परिधान केलेला घनक्लांत तो,
मनमुक्त बोल उधळत आहे..
जीवाच्या काहिलीने मी शोधत राहतो त्याच्या घनविभोर परिश्रांतीसाठी युगुल युक्त नजारा....
पण दाटून येतो निव्वळ विरहनियुक्त किनारा.. ;)
त्याच्या भेटीच्या असोशीने.....
ठिक आहे. बोलते आता. वाटल तर चावते म्हणा.
काव्यात्मक ओळी जरी असल्या तरी त्यांना एक अंतर्गत अर्थाचा प्रवाह असावा लागतो. तुमचा आताचा भाव हा खुप अस्वस्थ, खळाळता, तारुण्याच्या एकाकीपणाचा आहे. तो व्यक्त होतो आहे, पण अर्थ नाही वाटत त्या ओळींना. माझ्याकडे एक माझी कॉपी आहे(डायरी या श्ब्दाला मिपाचा स्वतःचा इतिहास असल्याने मी तो वापरत नाही) मला जेंव्हा काही सुचतं; तेंव्हा मी ती कॉपी घेउन बसते, ओळी लिहिल्या जातात, खोडल्या जातात, वाचल्या जातात, दुरुस्त केल्या जातात. भावना तीच राखत, स्त्रोत तसाच राखत, पण उगा शब्दांची व्यर्थ उधळण तर होत नाही? काही शब्द उणे तर पडत नाहीत हे सार तपासत मी लिहित रहाते. अश्यावेळी माझे एक ओळखीचे होते, त्यांच डोक कधीही उठुन खायची सवय लागली होती मला, मला या अर्थाचा शब्द पाहिजे, बहुतेकदा त्यांचा शब्द नाकारत मी माझी शब्द योजना करत लिहित रहाते. लिहिणे या नशेची पूरेपूर जाणिव आहे मला, पण अस्सल नशेबाज त्या नशेची कदर जाणतो, राखतो. ती ठेवावी लागते. तुमच्या काव्यात्मकतेवर कोणताही आरोप नाही आहे. पण थोडस वळण हव असतं, ते द्या, या नशेची कदर राखा.
आय सिन्सिअरली होप दॅट आय अॅम नॉट हर्टींग यॉर फीलिंग्ज.
कविता अवघ्या चार मिनिटात घडते. आपल्या हातात नसते ती. अशी ज्णु विजेचा लोळ चमकावा तशी, तीचे शब्द घेउन, तिचा अर्थ घेउन. तुमच्या कडेही ती तशीच येत असणार हे जाणते मी.
कविता अवघ्या चार मिनिटात घडते. आपल्या हातात नसते ती. अशी ज्णु विजेचा लोळ चमकावा तशी, तीचे शब्द घेउन, तिचा अर्थ घेउन. तुमच्या कडेही ती तशीच येत असणार हे जाणते मी.
मला अपर्णातैंसारखे बोलता आले असते तर अनुमोदन द्यायला कां आलो असतो?
खर सांगू मला कवितेवर चर्चा वगैरे काही करता येत नाही.
माझ्याकडून कधितरी काहीतरी किडूक मिडूक लिहील जात आणि ते कवितेसदृश काहीतरी असत, म्हणून ते मी इथे देतो.
काही लोकांना ते आवडत, आणि ते त्यांना आवडत यातून मला समाधान मिळतं. कुठूनतरी ति येते आणि कागदावर उतरते, बास्स.. या पलिकडे त्यात काही नसतं, अर्थ, शब्द, वृत्त, यमक सगळ तिच आणते, मी फक्त उतरवतो.
आणि या सगळ्याचा शेवट इतकाच असतो, कि माझ्या हातून अस काहीतरी लिहिले गेले याचा प्रचंड आनंद. कोणी छान म्हटले तर आनंद वाढतो, वाईट म्हटले तर उत्साह वाढतो, अजून चांगल लिहीण्याचा प्रयत्न करायला. चांगल लिहीणे म्हणजे कल्पनांची उंची वाढवणे. जेव्हा ते होते तेव्हा भट्टी जमते आणि आमची कविता हिट होते ;)
अपर्णा, तुझे एकेक प्रतिसाद म्हणजे 'हो, मलाही अगदी हेच्च, असंच्च वाटलं' असे असतात हल्ली.. शब्द वेचून वेचून लिहित असतेस!
मिका, चांगल लिहीणे म्हणजे कल्पनांची उंची वाढवणे.. अगदी खरं.
पण त्याचसोबत त्या कल्पना व्यक्त करण्यासाठी दरवेळी चढत्या भाजणीने अचूक, अर्थवाही शब्द शोधणे देखील?
(आणि इथेच आता हेही सांगून घेते, की तुझ्या कवितेसदृश किडूकमिडूक (!) ची मी लईच फ्यान आहे.. :) )
मला आक्षेपांचे स्वागत करायला आवडते. त्यासाठी ही रचना (म्हणू शकत असाल तर) रचली आहे. जसे तुम्ही म्हणत आहात, तसं अजुन कुणी ही मला म्हणत आहे की, मांडणी योग्य नाही (आपण थोडस वळण हव असं म्हणत आहात).
असो, मी बरेच काही लिहीत असतांना काही सर्वांसमक्ष आणायला आवडते, तशी त्यावर चर्चा करायला आवडते. जर हे जाणून बुजून असेल तर त्यात तुम्हांला गैर वाटणार नाही ना?
मी नशेची कदर राखतो बायद्वे आणि आय सिन्सिअरली वाँट समवन हर्ट मी.;)
गैर वगैरे काही नाही. मिपा हे ट्रायल घेण्यासाठी कधीही चाम्गल. कारण आम्ही कुणालाही घाबरत नाही. आया मनमे कहे दो। पण ते हर्ट बिर्ट नका होउ. अन व्हायच असेल तर हित्त नगा येउ. आम्हाला लढत लढत वीरगतीला जाणारे आवडतात. या या मला कापा म्हणुन आडवे होणारे बळी आम्ही घेत नाही.
मी ट्रायल घेत नाहीये. मला मिपावर चांगल्या लोकांना विचारायला त्यांच्याशी चर्चा करायला आवडेल, जसे आपणही
माझे एक ओळखीचे होते, त्यांच डोक कधीही उठुन खायची सवय लागली होती मला,
तसंच माझंही मिपा आहे.
हर्ट मी अजुन तरी नाही झालोय. होण्यात मज्जा आहे ;) असं म्हणायचं आहे.
मी मिपावर आल्यापसून लढतोय, संपादक मंडळी सांगू शकतील, पहीलाच धागा उडवला त्यांनी. असो.
बोला, मी आहेच उत्तर द्यायला ;)
लिहिणे या नशेची पूरेपूर जाणिव आहे मला ... अशी ज्णु विजेचा लोळ चमकावा तशी, तीचे शब्द घेउन, तिचा अर्थ घेउन. तुमच्या कडेही ती तशीच येत असणार हे जाणते मी.
या ओळी आवडल्या.
१) अपर्णा: दंडवत.
२) मिका: तुझं कवितेसारखं काहीतरी नेहमीच आवडतं. :)
३) समयांतः तुमचा पहिला धागा एका ओळीचा सुद्धा नव्हता हो! शून्य ओळी. मिपा अजून एवढे आधुनिकोत्तर झाले नाही. :D
४) आता कवितेबद्दलः चित्र आवडलं. (अभ्याला +१) कविता किंवा मुक्तक मला शब्दबंबाळ वाटलं. शक्य आहे की तुम्हाला कदाचित ते तसंच सुचलं असेल. पण मी साध्या शब्दांचा पुरस्कार करते. शब्दसमुदाय फक्त चमत्कृतीने भरलेला असून उपयोग नाही, अर्थवाही असेल तर ही कविता जास्त लोकांपर्यंत पोचेल. फक्त अभिजनांसाठी (मिपाच्या भाषेत हुच्चभ्रूंसाठी) लिहिले असेल तर हे लागू नाही. तुम्हाला नवीन काही वाचायचे असेल तर इथे मिपावर अनेक चांगल्या कविता आलेल्या आहेत. भरपूर वाचा. कधीकधी कवितांबद्दल उत्तम चर्चा झाल्या आहेत त्याही वाचा. आणि फक्त सुंदर शब्दतचना वाचायच्या असतील तर शरदिनी यांच्या कविता जरूर वाचा. त्यातल्या एखाद्या कवितेचा अर्थ लागला तर कविता फसली असं म्हटलं जातं. :D
तुम्ही अभिजनांत मोडत असल्याने मी तुम्हाला कोणताही मदतीचा किंवा आपुलकीचा सल्ला द्यायला पात्र नाही. तुम्ही स्वयंभू आहात आणि तुम्हाला कोणाच्या चांगल्या/वाईट सल्ल्याची किंवा मदतीची गरज नाही असे दिसते. सबब आमची सपशेल माघार! पुढील लेखनास शुभेच्छा!
तुम्ही मनमुक्तपणे लिहिलत .. आणि आम्ही अर्थ लावण्याच्या चक्रात अडकलो :)
परमात्म्याचा शोध घेण्याचा प्रयत्न - असा काहीसा अर्थ मला समजतो आहे. बरोबर आहे का?
आणि युगुलयुक्त नजारा म्हणजे काय?
लिहिणे या नशेची पूरेपूर जाणिव आहे मला ... अशी ज्णु विजेचा लोळ चमकावा तशी, तीचे शब्द घेउन, तिचा अर्थ घेउन. तुमच्या कडेही ती तशीच येत असणार हे जाणते मी.या ओळी आवडल्या.