Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आजूनहि मी

श — श्रीमत, गुरुवार, 12/20/2012 - 09:14
अजूनही अजूनही मी वावरतो ह्या माणूस हरवलेल्या सनातन शहरात ऐकतो पवित्र परंपरा अन संस्कृतीचा झिंगलेला जयघोष, नग्न करून धिंड काढलेल्या स्त्री बद्दलचे, भाड्याने आणलेल्या रडव्यांचे मुक्त पंचतारंकित परिसंवाद गरिबी हटाव आणि जाती वादाच्या मादक गर्जना.......... पहातो लोकशाहीच्या शाही सुपुत्रांकडून लोकांवर झालेला पाशवी बलात्कार निर्विकारपणे मनावर एकही ओरखाडा उमटू न देता मी मित्रांबरोबर चहा पितो ,सिगारेट ओढतो, हिंदी सिनेमा पहातो प्रयेसीच्या दारावर चक्कर मारतो............ मग रात्री निर्लज्जपणे माझ्यातला मी, स्वत:ला विचारतो एवढा का मी षंढ अजून ही???????????? -- सुतार अंबेजोगाई ( कवितेच्या मूळ लेखका बद्दल एवढेच माहित आहे माझ्या काहि संग्रहित कवितेमधली ऐक)

प्रतिक्रिया द्या
873 वाचन

💬 प्रतिसाद (2)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 12/20/2012 - 11:54 नवीन
पहिलं वाहिलं लेखन मिपावर दिसतंय, लिहित राहा. लेखन टाकण्यापूर्वी एकदा लेखन पूर्वपरिक्षण मोडमधे पाहून घेतले की मोठ्या चुका राहात नाही. जसे- लोकशाईच्या शाही सुपुत्रांकडून लोकांवर झालेला पावशी बलात्कार बाकी, अंबेजोगाईच्या परिसरातील लेखनही येऊ द्या. अंबेमाताच्या दर्शनाला येऊन आता दोन वर्ष झाली. मुकुंदराजांच्याबद्दल वगैरे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Fri, 12/21/2012 - 05:44 नवीन
श्रीमंत कविता आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद. मी थोडी दुरुस्ती केली आहे. कारण ...एव्हढ्या चांगल्या कवितेचं हसं नको व्हायला हे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा