आहा... मिसळपावच्या प्रकृतीशी जुळणारा धागा. येऊ देत अजून मिसळींचे फोटो आणि रसग्रहण.. सॉरी, तर्रीग्रहण..
उदा. मिसळीचे बलस्थानः रश्श्याचा झणझणीतपणा. वाटाण्यांचा कमी वापर. फरसाणाचा तिखटगोडपणा. खोबर्याचे वाटण लावलेला रस्सा.
उणिवा: कडक आणि कच्चे कडधान्य. अति पौष्टिकतेमधे टेस्टने खाल्लेला मार. पांचटपणा
वगैरे.. म्हणजे आपल्या सर्वांना कुठेही गेलो तरी मिसळ खाण्याचा इन्फॉर्म्ड डिसिजन घेता येईल.
उदा. इथे खंबाटकी घाटानजिकच्या मिसळीचा फोटो आहे. ती प्रत्यक्ष खाल्ली असता अगदीच पिचकावणी वाटली होती. अशा वेळी फोटोसोबत धागाकर्त्याने त्यावेळचं स्वादाविषयीचं मतही द्यावं. भले सब्जेक्टिव्ह का असेना, अंदाज यायला उपयोग होतो..
धागा उत्तम. इतरांनीही प्रतिसादरुपात इतर मिसळींचे फोटो आणि माहिती डकवावी. एक मिसळोपीडिया तयार होईल.. :)
मिसळपाव पैकी मिसळीचेच भारी कौतूक होत असते, अर्थात त्यात गैर काही नाही, परंतु हॉटेलवाले जो पाव बेकरीतून आणतात, तो जर उत्तम दर्जाचा नसेल, तर सारेच मुसळ केरात जाते. उदाहरणार्थ पुण्याला आमच्या मित्राने कोणत्याश्या प्रसिध्ह मिपावाल्याकडून आणलेल्या मिपातील सर्व पावातून किडे निघाले. किळस येऊन सर्वांचा विरस झाला आणि सर्व काही फेकून द्यावे लागले.
श्री उपहार गृह आणि खंबाटकी घाटाजवळची, दोन्ही मिसळी खाल्ल्या आहेत.
श्री उपहार ची मिसळ मस्त च असते, नुस्ते फरसाण आणी तिखट पाणि नाही. त्यांचा रस्सा तर अफलातुन असतो.
पण ते दुसरे चितळे आहेत. माल संपून जातो आणि पुन्हा करत नाहीत. त्या दिवसापुरते दुकान बंद.
यांची पुर्वी स्टेशनसमोर मोठी जागा होती. तेथे कामगारांनि साधारण २० (अंदाजे) वर्षापुर्वी संप केला (बहुतेक सर्व कामगार मराठी होते) नंतर गोखले ती जागा विकुन गेले. नंतर त्यांच्या मुलाने हे होटेल गोखले रोडला चालु केले. (आठ्वणीतील माहीती आहे. कालखंड चुकु शकतो.)
मिपाकरहो अपग्रेडेशन झाल्यानंतर मस्तपैकी श्रमपरिहार करुन घेउयात लय आवडली बघा सफर :-P
मस्त फोटो! पण फोटोबरोबर प्रत्येक मिसळीची खासीयत लिहिली असतीत तर आणखी मजा आली असती!
@ज्योति: मिसळ हा पदार्थच एक खासीयत आहे...तिची खासियत अजुन काय लिहिणार....
दुखर्या नसेवर बोट ठेवलंत.
असो.
आॅ!!!
एखाद्या व्यक्तिच्या उत्तराला प्रतिसाद कसा द्यायचा हे माहीत नव्हत. तुमचा प्रतिसाद पाहुन कळुन गेल....
भीषण भालो :)
बाबौ..! भलता अब्यास केलेला दिसतो मिसळीचा.
आवो...लहानपणीपसुनच अशा अभ्यासाची सवय आहे.....
@मंगला टॉकीजबाहेर टपरीवरील मिसळ>>
अवो,ही आम्च्या मामांकडची http://www.misalpav.com/node/20578 करंट मिसळ कि वो... जरा तर्रीचे फोटू टाकायचे ना राव...!
आहा... मिसळपावच्या प्रकृतीशी जुळणारा धागा. येऊ देत अजून मिसळींचे फोटो आणि रसग्रहण.. सॉरी, तर्रीग्रहण..
उदा. मिसळीचे बलस्थानः रश्श्याचा झणझणीतपणा. वाटाण्यांचा कमी वापर. फरसाणाचा तिखटगोडपणा. खोबर्याचे वाटण लावलेला रस्सा.
उणिवा: कडक आणि कच्चे कडधान्य. अति पौष्टिकतेमधे टेस्टने खाल्लेला मार. पांचटपणा
वगैरे.. म्हणजे आपल्या सर्वांना कुठेही गेलो तरी मिसळ खाण्याचा इन्फॉर्म्ड डिसिजन घेता येईल.
उदा. इथे खंबाटकी घाटानजिकच्या मिसळीचा फोटो आहे. ती प्रत्यक्ष खाल्ली असता अगदीच पिचकावणी वाटली होती. अशा वेळी फोटोसोबत धागाकर्त्याने त्यावेळचं स्वादाविषयीचं मतही द्यावं. भले सब्जेक्टिव्ह का असेना, अंदाज यायला उपयोग होतो..
धागा उत्तम. इतरांनीही प्रतिसादरुपात इतर मिसळींचे फोटो आणि माहिती डकवावी. एक मिसळोपीडिया तयार होईल.. :)
माझ्या कडे ही काही फोटो आहेत पण एथे प्रतिसादात कसे अपलोड करायचे ते समजत नाही plz मदत कराल का?
लेखात छायाचित्रे समाविष्ट करण्यासाठी मदत इथे आहे.
नाहे ओ......खंबाटकी घाटाजवळच ५-६ होटेल्स आहेत....ही वाली खरच झनझनीत होती.....
कुटबी मिसळ खा... पन कोल्हापुरच्या मिसळीची लज्जत कुटच गावनार न्हाय !
(चोरगे,मोहन अन् फडतरे यांच्या मिसळीचा चाहता.) :)
सहमत :)
श्री मदनबाण - कोल्हापूरात मटणाचा (बहुदा शिळा!) रस्सा घातलेली मिसळ कुठेतरी मिळते. त्याबद्दल माहिती आहे का काही?
शिळ्या रश्शाची चव चाखली आहे का कधी ?
ताज्यापेक्षा भारी लागते राव...
खासबाग अन बावडा मिसळ इसरला की पावनं !
मिसळपाव पैकी मिसळीचेच भारी कौतूक होत असते, अर्थात त्यात गैर काही नाही, परंतु हॉटेलवाले जो पाव बेकरीतून आणतात, तो जर उत्तम दर्जाचा नसेल, तर सारेच मुसळ केरात जाते. उदाहरणार्थ पुण्याला आमच्या मित्राने कोणत्याश्या प्रसिध्ह मिपावाल्याकडून आणलेल्या मिपातील सर्व पावातून किडे निघाले. किळस येऊन सर्वांचा विरस झाला आणि सर्व काही फेकून द्यावे लागले.
पुढील भागाची वाट पहात आहे. एक मिसळ प्रेमी
श्री उपहार गृह आणि खंबाटकी घाटाजवळची, दोन्ही मिसळी खाल्ल्या आहेत.
श्री उपहार ची मिसळ मस्त च असते, नुस्ते फरसाण आणी तिखट पाणि नाही. त्यांचा रस्सा तर अफलातुन असतो.
पण ते दुसरे चितळे आहेत. माल संपून जातो आणि पुन्हा करत नाहीत. त्या दिवसापुरते दुकान बंद.
बेडेकरांची मिसळ(?) आणि स्लाईस पाव विसरलात??
अॅडिशन... ठाण्यातली गोखले उपाहारगृहाची "उभ्या उभ्या" चटकदार मिसळ..
कट / रस्सा / सँपलः (एक्स्ट्रा चार्ज पडेल !! ;)
वैशिष्ट्ये: झकास चव (मुख्य).. कांदाबटाटा, मटकी आणि अन्य घटकांचा व्यवस्थित रस्सा, फरसाणाची खुसखुशीत क्वालिटी.. ताजे आणि लुसलुशीत पाव..
कमतरता: कमी जागा, उभ्याने खाणे (अर्थात ही मिसळीची कमतरता नव्हेच), रस्सा एक्स्ट्रा घेतल्यास चार्ज..(६ रुपये) पण वर्थ इट... :)
यांची पुर्वी स्टेशनसमोर मोठी जागा होती. तेथे कामगारांनि साधारण २० (अंदाजे) वर्षापुर्वी संप केला (बहुतेक सर्व कामगार मराठी होते) नंतर गोखले ती जागा विकुन गेले. नंतर त्यांच्या मुलाने हे होटेल गोखले रोडला चालु केले. (आठ्वणीतील माहीती आहे. कालखंड चुकु शकतो.)
समर्थ वडेवाले, पुणे-नाशिक मार्गावर एकदा जायलाच पाहिजे असे

मिसळ पाव
वडा सायंपाल
चिंचवड गावातली नेवाळे मिसळ ज्यांनी कोणी खाल्ली असेल … तेच फक्त सांगू शकतील झटका म्हणजे काय असते
पिंपरी चिंचवड जवळ कासरवाडी येथे 'मनाली हायवे स्पाट मिसळ'(अल्फा लव्हाल समोर) एकदम झनझनीत.... आणि पिंपरीगाव येथिल जनता भुवन मिसळ' लै बेस्ट...