Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

झाली माझी गोष्ट

व — वामन देशमुख, गुरुवार, 12/27/2012 - 13:44
झाली माझी गोष्ट एक होतं गाव तिथं होतं पोस्ट झाली माझी गोष्ट. एक होती सासू ती होती खाष्ट झाली माझी गोष्ट. एक होता नेता तो झाला भ्रष्ट झाली माझी गोष्ट. एक होती नणंद ती होती शिष्ट झाली माझी गोष्ट. एक होती प्रेयसी ती झाली रुष्ट झाली माझी गोष्ट. एक होता शेतकरी त्याने केले कष्ट झाली माझी गोष्ट. एक होता मुलगा त्याने खाल्ले टोस्ट झाली माझी गोष्ट. एक होता वक्ता तो बोलला स्पष्ट झाली माझी गोष्ट. एक होता सिद्धांत तो होता क्लिष्ट झाली माझी गोष्ट. एक होतं साम्राज्य ते झालं नष्ट झाली माझी गोष्ट. एक होतं बाळ त्यानं खाल्लं उष्ट झाली माझी गोष्ट. एक होते नागरिक ते होते ज्येष्ठ झाली माझी गोष्ट. एक होता बैल तो होता पुष्ट झाली माझी गोष्ट. एक होता ग्रंथ त्यात होते पृष्ठ झाली माझी गोष्ट. एक होता अंक हो होता अष्ट झाली माझी गोष्ट. एक होता कवी तो होता श्रेष्ठ झाली माझी गोष्ट. एक होती सुंदरी तिला लागली दृष्ट झाली माझी गोष्ट. एक होता राक्षस तो होता दुष्ट झाली माझी गोष्ट. एकदा आली आपत्ती ती होती इष्ट झाली माझी गोष्ट. एक होता शुक्ल त्याला लागले काष्ठ झाली माझी गोष्ट. एक होती ललना लाल तिचे ओष्ठ झाली माझी गोष्ट. एक होता वेडा त्यानं सांगितली गोष्ट झाली माझी गोष्ट. एक आहे सचिन त्याने पिलं बूस्ट झाली माझी गोष्ट.

प्रतिक्रिया द्या
5151 वाचन

💬 प्रतिसाद (24)
ग
गणपा गुरुवार, 12/27/2012 - 13:55 नवीन
एक होता वेडा त्यानं सांगितली गोष्ट झाली माझी गोष्ट.
खीक्
  • Log in or register to post comments
ल
लीलाधर गुरुवार, 12/27/2012 - 15:10 नवीन
एक होता वामन त्याला माझे नमन ----^---- झाले माझे स्तवन :)
  • Log in or register to post comments
स
सस्नेह गुरुवार, 12/27/2012 - 15:29 नवीन
पंडितांच्या पांडित्याला __/\__
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 12/27/2012 - 17:21 नवीन
ओव्हन मधे घातली एवढी मोठ्ठी पोश्टं तीचा झाला कडक टोश्टं :-p
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे गुरुवार, 12/27/2012 - 18:34 नवीन
ओव्हन मधे घातली एवढी मोठ्ठी पोश्टं तीचा झाला कडक टोश्टं
=)) =)) =)) कविच्या आडनावाचा आणि कवितेचा विरोधाभास वाटतोय. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
५
५० फक्त Sun, 12/30/2012 - 07:25 नवीन
काय काय कडक करायला काय काय करतात बापरे, मोठा ओव्हन कशाला छोट्याश्या टोस्टर मध्ये कडक होईल की टोस्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
ध
धन्या Sun, 12/30/2012 - 17:08 नवीन
कुणाचा टोस्ट मोठया ओव्हनमध्ये कडक होईल तर कुणाचा छोटयाशा टोस्टरमध्ये. प्रत्येकाच्या टोस्टच्या कडक होण्यासाठीच्या तापमानाच्या, लागणार्‍या जागेच्या गरजा वेगवेगळ्या असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त
स
सस्नेह Sun, 12/30/2012 - 17:12 नवीन
धाग्याची एकूण लांबी-रुंदी व आशयघनता तसेच विषय-व्याप्ती पाहता मोठ्ठ्यात मोठ्ठा ओव्हनही पुरे पडेल काय शंका वाटते...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
ध
धन्या Sun, 12/30/2012 - 17:20 नवीन
आजपर्यंत विषयाच्या व्याप्तीसंदर्भात "व्यासोच्छीष्टं जगत सर्वम" असं म्हटलं जायचं, कारण व्यासांनी महाभारतात मानवी मनाचे सर्व पैलू, कंगोरे वगैरे वगैरे हाताळले आहेत. तेच आज इथे वामनपंडीतांनी केलं आहे. एक मिपाकर म्हणून मला वामनपंडीतांचा अभिमान वाटतो. काही नतद्र्ष्टांना यानिमित्ताने "यमक्या वामन" नावाचे इतिहासातील वामनपंडीत आठवण्याची शक्यता आहे. पण तिकडे आपण दुर्लक्ष करावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 01/02/2013 - 16:49 नवीन
@यानिमित्ताने "यमक्या वामन">>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
आ
आनन्दिता Sun, 12/30/2012 - 05:55 नवीन
गोळा केल्या चिंध्या घातली त्यांना ठिगळं… 'गोष्टीच्या' खोक्यात कोंबलंय भलतच सगळं…:)
  • Log in or register to post comments
त
तिमा Sun, 12/30/2012 - 06:24 नवीन
कविता कळायला अंमळ कठीण आहे. आपण आपली पुढील कविता, 'मानवी उत्क्रांतीवाद' किंवा ' कवितेतील वर्डस्वर्थचे स्थान' अशा एखाद्या सोप्प्या विषयावर करावी ही विनंती.
  • Log in or register to post comments
ए
एस Sun, 12/30/2012 - 17:51 नवीन
. . झाला माझा प्रतिसाद!
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Wed, 01/02/2013 - 12:51 नवीन
प्रतिसादकांचे आभार. माझ्या पुतण्या-पुतणींना रिझविण्यासाठी मी अश्या बाळबोध रचना करायचो. त्यांना त्यांचा अर्थ कळत नसला तरी नक्कीच आवडायच्या. आता "गोष्ट" मालिकेतल्या जेवढ्या गोष्टी आठवल्या तितक्या इथे लिहिल्यात. शाब्दिक गमतीजमती दोन ते पाच वयोगटातील मुलांना खूप आवडतात आणि त्यातून त्यांची Lateral thinking (?), तर्कशक्ती अधिक चांगल्या तऱ्हेने विकसित होते आणि एकूणच भाषेतील गोडी वाढते असा माझा अनुभव आहे.
एक होता वामन त्याला माझे नमन ----^---- झाले माझे स्तवन
पंडितांच्या पांडित्याला __/\__
धाग्याची एकूण लांबी-रुंदी व आशयघनता तसेच विषय-व्याप्ती पाहता मोठ्ठ्यात मोठ्ठा ओव्हनही पुरे पडेल काय शंका वाटते...!
दिस इज मात्र टू मच हं!
आजपर्यंत विषयाच्या व्याप्तीसंदर्भात "व्यासोच्छीष्टं जगत सर्वम" असं म्हटलं जायचं, कारण व्यासांनी महाभारतात मानवी मनाचे सर्व पैलू, कंगोरे वगैरे वगैरे हाताळले आहेत. तेच आज इथे वामनपंडीतांनी केलं आहे. एक मिपाकर म्हणून मला वामनपंडीतांचा अभिमान वाटतो.
दिस इज मात्र फारच टू मच हं! तरीही धन्स बरं का धन्याजी!
गोळा केल्या चिंध्या घातली त्यांना ठिगळं… 'गोष्टीच्या' खोक्यात कोम्बलंय भलतच सगळं…
हं, बरोब्बर ओळखलंत!
कविता कळायला अंमळ कठीण आहे.
सॉरी...!
आपण आपली पुढील कविता, 'मानवी उत्क्रांतीवाद' किंवा ' कवितेतील वर्डस्वर्थचे स्थान' अशा एखाद्या सोप्प्या विषयावर करावी ही विनंती.
हम्म्मम्म... गम्मत करताय नं!
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Wed, 01/02/2013 - 13:04 नवीन
खिक् बडबडगीत म्हणून म्हणायला मजा येईल :)
  • Log in or register to post comments
ह
ह भ प Wed, 01/02/2013 - 13:36 नवीन
आधि गेला सप्त मग आला अष्ट झाली माझी गोष्ट!!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 01/02/2013 - 13:56 नवीन
माझ्या पुतण्या-पुतणींना रिझविण्यासाठी मी अश्या बाळबोध रचना करायचो. त्यांना त्यांचा अर्थ कळत नसला तरी नक्कीच आवडायच्या. आता "गोष्ट" मालिकेतल्या जेवढ्या गोष्टी आठवल्या तितक्या इथे लिहिल्यात. हम्म... हा तुमचा मिपावरील वाचकांच्या सर्वसाधारण वयाचा अंदाज समजायचा का? +D
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 01/02/2013 - 14:13 नवीन
एक होते पंडित केलं सर्व विषयांना उष्टं झाली माझी गोष्ट मस्त "वामनी" कविता हो पंडितजी. आवडेश!
  • Log in or register to post comments
म
मनीषा Wed, 01/02/2013 - 16:38 नवीन
ही गोष्टं छान आहे.. आता दूसरी सांगा .
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Wed, 01/02/2013 - 18:51 नवीन
दुसरा कब ? पैला सुकुल जाने लगे तब.... अरे ही आहे ती तरी पचनी पडुद्या मग दुसरी बघी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा
म
मनीषा गुरुवार, 01/03/2013 - 05:43 नवीन
नाही नाही पन्नासजी ... तुमचा काहीतरी गोंधळ होतो आहे. ही इस्कूलात जाणारी न्हाई.. झाडाखाली पारावर राहणारी आहे.. एका पाठोपाठ एक आली तरी चालतीय .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त
व
वामन देशमुख गुरुवार, 01/03/2013 - 04:47 नवीन
हम्म... हा तुमचा मिपावरील वाचकांच्या सर्वसाधारण वयाचा अंदाज समजायचा का?
नाही हो, इस्पिकराव! मिपाकरांच्या वयाचा अंदाज कुणाला येऊ शकेल का? आणि आजकाल स्त्री-पुरुषांना वयं विचारायची नसतात ना!
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक गुरुवार, 01/03/2013 - 12:45 नवीन
तीन शब्दांच्या काव्यात ... कविला थोडेच कष्ट आयडीया लै ब्येष्ट सुटली गाडी फाष्ट कवि होता ज्येष्ठ त्याची बायको खाष्ट लाल तिचे ओष्ठ सासू सासरे शिष्ठ कवि झाला रूष्ट त्याने खाल्ले टोस्ट त्यावर पिलं बूस्ट झाला थोडा पुष्ट मग बोलला स्पष्ट तुम्ही आहात दुष्ट विवाह संस्था भ्रष्ट जळो हे शुक्लकाष्ठ पुरे झाले कष्ट एकटे राहणे इष्ट संपली आमची गोष्ट!
  • Log in or register to post comments
अ
अनिल तापकीर गुरुवार, 01/03/2013 - 12:48 नवीन
कविता आनि प्रतिसाद दोन्ही आवडले
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा