Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

देह आत्म्याचे मंदीर

अ — अरुण मनोहर, Mon, 12/24/2012 - 07:34
उभे भक्कम पायावर एक राजस आहे घर तेथे भगवंताचा वास, देह आत्म्याचे मंदीर देणे लाभले इश्वरी चमत्कार खरोखरी त्याचे लोभस रुपडे काया रेशमी गोजीरी चार खांबांचा निवारा दोन नेत्रांचा पहारा आत्माराम तेजोमय राही धरूनी पिंजरा नको भरू ते धूराने नको माखू काजळीने प्राणज्योतीचे देऊळ ठेवी त्याला निगुतीने देह आत्म्याचे मंदीर दिव्यतेजाचे ते घर उरे मूठभर माती जाता प्राणपक्षी दूर लक्ष चौ-यांशी फ़े-यांत आला मानवी देहात नको घालू रे करंट्या देणे इश्वरी, कच-यात

प्रतिक्रिया द्या
1884 वाचन

💬 प्रतिसाद (11)
अ
अनिल तापकीर Mon, 12/24/2012 - 08:04 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 12/24/2012 - 08:25 नवीन
मागची आणि ही अश दोन्ही कविता आवडेश. अवांतर :- शिर्षक वाचून मिपावरच्या डांबिस आत्म्याचे मंदीर वैग्रे उभे राहिले का काय अशी शंका वाटून गेली.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 12/24/2012 - 10:31 नवीन
@मिपावरच्या डांबिस आत्म्याचे मंदीर वैग्रे उभे राहिले का काय अशी शंका वाटून गेली. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© >>>> आपल्याला वाटून गेली,हे 1 आश्चर्यच आहे. :-b
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
र
रणजित चितळे Mon, 12/24/2012 - 09:38 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
स
समयांत Mon, 12/24/2012 - 09:50 नवीन
आवडली मलाही बाकी देहकॉन्शियस का इतके?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे
प
पाषाणभेद Mon, 12/24/2012 - 17:49 नवीन
सुंदर काव्य
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Tue, 12/25/2012 - 01:58 नवीन
सोप्या शब्दात अप्रतीम संदेश आर्धवटराव
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Tue, 12/25/2012 - 02:17 नवीन
धन्यवाद मित्रान्नो!
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 12/25/2012 - 06:06 नवीन
आणि सुरेख शब्दयोजना. कविता आवडली.
  • Log in or register to post comments
त
तिमा गुरुवार, 12/27/2012 - 14:37 नवीन
'द्येह द्येवाचे मंदिर' येवढेच माहित होते, उदयराज गोडबोले यांच्या गाण्यामुळे. आता हे नवीन कळले.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 12/30/2012 - 06:27 नवीन
सुरेख... :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा