Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

खोल खोल मनामध्ये...

व — वेणू, Sun, 01/13/2013 - 08:14
धुंद आठवांची रात, जेव्हा डोळ्यात निजेल खोल खोल मनामध्ये तूच तूच दाटशील एक एक पान माझे, सुटे सुटे रे होईल हर एक अक्षराला, गंध तुझाच असेल चंद्र खिडकीशी पुन्हा, रेंगाळेल, खोळंबेल गळालेले रितेपण मुठी भरून घेईल तुझ्या सयी सार्‍या स्निग्ध, सभोताली फुलतील तुझ्या गालातले हसू, माझ्या ओठी उमलेल हूरहूर, रूखरूख, चित्त बेभान करेल जरा शहाणे झालेले, मन पुन्हा वेडावेल तेच रूप ह्या जगाचं, पण नवीन भासेल तेच काजळ डोळ्याचं, पण नव्याने हसेल खुळ्या मनाच्या भ्रमांची, भूल मलाही पडेल तुझ्या असण्याचे भास, नसण्याला असतील कंच बहर फुलांचा, जरी उद्या ओसरेल ताजा आठव तुझाच, माझ्या ओंजळी असेल - बागेश्री ब्लॉगवरही प्रकाशितः http://venusahitya.blogspot.in

प्रतिक्रिया द्या
1485 वाचन

💬 प्रतिसाद (8)
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 01/13/2013 - 09:10 नवीन
खुळ्या मनाच्या भ्रमांची, भूल मलाही पडेल तुझ्या असण्याचे भास, नसण्याला असतील.>>> छा..............न !!! :-)
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 01/13/2013 - 10:42 नवीन
छान आहे!
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Sun, 01/13/2013 - 19:37 नवीन
सुंदर वर्णन!!
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 01/14/2013 - 09:31 नवीन
मस्त झालीये. :)
  • Log in or register to post comments
स
समयांत Mon, 01/14/2013 - 16:27 नवीन
एक सुंदर कविता. शब्द खूप आवडलेत.
  • Log in or register to post comments
श
शुचि Tue, 01/15/2013 - 17:03 नवीन
कंच बहर फुलांचा, जरी उद्या ओसरेल ताजा आठव तुझाच, माझ्या ओंजळी असेल
कंच शब्द आणि एकंदर या ओळींचा अर्थच फार शृंगारीक आणि मनोहर वाटला.
  • Log in or register to post comments
व
वेणू Sat, 01/19/2013 - 03:52 नवीन
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार मानते.. आज मी निवांत डोकावले आहे मिपावर, भरपूर वाचणार आहे... अभिप्राय नोंदवणार आहे :)
  • Log in or register to post comments
अ
अनिल तापकीर Mon, 01/21/2013 - 10:50 नवीन
सुंदर शब्दात बांधलेली आवडली
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा