जे न देखे रवी...

पारिजात

Primary tabs

नव्हती कधीच अपेक्शा सख्ये तुझ्या समागमाची
भेटीस हाय का मग आली माझ्या ही रात्र आसवाची

केले किती बहाणे मी तुज दुर सारण्याचे
ओठात हाय का मग आले हे तराणे तुझ्या स्मरणाचे

दुरस्थ मी जरासा होतो रणान्गणाहुनि
जखम हि अशी या अश्वथाची हाय का आली मग नशिबी

आता कुठेशी होती झाली जगण्यास सुरुवात माझ्या
हे घाव का मग बान्धिलेस तु ललाटीस माझ्या

गुन्फले तुज मी स्वप्नात माझ्या, श्वासात माझ्या
चान्दण्याचे शाप का मग निद्रेस माझ्या

नव्हती कधीच अपेक्शा ना मोगरयाची ना चाफेकळीची
गजरा काट्यान्चा हाय का मग असा हा नशिबी माझ्या

वेचिल्या तुझ्यचसाठी मी तारकान्च्या दीपमाळा
माझ्याच आसमन्ती हाय का मग उल्केचा हा रोष आला

आठवणीत माझ्या जपले मी स्पर्शान्चे पारिजात तुझ्या
कोठेतरी कसाही आहे का परन्तु मी आठवणीत तुझ्या

धनंजय

जमा केलेली आहे कल्पनांची.

पुढील लेखनासाठी शुभेच्छा.