Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मी नव्याने कोवळा झालो...

ध — धन्या, Mon, 01/14/2013 - 19:01
मिपावरील जुन्या आणि नव्या अशा सर्व आदरणीय जिलेबी सम्राटांस वंदन करुन हे जिलेबीचे ताट आपल्यासमोर ठेवत आहे. या काव्याची प्रेरणा काय आहे हे जाणकार कवितेतील काही शब्दांवरुन ओळखतीलच. प्रेरणा कळली नाही तरी जिलेब्यांचा आस्वाद घेण्यात काही अडचण येणार नाही याची आम्हांस खात्री आहे. --------------------------------------------------------- अ‍ॅक्टीवावरी घालूनी मांडी, मी नव्याने कोवळा झालो अहो फेडूनीया धोतर माझे, मी पँटीत* सोवळा झालो सहा आसनीत बसली बाला, परी मज वाटेना काही जणू मुरूनी अनुभवांच्या, मी बरणीत आवळा झालो जरी पाहीना तिजकडे मी, ती निमित्त परी एक ठरली आठवणींत मम यौवनाच्या, मी रंगूनी बावळा झालो गेली नजर चु़कूनी जेव्हा, भिरभीरते नेत्र त्या षोडशेचे नजरेत अडकूनी मात्र तेव्हा, मी क्षणभर कावळा झालो आला सहा आसनीचा थांबा, गती जराशी मंद झाली बा़जूला काढत अ‍ॅक्टीव्हा, मीही शांत मावळा झालो गाडीतून उतरली कन्या, येई फडकावीत हाती चिठ्ठी म्हणे काका हा पत्ता सांगा, मी झणी मोरावळा झालो ------------------------------------------------------------ * हा शब्द "फुलपँटमध्ये" असा वाचावा. अन्यथा अर्थाचा अनर्थ होऊन आमच्या जिलब्यांना कचर्‍याचा डब्बा दाखवला जायचा.

प्रतिक्रिया द्या
6502 वाचन

💬 प्रतिसाद (50)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 01/15/2013 - 15:36 नवीन
गाडीतून उतरली कन्या, येई फडकावीत हाती चिठ्ठी म्हणे काका हा पत्ता सांगा, मी झणी मोरावळा झालो जबरा. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
शुचि Tue, 01/15/2013 - 16:36 नवीन
मोरु होणे हा वाक्प्रचार माहीत होता. पण मोरावळा होणे हा नवीनच विचार समोर येतोय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ध
धन्या Tue, 01/15/2013 - 16:40 नवीन
परंतू मराठी साहित्यात नव्यानेच रुढ होऊ पाहणार्‍या जिलबीकाव्यात यमक जुळवण्यासाठी शंब्दाची अशी मोडतोड करण्याची "लिबर्टी" कवीला असते. त्या लिबर्टीमुळेच इथे मोरुचा मोरावळा झाला आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
श
शुचि Tue, 01/15/2013 - 16:46 नवीन
पोएटीक लायसन म्हन्त्यात त्याला भाऊ (काका) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
ध
धन्या Tue, 01/15/2013 - 16:54 नवीन
त्याचं काय आहे, जिलबीकाव्य हा साहित्यप्रकार जालावर भुछत्रासारख्या उगवलेल्या नव्या पीढीतील नवकवींनी सुरु केलेला असल्याने त्यांना अजून मराठी काव्याचा अर्वाचीन/प्राचीन इतिहास आणि त्यासंबंधीच्या संज्ञा माहिती नाहीत. (यातलं अर्वाचीन म्हणजे काय हे कुणी सांगेल का? :) ) रच्याकने, ते अ‍ॅक्टीवावाले काका आम्ही नाही बरं का. ते बिचारे त्या पोरीने काका म्हटल्यावर अतृप्त मनाने कुठेतरी डोकं थंड होण्यासाठी कुठे ताक मिळतंय का ते शोधायला गेले. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
स
स्पंदना Tue, 01/15/2013 - 22:43 नवीन
(यातलं अर्वाचीन म्हणजे काय हे कुणी सांगेल का? )
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र वाचीन वाचीन म्हणत हुतो खरं..... असा काहीसा अरथ असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
श
शुचि Tue, 01/15/2013 - 22:56 नवीन
हाहाहा मस्त :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
ध
धन्या Wed, 01/16/2013 - 03:59 नवीन
एक नंबर !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
श
शैलेन्द्र Tue, 01/15/2013 - 16:20 नवीन
कड्डक तीन तारी पाकातली जिलेबी.. तुकडा मोडावा म्हणतो..
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 01/15/2013 - 16:25 नवीन
Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
ध
धन्या Tue, 01/15/2013 - 16:36 नवीन
आम्ही तुम्हालाही मांडी घालून अ‍ॅक्टीवा चालवताना पाहिलं आहे. तुम्हालाही कधी असा अनुभव आला होता का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 01/15/2013 - 16:41 नवीन
@तुम्हालाही कधी असा अनुभव आला होता का? >>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
५
५० फक्त Tue, 01/15/2013 - 17:13 नवीन
मांडी घालुन अ‍ॅक्टिव्हा, काहीच नाही मी काही(धी)काही(धी) बुवांना मांडी घालुन अल्टो चालवताना पाहिलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ध
धन्या Tue, 01/15/2013 - 17:18 नवीन
मारुतीनं ऑटो ट्रान्समीशन वाली अल्टो काढल्याचं अजून तरी वाचण्यात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त
५
५० फक्त Tue, 01/15/2013 - 17:38 नवीन
मारुतीला पर्वतावरुन संजीवनी नाय काढता आली, अ‍ॅटो अल्टो फार लांबची गोष्ट आहे, असो तुमच्या वाचण्यात आलेलं नसेल पण आमच्या पाहण्यात आलेलं आहे. आता पुरावे मागु नका म्हणजे मिळवलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
स
स्पंदना Tue, 01/15/2013 - 22:44 नवीन
मारुतीला पर्वतावरुन संजीवनी नाय काढता आली, अ‍ॅटो अल्टो फार लांबची गोष्ट आहे,
ये हुइ ना बात्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त
प
पैसा Tue, 01/15/2013 - 16:41 नवीन
मोरावळा आवडला. आता याची प्रेरणा शोधणे आले!
  • Log in or register to post comments
ध
धन्या Tue, 01/15/2013 - 16:46 नवीन
अ‍ॅक्टीवावाल्या काकांनी प्रेरणाला पत्ता सांगितल्यानंतर ती लगेच निघून गेली. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
सूड Tue, 01/15/2013 - 16:58 नवीन
अ‍ॅक्टिवावाला काका खंय/कोंण आशिल्लों ता पळोंवक जाय, मागीर प्रेरणा सोदपाची गरजच ना. ना जाल्या प्रेरणा सोदूनलेगित मेळची ना अशें दिसतां गें !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Tue, 01/15/2013 - 17:17 नवीन
अरे ताणे सांगला मरे, बुवाक पळयला म्हणून! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ध
धन्या Tue, 01/15/2013 - 17:23 नवीन
माका मालवणी आणि कोकणी भाषा शिकुची आसा. कोण तयार आसा शिकवुक?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Tue, 01/15/2013 - 18:32 नवीन
http://www.misalpav.com/node/21287 हे घे. हांव, प्रीतमोहर आणि यशोधरा आसात. प्रीतमोहर फुडलो धडो दितले. ताका याद करपाक जाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
म
मी-सौरभ Wed, 01/16/2013 - 11:29 नवीन
मराठी संस्थळावर प्रत्यक्ष संपादकच मराठेतर (महत्वाच म्हणजे मला न समजणारी) भाषा वापरतात हे वाचून...... जाऊ दे पैसाकाकूंबद्दल आपली काय बि खम्प्लेंट नाय हाये.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
य
योगप्रभू Tue, 01/15/2013 - 17:32 नवीन
अ‍ॅक्टिव्हावर मांडी घालून बसण्याच्या करामतीपेक्षा धोतर घालणारा काका कोण असावा बरे? ती बाला त्याला 'आजोबा' का म्हणाली नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ज
जेनी... Tue, 01/15/2013 - 18:43 नवीन
काका चान आहे हं कविता !
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 01/15/2013 - 18:46 नवीन
हा हा हा. छान.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Tue, 01/15/2013 - 20:08 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Tue, 01/15/2013 - 20:18 नवीन
मजा आली! :)
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 01/15/2013 - 20:29 नवीन
मांडी घालूनच बसा अ‍ॅक्टीव्हावर, पण मागच्या सीटवर. चालवणार्‍याच्या पाठीला पाठ लावून बसलात तर अजून बर्‍याच बाला, षोडशा, कन्या नीट दिसतील.
  • Log in or register to post comments
ध
धन्या Tue, 01/15/2013 - 20:36 नवीन
एव्हढा कोकलतोय तरी पब्लिक मलाच काका म्हणतंय. :)
चालवणार्‍याच्या पाठीला पाठ लावून बसलात तर अजून बर्‍याच बाला, षोडशा, कन्या नीट दिसतील.
सध्यातरी अशी काही पाठीला पाठ लावून बसण्याची पद्धत नाही. रच्याकने, पाठीला पाठ लावण्यावरून खुप पूर्वी मिपावर प्रचलीत असलेल्या आणि नंतर काळाच्या ओघात गडब झालेला "पाठीला साबण चोळणे" हा शब्दप्रयोग आठवला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
स्पंदना Tue, 01/15/2013 - 22:46 नवीन
धनाजीराव (काका) काव्य अतिशय यमकात, वृतात बसत असल्याने आम्ही याला नव्-काव्य म्हणायचे नाकारत आहोत. अहो नवकाव्य अस तस नाही घडत. त्या साठी फुल्ल्प्यंट तर नाहीच नाही चालत. तरीही...अतिशय रसाळ अन आनंददायी काव्यकृती.
  • Log in or register to post comments
ध
धन्या Wed, 01/16/2013 - 04:00 नवीन
काका आम्ही नाही. हा आमच्या एका अतृप्त मित्राचा अनुभव आहे, जो इकडे तिकडे वेडेवाकडे चेहरे करत फिरत असतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
न
नाखु Wed, 01/16/2013 - 04:33 नवीन
जिलबी सम्राटांना संक्रांतीच "वाण" दिल्ये गेले आहे.. (मि.पा.भाषेनुसार)
  • Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख Wed, 01/16/2013 - 04:58 नवीन
आला सहा आसनीचा थांबा, मी जरासा धुंद झालो बा़जूला सारत लोका, मी मजनु झालो गाडीतून उतरली रुपवती, येई फडकावीत हाती चिठ्ठी बघुनी ती यौवना ,मी ही क्षणीक प्रेमवीर झालो Image removed. ----------------------------------------------------
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Wed, 01/16/2013 - 06:42 नवीन
सदर कविता वाचुन स्वारगेट्-धायरी सहा आसनी प्रवासी वाहतुक संघाने सदर कविला व कवितेच्या नायकाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. समत मिपाकरांकडून मदतीची अपेक्षा.
  • Log in or register to post comments
ध
धन्या Wed, 01/16/2013 - 15:53 नवीन
कवीला भेटायचे असेल तर स्वारगेटवरुन धायरीला जाताना संतोष हॉलजवळ उजव्या गल्लीत वळायचे. आणि कवितेच्या नायकाला भेटायचे असेल तर संतोष हॉलवरुन तसंच पुढं जायचं, फन टाईम आणि त्यानंतरचा कालवा ओलांडायचा आणि लगेचच डाव्या बा़जूला वळायचं. :) आपलाच, धनाजीराव वाकडे पाटील अखिल शिंव्हगड रोड, वडगांव धायरी (डीयेस्के सहीत) आन्नी वारजे जिलेबी व्यावसायिक म्हासंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त
च
चेतन Wed, 01/16/2013 - 07:13 नवीन
जिलब्यापाडु साहित्यसंमेलन स्वारगेट्-धायरी दरम्यान कोठेतरी भरवा ;-) अवांतरः तेरावच घालायच असेल तर मी नव्याने कावळा झालो असही चाललं असतं ;-)
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Wed, 01/16/2013 - 07:38 नवीन
=))
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 01/16/2013 - 07:42 नवीन
तुम्ही तर जिलबीवाल्यांचीच जिलबी वळलीत की हो !
  • Log in or register to post comments
अ
अनिल तापकीर Wed, 01/16/2013 - 08:32 नवीन
धनाजीराव, लय भारी
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Wed, 01/16/2013 - 08:32 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
ज
जयवी Wed, 01/16/2013 - 09:43 नवीन
सही !!
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Wed, 01/16/2013 - 11:32 नवीन
आता काका काय प्रतिसादतात ते बहघाहायहला पायजे ;) कॉलिंग काका ऑण अ‍ॅक्टिव्हा!!
  • Log in or register to post comments
र
रुमानी Wed, 01/16/2013 - 11:57 नवीन
धन्य.......! धनाजीराव.
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Wed, 01/16/2013 - 15:58 नवीन
व्वा! धनाजीराव मस्तच. -(कोवळा) सोकाजी
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Wed, 01/16/2013 - 16:12 नवीन
-(कोवळा) सोकाजी म्हणजे जुनाच कोवळा की नव्यानं झालेला कोवळा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 01/16/2013 - 17:08 नवीन
@ की नव्यानं झालेला कोवळा...>>> =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त
ल
लीलाधर Wed, 01/16/2013 - 16:10 नवीन
धनाजीराव जीलबीवाले अक्तीवा ते अल्तो मधुन फिरताना काय शुंडर मष्तच जीलबी टाकलीत की ओ फारच छान जलेबीवाले काका :-P :-D ;) :)
  • Log in or register to post comments
ध
धन्या Wed, 01/16/2013 - 16:16 नवीन
माज्याकर प्याशन परो आनि आय्टेन हायेत. तु तुज्या आत्मा दादुसला यिचार, त्येज्याकर याक्टीवा आनि आल्टो हाय. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लीलाधर
त
तिमा Wed, 01/16/2013 - 16:26 नवीन
'धन्या ते कोवळी कळा!'
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा