Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक रानगोष्ट

अ — अरुण मनोहर, Tue, 12/25/2012 - 02:20
एक रान ल्याले होते पानांपानांतून मोती गलबला पक्षी तेथे न जाणे कशास करीती एक रान ओले होता चिमण्यांची शाळा भरली पर्णांच्या छत्र्यांमध्ये चिवचीव उजळणी केली एक रान चिंब भीजता धारांच्या बघ पागोळ्या थेंबांनी रांग करूनी रेखिल्या शुभ्र रांगोळ्या एक रान हसते जेव्हा किरणांच्या स्पुल्लिंगांनी सुर्याची पिल्ले पिवळी बुंध्याशी जमती ढिगांनी एक रान रात्री लाजले वारा गात्रांशी दंगा चंद्राची मादक किरणे तशांत लगटली अंगा एक रान करी आक्रोश लपटूनी केशरी ज्वाळा सोडूनी सोयरे गेले पसरला गालिचा काळा एक रान देई आहूती पुरविण्या मानवी लोभा प्रेतासव हिरवे आसू चघळती यंत्रमय दाढा

प्रतिक्रिया द्या
1089 वाचन

💬 प्रतिसाद (4)
स
समयांत Tue, 12/25/2012 - 14:59 नवीन
एक रान ल्याले होते पानांपानांतून मोती गलबला पक्षी तेथे न जाणे कशास करीती - तिथे जेवण करायला आल्यात म्हणून एकच गलबला उडाला. एक रान ओले होता चिमण्यांची शाळा भरली पर्णांच्या छत्र्यांमध्ये चिवचीव उजळणी केली - शाळा तर भरलीय पण पावसाळ्यात मग आंघोळी करत करत ती सुरू झाली म्हणून कुणी जास्त ओलीचिंब झाले तर कुणी कमी त्याची उजळणी त्या करत आहेत. पुढच्या तुम्ही केलेल्या सुंदर ओळींतुन गझलप्रकार आठवतो. त्यातल्या त्यात एक रान देई आहूती पुरविण्या मानवी लोभा प्रेतासव हिरवे आसू चघळती यंत्रमय दाढा ...हे खूपच सुंदर..
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 12/25/2012 - 15:30 नवीन
काही ठिकाणी शब्दांची जरा ओढाताण झाल्यासारखी वाटली.
  • Log in or register to post comments
अ
अनिल तापकीर Wed, 12/26/2012 - 11:03 नवीन
छान आहे
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Sat, 01/05/2013 - 19:54 नवीन
छानच आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा