भटकंती

कोंकण-मालवण दौरा....

Primary tabs

डिसेम्बर शेवटच्या आठवड्यात कोंकणात जाणे झाले..
तिकडच्या नैसर्गिक सौंदर्याचे काही फोटोज...
कॅमेरा - Sony Cybershot DSC W570

१. ट्रेनीतून जाताना मस्त सूर्योदयाचे दर्शन झाले....
1

२. अशी बैलगाडी बघितली कि अगदी गावात आल्यासारखं वाटत, एकदम फ्रेश....
2

३. आम्ही ज्या हॉटेल मध्ये राहिलो होतो तिथून दिसणारा हा समुद्रात दडलेला सिंधुदुर्ग किल्ला .....
3

४.
4

५. हॉटेल च्या सभोवताली असलेले झोपडे...
5

६. समुद्राकाठील हवेचा आस्वाद घेणारा कावळा....
6

७. स्वछंदी...
7

८. काय असेल याच्या मनात?
8

९.
9

१०. वल्हव रे नाखवा वल्हव वल्हव...
10

११. मी केलेला किल्ला...
11

१२. शब्द नाही सुचले....
12

१३.
13

१४.
14

१५.
15

१६. रॉक गार्डन येथील सूर्यास्त- केवळ अप्रतीम (कोणताही इफेक्ट दिलेला नाहीये फोटोला)
16

१७. अचानक लालसर अश्या आकाशानंतर थोड्याच वेळात सूर्य अस्ताला गेल्यावर वातावरण हे अस झाल..
17

१८. अंबोली घाटात जात असताना...
18

१९. अंबोली घाटातील एक बघण्याजोगा एको पोइन्ट
19

२०.
20

२१. किती तो इंनोसन्स...
21

२२. मालवण मधून निघताना मालवणातील एका गणेश मंदिरातली हि गणेशाची आरास अगदी प्रसन्न करते....
22

ह भ प

अप्रतीम फोटो..
हाटेलाचे डिटेल्स वगैरे दिले असतेत तं बर्र जालं अस्तं..

कपिलमुनी

रीसाईझ करा बर थोडे !!

प्रवास वर्णन आणि डीटेल्स येउ द्या

सौरभ उप्स

सविस्तर वर्णन आणि माहिती संपादन करेन लवकरच.. फोटो रेसाइज केले तर क्वालिटी लॉस होतेय म्हणून नाही केली... :(

Smaller display

फोटोला प्रत्यक्ष लहान करण्याची आवश्यकता नाही. एच टी एम एल कोड मध्ये height व height मूळ प्रतीपेक्षा कमी लिहिल्यास तोच फोटो लहान दाखवता येतो. या प्रतिसादात मी width="640" height="480" असे वापरले आहेत.

फोटोज आवडले हेवेसांनल...

स्मिता.

सर्वच फोटो सुरेख आहेत. सूर्यास्ताचे फोटो अप्रतिम आहेत.

नंदन

फोटू मस्त आलेत. सूर्यास्त आणि एको पॉईंटचा तर क्लासच! फोटो रिसाईझ करून त्यावर क्लिक केल्यास ते मोठ्या साईझमध्ये उघडतील अशी काही सोय करणं शक्य आहे का?

बाकी मालवणला जाऊनही मासळीच्या ताटाचा फोटू न टाकल्याबद्दल मंडळ विशेष आभारी आहे ;)

पैसा

फोटो मस्त आहेत. कोंकण आहेच सुंदर! फक्त फोटो रिसाईझ न केल्यामुळे अर्धेमुर्धेच दिसतायत हा तोटा. उजवा कॉलम त्यावर ओव्हरलॅप होतोय..

छायाचित्रे भयानक मोठी आहेत. थोडी लहान करा की राव..! बाकी सर्वच छायाचित्रे सुंदर आहेत. मालवणात मालवणी खाजा आणि मालवणी माश्याचे कालवण, कोंबडी वडे इ.इ. असते तर अजून आवडले असते.

खबो जाप

तुम्ही जो इको पोईंत लिहिला आहे १९ २० मध्ये तो कावळे सात पोइन्त आहे, कारण तिथल्या डोंगरात पावसाळ्यात तिथे साथ धबधबे पडतात
माझ्या कडे खालील फोटो आहे तिथला,बर्याच दिवसापूर्वी मोबईल वर काढला आहे पण सांभाळून घ्या
तुम्ही जिथून काढला आहे ती जागा दुसर्या बाजूने
(इथे पावसात इतका सुसाट वर असतो कि पडणारे पानी खुपसे परत वर येते)
NA

बाकीचे धबधबे तिथे सात आहेत पण मोबाईल मध्ये तीनच मावले

NA

निश

सौरभ साहेब, फोटो अप्रतिम.

वपाडाव

सुर्यास्त अन त्यानंतरचा फटू अव्वल...

अनन्न्या

बाकी आमचे कोकण आहेच सुंदर!! पैसाताईशी सहमत.

अशोक सळ्वी

चित्राना वर्णनाची जोड नसल्याने मजा आली नाही. मिपाच फेसबुक होवु नये हिच इछा!

त्रिवेणी

16 नं. चा फोटो खूपच आवडला.
आणि बैलांच्या शिंगांचा रंगही खूपच यूनिक आहे.

स्पा

एक नंबर फोटो
DSLR घेऊन टाका आता ;)

दौरा बाकी तुफान झालेला दिसतोय

आदूबाळ

सौरभः १, २ आणि १३ विशेष आवडले. मालवणला को.रे.चे टेशन नाही ना? सावंतवाडीला उतरून जावं लागतं, बरोबर?

अँग्री बर्ड

सावंतवाडीतून जाउन परत मागे कश्याला येता ? ह्यापेक्षा कणकवलीला उतरा, तिथून काही बस तर सरळ "कणकवली रेल्वे स्टेशन-स्थानक-मालवण" अश्या आहेत, अथवा कुडाळमधून जा, कुडाळमधून मालवण बाजारपेठ २२ किमी आहे, कणकवलीमधून ३३ किमी .

आनन्दिता

९ नंबरच्या फटूत भरलेल्या पक्षांची शाळा मोठी शिस्तीची दिसतेय...!

यशोधरा

८, १८ आणि १९ आवडले.
फोटो रिसाईझ करुन व्यवस्थितरीत्या टाकता येतील का?

मस्त आहेत छायाचित्रे. 'निसर्ग नुसता कचर्‍यासारखा सांडला आहे' इति कवी नायगावकर.

अवांतरः मला इथे मस्कतमध्ये मालवणी/गोवन उपहारगृह सुरू करायचे आहे. कोणाच्या ओळखीत चांगले अनुभवी मालवणी/गोवन स्वयंपाकी (कुक्स), सहाय्यक स्वयंपाकी, वेटर्स असतील तर कृपया मला व्यनी करावा.

नानबा

जब्राट फोटूग्राफी हो उप्स राव.