Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अनुनय

अ — अज्ञातकुल, Fri, 01/25/2013 - 05:47
असतात रंग ढंगहि वेडे झरतात छटा रत रुधिराच्या हृदयात बंदिशी अनोळखी डोळ्यांकाठी रति भावुकशा खल मदन उरी रण रिपुकांचे ओठांवरती नित शब्द मुका काया माया बहु काटेरी ओढाळ मती अस्वस्थ सखा चंद्रास न कळते झिजलेले पाण्यास व्यथा परि आकळते फेसाळ शिरी कल्लोळे जळ एकांत कुंद साहतो कळा सारेच कसे हे अवरोही तळ नितळ सकळ ढवळे गात्री आभाळ दूर दूरच सरके मग श्वास फिरे नत माघारी डोहात बंद अगणित रात्री गंधर्व क्षणांच्या गंध कुपी अस्पर्शधुंद हा ओलावा अनुनय समिधांचा मापारी ........................अज्ञात

प्रतिक्रिया द्या
2760 वाचन

💬 प्रतिसाद (13)
स
स्पंदना Fri, 01/25/2013 - 07:28 नवीन
अनुनय समिधांचा मापारी
म्हणजे काय? अनुनय कळलं, समिधाही कळल्या, एकुण वरवर कवितेच्या संदर्भाने सारी कविता उमजली पण, मापारी?
  • Log in or register to post comments
अ
अज्ञातकुल Fri, 01/25/2013 - 08:13 नवीन
मापारी म्हणजे मोजमाप करणारा. अनुनयाच्या समिधांचं मोजमाप करणारा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
स
स्पंदना Fri, 01/25/2013 - 09:38 नवीन
वाटलच होतं. पण आम्ही मापाड्या हा शब्द जाणतो, म्हणुनच जरा खात्री करु घेतली. धन्यु!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अज्ञातकुल
श
शुचि Fri, 01/25/2013 - 15:40 नवीन
काहीतरी तरल आहे हे जाणवले.
  • Log in or register to post comments
अ
अज्ञातकुल Mon, 01/28/2013 - 05:55 नवीन
धन्यवाद :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
इ
इन्दुसुता Sat, 01/26/2013 - 20:20 नवीन
ओढाळ मती अस्वस्थ सखा
अनुभव आहे.. जीवघेणा... कविता आवडली
  • Log in or register to post comments
अ
अज्ञातकुल Mon, 01/28/2013 - 05:54 नवीन
अनुभव आहे.. जीवघेणा.. इथे मला समाधान मिळालं. कविता पोहोचल्याचा आनंद मिळाला. आभारी आहे मनापासून. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्दुसुता
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 01/28/2013 - 06:24 नवीन
कविता आवडली. चंद्रास न कळते झिजलेले पासूनच्या पुढील ओळी खासच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अज्ञातकुल Tue, 01/29/2013 - 07:42 नवीन
धन्यवाद बिरुटे सर :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 01/29/2013 - 08:01 नवीन
आपल्या कल्पनाविस्तारास __/\__ अतिशय आशयगर्भ आहे रचना...
  • Log in or register to post comments
अ
अज्ञातकुल Tue, 01/29/2013 - 10:05 नवीन
मिका, आपल्या प्रतिसाद सातत्याबद्दल मी कृतज्ञ आहे. तसा प्रतिसाद इतरांना देण्यात मी कमी पडतो याबद्दल दिलगीर पण आहे. अनेकांचा गैरसमजही होत असेल त्यामुळे. आपला असाच लोभ असू द्यावा. मला वेळ काढायलाच हवा आता. :-)
  • Log in or register to post comments
स
सांजसंध्या Wed, 01/30/2013 - 10:19 नवीन
प्रत्येक कडव्यातून वेगवेगळ्या प्रतिमांमधून चित्रदर्शी दिसला. अनुनय एका कडव्यात जाणवला.. इतर कडव्यात शोधतेय अजून.. (काही ठिकाणी शब्दरचना बोजड वाटली)
  • Log in or register to post comments
फ
फिझा Tue, 03/05/2013 - 00:07 नवीन
छान आहे कविता ......
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा