Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विखुरलेला चंद्र - ३

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Sun, 12/30/2012 - 13:17
विखुरलेला चंद्र - १ विखुरलेला चंद्र - २ त्या रात्री चंद्रही जरा उशीराच उठला शिकार्‍यात तुझ्या समोर बसून मोहवणार्‍या धुक्यातून फिरतांना जणू आरश्यासमोर बसलो होतो ----- हे विधिलिखित कां योगायोग? ----- तुझ्या त्या डायरीतून तू एक एक दु:खपान वाचतही होतीस फाडतही होतीस माझ्या डोळ्यातून चार थेंब ओघळले अगदी ठरल्यासारखे, ठरविल्यासारखे.. ------ काळाने एका विचित्र वळणावर आणून दगा दिला शिकार्‍याचे वल्हे पाण्यात छोटुल्या लाटा पसरवत होते आणि सरणारा काळ हृदयात घण घण वाजत होता अगदी ठरल्यासारखे, ठरविल्यासारखे.. ------ पाण्यावर दूरवर पानेच पाने तरंगत होती घरंगळत ती पाने त्या पाण्यातल्या चंद्रावर जाऊन आदळली... आणि खळ्ळकन आवाज झाला ------ हे ही विधिलिखित कां योगायोग? ------ मी इतकचं म्ह्टलं, तेवढे चांद्रकण घेऊन जा त्या विखुरलेल्या चंद्राची आठवण म्हणून... |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२९/१२/२०१२)

Book traversal links for विखुरलेला चंद्र - ३

  • ‹ विखुरलेला चंद्र - २
  • Up

प्रतिक्रिया द्या
2146 वाचन

💬 प्रतिसाद (6)
क
कवितानागेश Sun, 12/30/2012 - 13:28 नवीन
२/१० नंतर डायरेक्ट ३०/१२. आपल्यावर 'कारणे दाखवा' नोटीस का बजावल्या जाउ नये, याचे कारणे दाखवा! ;) पुढच्याच भागवर या भागाबद्दलची प्रतिक्रिया मिळेल, कितीही छान लिहिलेले असले तरी. :)
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 12/31/2012 - 07:04 नवीन
सपशेल माघार घेण्यात येत आहे. उजव्या कानावर डावा हात व डाव्या कानावर उजवा हात ठेवून माफी मागतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 12/30/2012 - 14:03 नवीन
मधे बराच वेळ गेलेला असला,तरी करंट कंटिन्यू राहिलेला असल्यामुळे... ;-) लाइक इट :-)
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 12/30/2012 - 15:45 नवीन
सगळा उशीर माफ!
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 12/31/2012 - 11:25 नवीन
क्या बात, क्या बात, क्या बात... मिका = उत्कृष्ट दर्जाची काव्यं हे समीकरण प्रत्येक क्रिएशनसोबत आणखी घट्ट होत चाललंय..
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 12/31/2012 - 12:45 नवीन
>>मिका = उत्कृष्ट दर्जाची काव्यं हे समीकरण प्रत्येक क्रिएशनसोबत आणखी घट्ट होत चाललंय. प्रचंड सहमत !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा