तेजाळलेल्या रात्रीचे क्षण
कुठे आहेस तू?
त्या तेजाळलेल्या रात्रीचे क्षण
अजूनही रेंगाळतायत,
तुझी लाल चुटुक टिकली
माझ्या दंडावर घट्ट आहे,
निसटलेला एक चुकार केस चिकटलाय
त्या उशीवर, लांबसडक...
कपाळावर तुझ्या ओठांची
महिरपी मोहर,
घरभर तुझ्या गजऱ्याचा मोगराच दाटलाय,
अन् हातांच्या तळव्यावर
तुझ्या गालांचा सायस्पर्श घुटमळतोय,
-----
पण तू कुठे आहेस?
-----
तू इतकी जवळ आहेस,
कि तुला पाहू तरी कसे?
जरा दूर जाशील तर पाहता येईल ना..
जराशी दूर हो... पाहू तरी
तेजाळलेल्या रात्री मोगरा माळलेला
गुलाब कसा दिसतो....
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(०१/०१/२०१३)
💬 प्रतिसाद
(9)
स
स्पा
Wed, 01/02/2013 - 08:22
नवीन
जबर्या शृंगारिक का काय ते... ;)
कसं काय सुचतं नै ;)
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 01/02/2013 - 19:23
नवीन
@जबर्या शृंगारिक का काय ते...>>> 11111111
@कसं काय सुचतं नै>>> =)) बघ,बघ खोकलीच्या ! :-D नाय तर तू ********** :-b
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 01/03/2013 - 12:47
नवीन
मिक्या कडे कल्लास लावायला हवा आता ;)
पण हल्ली तो कुठे तोंड घेऊन गेलाय देव जाणे
- Log in or register to post comments
आ
आर्णव
Wed, 01/02/2013 - 13:16
नवीन
जमली आहे.
श्रुन्गार रस ठासुन भरला आहे
- Log in or register to post comments
M
michmadhura
गुरुवार, 01/03/2013 - 12:35
नवीन
गुलाबही लाजेने चूर होऊन जाईल असे मनमोहक काव्य. खूप आवडले.
- Log in or register to post comments
अ
अनिल तापकीर
गुरुवार, 01/03/2013 - 12:49
नवीन
सुंदर
- Log in or register to post comments
इ
इन्दुसुता
Fri, 01/04/2013 - 05:19
नवीन
खूप आवडली कविता..
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Sun, 01/06/2013 - 11:46
नवीन
मोहरलेले काव्य!
खुप आवडले.
- Log in or register to post comments
व
वपाडाव
Mon, 01/07/2013 - 13:26
नवीन
तु दगड ...
- Log in or register to post comments