सिद्धोबा
मुख्य रस्त्यावर तो कधीच नसतो.
थोडं आत वळल्यावर -
भर दुपारी अचानक
एक हिरवाकंच पाचू सामोरा येतो.
मूळ खोड नसणाऱ्या
पारंब्यांच्या वडाखाली
मोरांचा एक थवा
केकारवत फिरतो इकडेतिकडे.
तहानलेल्या डोंगराच्या पायथ्याशी
एक नितळ झरा आहे, थंडगार!
वेळू आणि आमराई
वगैरेही-
निळंशार आकाश, स्वच्छ मन,
निवलेले डोळे, अक्षय शांती-
तोच सिद्धोबा!
पण थोडं आत वळावं लागतं -
स्वतःच्या.
कारण मुख्य रस्त्यावर तो कधीच नसतो -
तिथे रहदारी असते फक्त.
.
💬 प्रतिसाद
(23)
प
प्रचेतस
Fri, 01/25/2013 - 09:10
नवीन
आशयगर्भ.
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Fri, 01/25/2013 - 09:37
नवीन
थोड आत वळाव लागतं
स्वतःच्या
मश्त!
- Log in or register to post comments
इ
इनिगोय
Fri, 01/25/2013 - 09:39
नवीन
सुरेख शब्दचित्र..
मोजकंच बोलता बोलता बरंच काही सांगून गेलात!
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Fri, 01/25/2013 - 10:40
नवीन
आवडलं
- Log in or register to post comments
म
मूकवाचक
Fri, 01/25/2013 - 11:26
नवीन
अप्रतिम!
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 01/25/2013 - 11:42
नवीन
विसूनाना, मस्त कविता.
'थोडं आत वळावं लागतं स्वतःच्या' केवळ सुप्पर.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
अ
अनन्न्या
Fri, 01/25/2013 - 14:49
नवीन
..............
- Log in or register to post comments
श
शुचि
Fri, 01/25/2013 - 14:50
नवीन
फार सुंदर!!! अतिशय आशयघन रुपक.
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Sat, 01/26/2013 - 10:22
नवीन
+१
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
Fri, 01/25/2013 - 15:03
नवीन
सुन्दर कविता.. सिध्दोबा.. :)
- Log in or register to post comments
य
यश पालकर
Fri, 01/25/2013 - 19:39
नवीन
खुप छान आहे कविता!!!!
पण हेच वळण घ्यायला जमत नाही रहदारीच्या वाटेवर...
- Log in or register to post comments
ब
बहुगुणी
Fri, 01/25/2013 - 22:45
नवीन
विसुनाना: आप बहुत कम लिखते हैं, मगर बहुत सही लिखते हैं !
नुकत्याच वाचलेल्या यशोधरा यांच्या मनाचिये गुंती या अशाच सुंदर मुक्तकाची आठवण झाली.
- Log in or register to post comments
प
पैसा
Sat, 01/26/2013 - 05:11
नवीन
वर दिसणारं चित्र आणि आशयही विलोभनीय!
- Log in or register to post comments
इ
इनिगोय
Sat, 01/26/2013 - 09:29
नवीन
चित्र नाही दिसत?
- Log in or register to post comments
प
पैसा
Sat, 01/26/2013 - 10:11
नवीन
चित्र म्हणजे शब्दचित्र ग! वर वर दिसणारं.
- Log in or register to post comments
इ
इनिगोय
Sun, 01/27/2013 - 07:18
नवीन
हात्तिच्या.. गंडले!
मिपावर एवढे भारी लोक्स आहेत की खरंच तसं चित्रही टाकतील.
बाकी शब्दचित्राचं कवतिक केलंच आहे वर.
- Log in or register to post comments
स
सुधीर
Sun, 01/27/2013 - 05:56
नवीन
पण थोडं आत वळावं लागतं -
स्वतःच्या.
कारण मुख्य रस्त्यावर तो कधीच नसतो -
तिथे रहदारी असते फक्त.
क्लास!
- Log in or register to post comments
क
क्रान्ति
Sun, 01/27/2013 - 06:15
नवीन
नतमस्तक व्हावं अशी विलक्षण अभिव्यक्ती!
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Sun, 01/27/2013 - 07:40
नवीन
काव्य आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम.
खूपच आवडले.
- Log in or register to post comments
न
नंदन
Sun, 01/27/2013 - 09:20
नवीन
छान, मुक्तक आवडलं.
- Log in or register to post comments
व
विसुनाना
Mon, 01/28/2013 - 07:02
नवीन
प्रतिसाददात्यांना विशेषकरून धन्यवाद.
- Log in or register to post comments
५
५० फक्त
Mon, 01/28/2013 - 07:09
नवीन
लई भारी लिहिलेत,
पण ते आत वळायचे दरवाजे आम्ही आमच्याच हातानं बंद केले आहेत, कुलुपं लावलीत आणि चाव्या कुणा दुश्मनाकडं निगुतीनं सांभाळायला दिल्यात, आता परत मिळवायच्या म्हणजे सुद्धा तह करावा लागणार, न परवडणा-या अन न झेपणा-या अटींचा.
- Log in or register to post comments
म
मनिष
Mon, 01/28/2013 - 13:26
नवीन
मस्त आहे! आवडली :-)
- Log in or register to post comments