Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भूक

अ — अरुण मनोहर, Tue, 12/18/2012 - 21:10
आला तेव्हा होता नंगा, त्याले कपडे घातले सोन कांतीचिये रंगा, त्याचे रुपडे झाकले कपड्यांच्या अंगा अंगा, सदा लागलेली भूक जिव्हा खादाडीचा दंगा, डोया हवे दृष्टीसूख कान मागती सुराले, त्वचा आसुसली स्पर्शा नाक सुवासा हुंगते, सारी शोधताती हर्षा पंचेद्रियांचे चोचले, पुरविता पुरे नाही किती ह्यांना भरविले, देह वखाखला राही कपड्यांच्या अंतर्भागा, वसे सोनेरी झळाळी त्याची भूक भागेना गा, मारी आक्रोशाने हाळी सारे देहाचे चोचले, पुरे होती त्याचे लाड तेज भुकेने गांजले, पाच गजांचिये आड पंचेंद्रिये अंग अंग खाउ खाउनी खंगले जीर्ण होताची तुरूंग तेज मोक्षाशी धावले

प्रतिक्रिया द्या
2412 वाचन

💬 प्रतिसाद (14)
स
समयांत Wed, 12/19/2012 - 10:54 नवीन
अहिराणी भाषेचा स्पर्श दाद देण्याजोगा आहे. विषय सध्या सगळीकडे चर्चिला जात आहे, त्या अनुषंगाने आपली कविता योग्य वाटत आहे.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 12/19/2012 - 11:03 नवीन
झकास एकदम. शब्द शब्द आवडेश.
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 12/19/2012 - 11:54 नवीन
कविता अतिशय आवडली आहे.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 12/19/2012 - 12:03 नवीन
अर्थगर्भ कविता. अन तालात चालणारे चपखल श्ब्द.
  • Log in or register to post comments
ल
लीलाधर Wed, 12/19/2012 - 15:07 नवीन
आवडेश सुंदर अप्रतिम
  • Log in or register to post comments
क
केदार-मिसळपाव Wed, 12/19/2012 - 17:41 नवीन
लेखकची तळमळ जाणवते...
  • Log in or register to post comments
क
केदार-मिसळपाव Wed, 12/19/2012 - 17:42 नवीन
शेवट्ची ओळ म्हणजे जिवनाचा सारन्श....
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 12/19/2012 - 17:42 नवीन
वेगळीच कविता. आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 12/19/2012 - 20:53 नवीन
सुरेख. खूप आवडली
  • Log in or register to post comments
अ
अनिल तापकीर गुरुवार, 12/20/2012 - 07:11 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 12/20/2012 - 07:48 नवीन
मस्त!!
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर गुरुवार, 12/20/2012 - 16:53 नवीन
मस्त :)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 12/20/2012 - 17:37 नवीन
ष्टैल आणि भाषा दोन्ही आवडेश. मस्त!! :)
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Sat, 01/05/2013 - 20:13 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा