Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रांतिक किंवा भाषीय वाद

प — पंकज रुगे, गुरुवार, 01/10/2013 - 15:38
बिहारींना होतोय बिहारचा भास सरदारांनी घेतलाय पंजाबचा ध्यास मराठ्यांनी धरलीय महाराष्ट्राची कास कोंडतोय यात एका भारतीयाचा श्वास ... आजोबांनी लढली स्वातंत्र्याची लढाई बाबांनी लढली धर्माची लढाई आपण लढतोय प्रांताची लढाई मुले लढतील त्यांच्या भागाची लढाई... शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही केल्या थांबेना महागाईचा फुगा आटोक्यात येईना अन्यायाविरुद्ध कोणी संघर्षही करेना प्रांताच्या नावाखाली एकमेकांचा जीव काही सोडेना... दहशतीचा काळ काही केल्या थांबेना सीमाही आता सुरक्षित वाटेना विदेशी कंपन्यांची मक्तेदारी मोडेना तरीसुद्धा आपण प्रांत काही सोडेना... सगळ आता कळतया पण मन मात्र वळेना विचार आपला बदलतोया पण कृती मात्र होईना... बदलूया आणि सुधारुया योग्य आचरण आणि कृती करूया देशाला विघटनापासून वाचवूया...

प्रतिक्रिया द्या
965 वाचन

💬 प्रतिसाद (3)
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 01/10/2013 - 15:41 नवीन
विचार छान मांडलात. फक्त एक सुचवतो, यमक जुळवायला शब्दांशी तडजोड करु नका. सहज सुचलं ते सांगितले राग आला असेल तर क्षमस्व.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 01/10/2013 - 18:39 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
१
१००मित्र गुरुवार, 01/10/2013 - 18:49 नवीन
तळमळीने मांडलयंत , ते खूप आवडलं बाकी काव्यगुण वगैरे... मिसळलेल्या काव्यप्रेमींची सूचना छानच आहे !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा