जगत रहायच,जगत रहायच
जगत रहायच,जगत रहायच
जगत रहायच,जगत रहायच
झाडाने जन्म दिलेल्या फुलासाठी
फुलाने जन्मदात्या झाडासाठी
कधी प्रेम म्हणून, कधी कर्तव्य म्हणून
कधी ओझे म्हणून, कधी नाइलाज म्हणून
तेच तेच करत रहायच
जगत रहायच,जगत रहायच
जगत रहायच,जगत रहायच
स्वप्नांच्या अपमार्जकाचे फुगे
हवे मधे सोडत रहायच
काही पहायचे उंच उडताना
काही तेंव्हाच फुटताना
अमिबाच्या विभाजनासारख
एकातून दूसरी, दुसर्यातून तीसरी
वासना प्रसृत करत रहायच
जगत रहायच,जगत रहायच
जगत रहायच,जगत रहायच
गवताने पहायचे झाडाकडे
झाडाने डोंगराकडे,
अन डोंगराने उंच आकाशाकडे
आणि मांडायच समीकरण
आपल्या खुजेपणाचे.
भुकंप झाला तरी बेहत्तर
उंची आपली वाढवत रहायच
जगत रहायच,जगत रहायच
जगत रहायच,जगत रहायच
असे चढत रहायच उंच उंच
आपणच पाठिवर घेउन आपल्याला
आपण एकाच वेळी थकलेले अन आनंदी.
फेकून देता येत नाही मातीत
स्वत:च स्वत:ला
म्हणून मर मर मरत रहायच
जगत रहायच,जगत रहायच
जगत रहायच,जगत रहायच
- कौस्तुभ आपटे
http://www.facebook.com/AseSphuraveGeet
💬 प्रतिसाद
(4)
अ
अनिल तापकीर
गुरुवार, 12/20/2012 - 07:06
नवीन
आवडली..छान आहे
- Log in or register to post comments
अ
अनन्न्या
Sat, 12/22/2012 - 15:18
नवीन
कवितेतले काही कळत नाही पण कवितेतून व्यक्त होणारी जीवनाबद्द्लची निरसता खटकली.
- Log in or register to post comments
अ
अनन्न्या
Sat, 12/22/2012 - 15:30
नवीन
जगत रहायचं, जगत रहायचं
रोज नव्याने फुलत रहायचं,
नित्य नव्या आव्हानांना,
आनंदाने झेलत रहायचं
ही कविता नव्हे, जीवन असे असावे असे मला वाटते.
- Log in or register to post comments
क
कौस्तुभ आपटे
Sun, 12/23/2012 - 15:34
नवीन
anannnya
तुम्ही 'चित्ते विशण्णे भुवनं विषंण्ण्,चित्ते प्रसन्ने भुवनं प्रसन्नम' हा श्लोक वाचला असेल. तसच आहे एखद्दाला असे अनुभव येतात कि तो त्या त्या दृष्टीने बघतो. वरील कविता म्हणजे एक वैयक्तिक दृष्टीकोन आहे...ते त्या त्या वेळी जे वाटल तसं लिहिल आहे....
तुमचीही कविता छान आहे...धन्यवाद...
- Log in or register to post comments