Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?

म — मोदक, Sat, 01/19/2013 - 05:15
******************************************************* धनाजीरावांनी कुठूनतरी "धनाजीराव आणि पार्टी" चा उल्लेख करून सखूची आठवण काढली. सखूचा धागा वर आला नाही पण त्या गीताच्या (?) तालावर आम्हाला बरेच काही सुचत गेले.. सखूचे विडंबन समजणार असलात तर जरूर समजावे, मात्र कुणा व्यक्ती / पात्राशी सांधर्म्य आढळयास योगायोग समजण्याची चूक करू नये. ******************************************************* शब्द खरडतो 'मी' घाई घाई, अर्थाची आठवण राहीलीच नाही बुध्दी, ज्ञान, मती सर्व 'माझ्याच' ठायी, आजही तू सहमत होशील ना? 'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..? संस्थळांवर उडवलाय धुरळा, 'मीच' काढलाय 'माझाच' गळा 'मी' सांगतो तीच पूर्व दिशा, 'मी' सांगतो तोच अर्थ खरा 'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..? जगातले सर्व ज्ञान आहे 'मला', तुझे बरोबर मुद्दे पण पटेनात 'मला' 'मी', 'माझे' मत, 'माझे' प्रतिसाद, 'माझे' विचार, 'माझे' ज्ञान.. पण आज्जिबात अहंकार नाही 'मला' 'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..? सांगत असतात बरेच जण 'मला', सांभाळून वाग बोल रे मित्रा 'मी' म्हणतो 'माझ्या' ज्ञानाचा ते तिरस्कार करतात, सतत 'मलाच' टारगेट करतात 'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..? तू कसे काय म्हणतेस 'मी' चुकलो, छे छे नाहीच्च 'मी' चुकलो. बरोबर असले मुद्दे तुझे तरी, अंतीम सत्य नेहमी 'मीच' बोलतो 'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..? "आजपण ऐकशील ना..?" मध्ये दिसते विनंती, आज्ञा सोडायची सवय 'माझ्या' ठायी . 'मी' आता त्या विनंतीला आज्ञेमध्ये बदलतो, आजच्या दिवसातला एक विजय (?) प्राप्त करतो. 'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तुला ऐकावाच्च्च्च्च्च्च्च्च्च्च लागेल. कदाचित तू असशील बरोबर, मुद्देही असतील लॉजीकल, पण ते 'मी' मान्य कसे करेन?? तुला माझ्यासारखे वागायचेय? मग सभ्यता, मर्यादा, संकेत सर्व विसरावे लागेल. 'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तुला ऐकावाच्च्च्च्च्च्च्च्च्च्च लागेल.

प्रतिक्रिया द्या
50843 वाचन

💬 प्रतिसाद (165)
अ
अमोल खरे Mon, 01/21/2013 - 14:25 नवीन
तोच तर गोंधळ आहे ना. मनाला पाहायचं कसं ? (मी काही इगतपुरीपर्यंत जाणार नाहीये हं) आणि तेच मन आहे कशावरुन ? मोदक तरी मोदक आहे कशावरुन ? तो लाडु/करंजी/ चिवडा कशावरुन नाही ? म्हणजे तो स्वतःला मोदक म्हणतो पण तो पण एक भासच आहे ना. तो पुरणपोळी वगैरे पण असु शकतो ना. मी त्याला मोदक म्हणतो पण तो तर आइस्क्रीम पण असु शकतो ना. आईस्क्रीमचे व्हॅनिला, स्ट्रॉबेरी, मँगो, राजभोग, सिताफळ असे अनेक प्रकार असतात. पुर्वी वाडिलाल होते, नंतर अमुल आलं आता हॅवमोर म्हणुन पण आलाय. जास्त आईस्क्रीम खाऊन सर्दी होते. सर्दी झाली तर क्रोसिन घ्यावी. क्रोसिन नसेल तर गरम पाण्याची वाफ घ्यावी. पाणी तानसा, वैतरणा तलावातुन येतं. त्यावर भांडुप येथे प्रक्रिया करुन ते शुद्ध केले जाते. पुर्वी एक तुरटी घोटाळा म्हणुन पण काहीतरी झालं होतं.... (असं बरच लिहु शकेन....."बदक" ह्या तुफ्फान गाजलेल्या लेखाची आठवण झाली, म्हणुन ट्राय केला. =)) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
क
कवितानागेश Mon, 01/21/2013 - 14:36 नवीन
मला वाटते की मोदक हा कडकबुंदी लाडू असून तू एक चिवडा आहेस! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल खरे
र
रेवती Mon, 01/21/2013 - 15:06 नवीन
अमोला, शुद्धिवर ये बाळा! तरी सांगत होते काहीही ट्राय करण्याचं वय नाही तुझं अजून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल खरे
व
विश्वनाथ मेहेंदळे Mon, 01/21/2013 - 17:50 नवीन
खरे तर बरेच काही ट्राय करायचे वय आहे. ते ट्राय कर म्हणावे. उगाच त्या मोदकाच्या नादी लागू नकोस. घरी भरपूर अभ्यास करून कॉलेजात टाईमपास करणारी काही मुले असतात. तू फक्त टाईमपास करशील आणि नापास होशील आणि तो तिथे ४-५ विषयात डीसटिंक्शन काढणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
ध
धन्या Tue, 01/22/2013 - 17:51 नवीन
घरी भरपूर अभ्यास करून कॉलेजात टाईमपास करणारी काही मुले असतात. तू फक्त टाईमपास करशील आणि नापास होशील आणि तो तिथे ४-५ विषयात डीसटिंक्शन काढणार.
मोदक, हलकट तू अभ्यास सुरु केला हे मुंबईला विमेलासुद्धा कळलं. आणि आम्ही विचारलं की म्हणतोस बाहेर काम आहे त्यामुळे नाही जमणार कटट्याला यायला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
म
मोदक Tue, 01/22/2013 - 18:40 नवीन
ढन्या भा****** (तबीयतदारांनी फुल्या भरून काढून धन्याला व्यनी करावा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
ब
बॅटमॅन Mon, 01/21/2013 - 13:00 नवीन
काय सगळे भास भास करायलेत बे, भासाची नाटके लिहितात की काय वाटायलंय मायला.
  • Log in or register to post comments
म
मोदक Tue, 01/22/2013 - 06:09 नवीन
ऑ..??? तिसरा प्रतिसाद कोणता उडाला? मला दोनच अपेक्षीत होते. :-\
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 02/21/2013 - 16:23 नवीन
मोदका आजकाल तुझा टारगटपणा वाढत चाललाय. दोन चार प्रतिसाद संमं ने उडवले तर वाईट वाटून घेऊ नकोस. एकंतरीतच दंगा घालणे यासाठीच ही कविता लिहिली आहेस. माझे आनखीही प्रतिसाद या धाग्यावर आहेत याची कल्पना आहे. तूही साधा नाहीस हे दाखवण्यासाठी हा पुरावा आहे.
  • Log in or register to post comments
म
मोदक गुरुवार, 02/21/2013 - 16:45 नवीन
खी खी खी खी... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
स
सस्नेह गुरुवार, 05/16/2013 - 10:56 नवीन
आज पाढे पुन्हा एकदा वाचले......पाठ असायला हवेत ना !
  • Log in or register to post comments
म
मोदक गुरुवार, 05/16/2013 - 12:33 नवीन
:D धन्यवाद्स!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
सस्नेह Wed, 01/20/2016 - 11:58 नवीन
बे दुने चार झाल्यावर 'मी मी' चा पाढा विसरलास का बा मोदका ?
  • Log in or register to post comments
म
मोदक Wed, 01/20/2016 - 12:35 नवीन
अहो.. तो तुमचा भ्रम आहे. लेख आणि प्रतिसाद नीट वाचा - प्रतिसाद द्यायची घाई करू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
ई
ईश्वरसर्वसाक्षी Wed, 01/20/2016 - 12:37 नवीन
मला तरी भास होताहेत
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा