह.ह.पु.वा.
काय प्रॉब्लेम आहे सिलेंडर सहाच, म्हणून खव्याचे विचारले नाहीतर आपल्या क्रुतीला तोड नाही. फोटो दिसत नाहीय त्यामुळे या शाही हलव्याचा अंदाज येत नाही.
अन जरा ह्याची आठवण असू द्या
फोटु शिवाय प्रतिसाद नाय.
(पाकृ वाचून .पिस्त्यासारखा उत्साहाने वर तरंगू लागलो आहे)
सोबत आइसक्रीम मिळाले तर तर बरे या विचारात -रामदास
मी तर फक्त फोटु साठी पाक्रुझ बघते .. :)
करायला तितकासा हुरुप नसतो बै मला :-/
गाजर हलवा खैला खुप आवड्तो :)
छानच....
एक किलो गाजरे किसून झाल्यावर पाऊण किलो होतील.
त्यात अर्धा किलो तूप अन एक लीटर दूध ? आणि सुमारे अर्धा किलो सुकामेवा ?
हलवा 'कुपोषित' लोकांसाठी आहे काय ?
कुपोषित नाही...अट्टल खवैय्यांसाठी आहे ....करून पहा खावून पहा...नक्की आवडेल
खरं तर किंचित जायफळ आणि वेलची सुद्धा बरी लागते ह्यात पण वेलची चे दाणे चावातांना खान-समाधीत व्यत्यय येतो-..
थोडक्यात, गाजराचा किस तुपात तळून घ्यायचा आहे. रेसिपी प्रचंड आवडली आहे, पण फोटो नसल्याने दहातून एक मार्क वजा करणेत येत आहे.
साहित्य आणायाला चाललो आहे..करून झाला कि फोटो टाकतो...
पहिल्याच पाककृतीला मिळालेल्या प्रतिसादाने उल्हासित होत्साता (अतरंगी पाउस )
साहित्य आणलं का ? मग करा बघू हलवा अन लौकर फटू टाका राव.

अन तोपर्यंत आमचा गरिबाचा हा घ्या..
धन्यवाद स्नेहांकित!!!
एका दुसऱ्याच कामात अडकलोय...पण झाल कि नक्की टाकतो...घरी पण हलव्यासाठी बंदुका रोखलेल्या आहेत आता :)
नक्की करून पहाते. झक्कास. बाकी डिक्शनरीची आयडिया लै भारी:)