आनंदसागर
आपला परमात्म्याशी नित्य आणि शाश्वत संबंध आहे.तो धूसर होऊन ह्या जगातील जीवनास प्रारंभ ती "सुरूवात" आणि परमात्म्याशी पुन्हा नित्य,आनंददायी संबंध प्रस्थापित होणे हा "शेवट" किंवा "मोक्ष".ह्या संकल्पनेवर आधारीत ही रचना आहे. कशी वाटली जरूर सांगा!
आनंदसागर
सुरूवात ही तुझ्याकडून शेवट ही तुझ्याकडेच पण मधला प्रवासच भरकटलेला अशाश्वतात गुरफटलेला ह्या भरकटलेल्या वाटेवरती पुन्हा गवसतो तोच गांव विस्मरून ते पावन तत्व अन् मीही मांडते तोच डाव खुणा, तुझ्या नि माझ्या साम्यत्वाच्या इथे मिटवीते माया ममतेचे कच्चे बंध इथे निर्मिते काया नसे अशक्य जरी मिळविणे त्रैलोक्याचे अवघे धन तरीही आनंदाच्या एका थेंबासाठी आसुसलेले अवघे जन व्यर्थ शिणूनी मीही विसरते कोठे गवसेल तो आनंदसागर अंतरातूनी येते पावन साद मी तुझ्या हृदयातील गिरिधर नागर!
💬 प्रतिसाद
(15)
स
समयांत
Tue, 01/22/2013 - 07:36
नवीन
वाचतांना मन सुखावले :)
- Log in or register to post comments
म
मूकवाचक
Wed, 01/23/2013 - 05:35
नवीन
अप्रतिम!
- Log in or register to post comments
प
पियुशा
Tue, 01/22/2013 - 08:15
नवीन
आवडली :)
- Log in or register to post comments
अ
अनिल तापकीर
Tue, 01/22/2013 - 08:18
नवीन
सुंदर
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Tue, 01/22/2013 - 10:46
नवीन
सुरेख!
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 01/22/2013 - 11:54
नवीन
अत्यंत सुबक व रेखिव रचना.
आवडली.
- Log in or register to post comments
५
५० फक्त
Tue, 01/22/2013 - 12:18
नवीन
गिरिधर नागर मधल्या नागरचा अर्थ काय, कुणी सांगेल का ?
- Log in or register to post comments
श
श्रिया
Wed, 01/23/2013 - 05:24
नवीन
मला माहीत असलेला "नागर" या शब्दाचा अर्थ "सुंदर" असा आहे."गिरिधर नागर" हि नाममुद्रा संत मीराबाईंची देणगी आहे. त्यांच्या अनेक पदांत ती असते.
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 01/22/2013 - 14:11
नवीन
सुरेख रचना!
- Log in or register to post comments
र
रणजित चितळे
Tue, 01/22/2013 - 14:23
नवीन
अवघड विषय सोपा करुन सांगणे सगळ्यांना जमत नाही. आपल्याला जमले आहे. फार सुंदर.
- Log in or register to post comments
श
शुचि
Tue, 01/22/2013 - 14:33
नवीन
रचना फार आवडली
- Log in or register to post comments
श
श्रिया
Wed, 01/23/2013 - 08:02
नवीन
समयांत,पियुशा,अनिल तापकीर,रणजित चितळे,शुचि,अपर्णा अक्षय,मूकवाचक,पैसा,५० फक्त,मिसळलेला काव्यप्रेमी , तुम्हा सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
गुरुवार, 01/24/2013 - 18:19
नवीन
आवडली. :)
- Log in or register to post comments
अ
अधिराज
Fri, 02/01/2013 - 04:32
नवीन
लाजवाब!लई भारी कविता. फकस्त मी आन् माझं विचार करण्याच्या ह्या दुनियेत असं काही सूचणं लाई दुर्मिळ गोष्ट हाये. तुमची प्रतिभा अशीच बहरू दे.
- Log in or register to post comments
क
क्रान्ति
Fri, 02/01/2013 - 07:02
नवीन
आवडली कविता.
- Log in or register to post comments