Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नकोस

अ — अज्ञातकुल, Fri, 01/18/2013 - 06:17
ती :- दिवसभराचा उजेड उतरत जातो झाडांच्या तळकोषी आरामाला झिरपत जातो हळू हळू अंधार व्यापतो आभाळाला........ तो :- नकोस हिणवू नको ओणवू सावर ग स्वतःला नभी चांदणे येइल अलगद सजविल तव मेण्याला धुके भ्रमाचे विरघळेल उदयेल नवी स्वरमाला हरवुन जाशिल तिथे सोडशिल ना या जन्माला संध्या- छाया ऊन-सावल्या खेळविती हृदयाला उमलविती रोमांकित वलये जागविती मधुशाला रंग नभाचे तसेच आपले अंत नसे क्षितिजाला शब्द कुंचले घेउन हाती हो सुसज्ज लढ्ण्याला ......................अज्ञात

प्रतिक्रिया द्या
2099 वाचन

💬 प्रतिसाद (7)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 01/18/2013 - 07:27 नवीन
संध्या- छाया ऊन-सावल्या खेळविती हृदयाला उमलविती रोमांकित वलये जागविती मधुशाला रंग नभाचे तसेच आपले अंत नसे क्षितिजाला शब्द कुंचले घेउन हाती हो सुसज्ज लढ्ण्याला
व्वाह....
  • Log in or register to post comments
अ
अज्ञातकुल Mon, 01/21/2013 - 05:27 नवीन
आभार मिका :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
स
सुधीर Sat, 01/19/2013 - 08:55 नवीन
त्याचं आणि तीचं पहिलं कडवं छान जमलय.
  • Log in or register to post comments
अ
अज्ञातकुल Mon, 01/21/2013 - 05:30 नवीन
आभार सुधिर :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर
स
सांजसंध्या Sun, 01/20/2013 - 02:47 नवीन
तिचा सूर निराशावादी वाटतोय. नकोस हिणवू नको ओणवू सावर ग स्वतःला... कुठल्यातरी गंभीर परिस्थितीतून ती स्वतःचा धि:क्कार करण्याइतकी खचलेली असताना तो तिला आधार देऊ पाहतोय. या पार्श्वभूमीवर रंग नभाचे तसेच आपले अंत नसे क्षितिजाला शब्द कुंचले घेउन हाती हो सुसज्ज लढ्ण्याला हा जबरदस्त आशावादी आणि सकारात्मक दृष्टीकोण आहे. अप्रतिम कविता.
  • Log in or register to post comments
अ
अज्ञातकुल Mon, 01/21/2013 - 05:30 नवीन
हं...... खरंय ससं !! आभार मनापासून. आनंद वाटला प्रतिसाद बघून. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांजसंध्या
अ
अनिल तापकीर Mon, 01/21/2013 - 10:47 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा