Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शांती नवं वर्षातली

अ — अत्रुप्त आत्मा, गुरुवार, 01/03/2013 - 11:32
नावातकायआहे... यांनी ख.फ...सुना सुना झाल्याचे पाहुन तिथे शांति करायचे आंमंत्रण आंम्हास दिले..http://www.misalpav.com/user/7405 पण आमच्या मनातुन आज ही वेगळीच शांति बाहेर आली,,, तिचे बीजंरोपण केंव्हा झाले?-ते शोधायची हुरहुर लाऊन... नावातकायआहे,म्हणती मला इथेही लागणार करावी शांती ,या नवं वर्षी ही... आंम्हासी आहे येथे, रोजचाची मुहुर्त, लाकडे पेटवा फक्त, आग लाऊनी... होम हवन शांती,करायची कोणी? पापांच्या भरल्या गोणी,ते शांत झोपिले बा... नसे कोणी येथे,भला वीर ऐसा जो आत्मबळे सार्‍यांना,देऊ शके शांती... मी ही सांगे मना,टाक थोडी आहुती संसारास निगुती,ऐसी मानवे ना... खरे तेची मर्म,जे हाती घडे कर्म प्राप्य अ-प्राप्य सारे,सामावले त्यात... होऊन बैसलो मी,दुनियेचा या भाट दक्षिणेचा थाट,येथे कुचं कामी... शेवटी तशी माझीही,पेटणार अखंड धुनी चार आसवांची शांती,अखंड करोनिया... =================================================================================

प्रतिक्रिया द्या
6566 वाचन

💬 प्रतिसाद (35)
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 01/03/2013 - 11:35 नवीन
होम हवन शांती,करायची कोणी? पापांच्या भरल्या गोणी,ते शांत झोपिले बा खरे तेची मर्म,जे हाती घडे कर्म प्राप्य अ-प्राप्य सारे,सामावले त्यात... होऊन बैसलो मी,दुनियेचा या भाट दक्षिणेचा थाट,येथे कुचं कामी... शेवटी तशी माझीही,पेटणार अखंड धुनी चार आसवांची शांती,अखंड करोनिया...
व्वाह बुवा... आज मिपावर आल्याचे सार्थक झाले... खुप सुंदर...
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 01/03/2013 - 11:40 नवीन
कं लिवलय , कं लिवलय बुवा __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
म
मूकवाचक Fri, 01/04/2013 - 04:27 नवीन
+२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
क
कवितानागेश गुरुवार, 01/03/2013 - 12:14 नवीन
:)
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 01/03/2013 - 12:19 नवीन
शेवटी तशी माझीही,पेटणार अखंड धुनी चार आसवांची शांती,अखंड करोनिया... आवडले...
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 01/03/2013 - 12:32 नवीन
मस्त लिहिलंय.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह गुरुवार, 01/03/2013 - 12:37 नवीन
नवं बर्ष 'शांती'चं जाणार तर !
  • Log in or register to post comments
अ
अनिल तापकीर गुरुवार, 01/03/2013 - 12:44 नवीन
छान
  • Log in or register to post comments
न
निश गुरुवार, 01/03/2013 - 13:27 नवीन
अत्रुप्त आत्मा साहेब, वा झकास काव्य.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 01/03/2013 - 13:51 नवीन
लै भारी हो आत्मूस. मस्त लिहिलंय एकदम!!!
  • Log in or register to post comments
ध
धन्या गुरुवार, 01/03/2013 - 13:52 नवीन
प्रचंड आवडल्या गेले आहे. असंच काही लिहित जा राव. उगाच आपलं भांडं घेऊन ताक मागत फीरता. ;)
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 01/03/2013 - 15:33 नवीन
मी ही सांगे मना,टाक थोडी आहुती संसारास निगुती,ऐसी मानवे ना... हे जास्त आवडले. भारीये कविता.
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे गुरुवार, 01/03/2013 - 17:11 नवीन
झकासच आणि धन्यारावांशी प्रचंड बाडिस!
  • Log in or register to post comments
ध
धन्या गुरुवार, 01/03/2013 - 17:17 नवीन
मी ही सांगे मना,टाक थोडी आहुती संसारास निगुती,ऐसी मानवे ना...
यातलं निगुती म्हणजे काय? सवड का?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 01/03/2013 - 18:29 नवीन
@यातलं निगुती म्हणजे काय? सवड का?>>> नाही. इथे निगुती या शब्दाचा मतितार्थ मी वेगळ्या पद्धतीनं वापरलाय. मी ही मनाला सांगतोय,कृत्रिम,निव्वळ भावनिक उपायच अता जगताना कर.माझ्या दुबळ्या(संसारि)मनाला परखड सत्याकडे जाणारे,एकंहि टप्पा न चुकवता येणारे, कठोर मार्ग (=निगुती) जमणारे नाहित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
क
किसन शिंदे Fri, 01/04/2013 - 03:03 नवीन
मस्तच लिहलंय हो बुवा. बाकी आपल्या इतर कवितांवर बाजार उठवणारा वल्ल्या आता कुठे गायब झालाय म्हणे? ;)
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Fri, 01/04/2013 - 04:09 नवीन
तुझे चालणे अन मला वेदना / अचपळ मन माझे नावरे आवरिता आणि प्रवास 'माझ्या मना बन दगड' कडे. - अशातली वाटली ही कविता. आज अचानक एवढे निगेटिव्ह विचार का हो बुवा ? अवांतर - @ मा.संपादक की जे श्री. किसन शिंदे यांक, मा. संपाद्क कि जे श्री. वल्ली हे हल्ली, अँटी सॉल्ट आणि अँटीपेपर जॅकेट हुड्कतात असे समजले आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 01/04/2013 - 04:53 नवीन
=)) बाकी बुवांच्या इतर कवितांचा पण मी फ्यान आहे. मा. स. सं. किसन शिंदे यांच्या निराधार आरोपांचा निषेध. :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त
म
मोदक Mon, 01/07/2013 - 09:15 नवीन
नुस्ते अँटी सॉल्ट आणि अँटीपेपर जॅकेट नै कै.. अँटी सॉल्ट आणि अँटीपेपर वॉटरप्रूफ जॅकेट म्हणा.. :-D बुवा - काव्य झकास जमले आहे. कच्चा माल.. कच्चा माल.. म्हणून उघडले पण सुखद धक्का बसला. (भ्रमनिरासामुळे आनंदित) मोदक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त
ब
बॅटमॅन Mon, 01/07/2013 - 09:51 नवीन
(भ्रमनिरासामुळे आनंदित)
एग्झॅक्टलि हेच्च म्हणायचे होते, धन्यवाद रे मोदका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
प
प्रचेतस Fri, 01/04/2013 - 04:51 नवीन
होऊन बैसलो मी,दुनियेचा या भाट दक्षिणेचा थाट,येथे कुचं कामी... शेवटी तशी माझीही,पेटणार अखंड धुनी चार आसवांची शांती,अखंड करोनिया...
खूप सुंदर.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Fri, 01/04/2013 - 05:42 नवीन
शांती? अच्छा बालिका गेली आता शांती काय? आत्मुस कविता फारच हळवी आहे. तुम्हाला शोभत नाही. पन फकत कविते बद्दल बोलायच तर अतिशय उच्च!
  • Log in or register to post comments
व
वपाडाव Fri, 01/04/2013 - 06:31 नवीन
हेच्च अन असेच बोल्तो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
५
५० फक्त Fri, 01/04/2013 - 06:55 नवीन
बोलुन घ्या बोलुन घ्या सगळ्या धाग्यावर कमी दिवस राहलेत बोलायचे, नंतर सगळा मुक्याचा संसार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 01/04/2013 - 11:36 नवीन
@लायचे, नंतर सगळा मुक्याचा संसार आहे.>>> =)) अश्या तह्रेनी वपा यांचा डाव झालेला आहे. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त
ब
बॅटमॅन Fri, 01/04/2013 - 15:03 नवीन
मुक्यावर श्लेष काय बेक्क्क्कार मारलाय =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त
स
सूड Sat, 01/05/2013 - 16:25 नवीन
शब्दश्लेष की अर्थश्लेष म्हणे ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Sun, 01/06/2013 - 12:14 नवीन
मूकपणे आश्लिष्ट झाल्यास क्व शब्दः क्व अर्थः भो: सुडकेश ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
आ
आर्णव Fri, 01/04/2013 - 08:10 नवीन
आवडली. सुन्दर काव्य.
  • Log in or register to post comments
ल
लीलाधर Fri, 01/04/2013 - 14:51 नवीन
आवडेश ओ बुवा :)
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Fri, 01/04/2013 - 18:00 नवीन
कविता आवडली. अवांतर : वपाडाव यांना अनेक शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 01/05/2013 - 16:18 नवीन
गुर्जी हि अत्यंत आवडली आहे ;)
  • Log in or register to post comments
प
पक पक पक Sun, 01/06/2013 - 03:57 नवीन
मस्त..... :) आवड्ली...
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sun, 01/06/2013 - 11:48 नवीन
नववर्षारंभी सुंदर रचना आहे बुवा!
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 01/07/2013 - 07:06 नवीन
छान... (विडंबनाचं) भूत जरा लांब ठेवा म्हणजे असा अस्सल (बुवा) आम्हाला लाभंल्..आणि हो "वपा" यांना जोर्दार शुभेच्च्छा....
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा